sugarcane variety

sugarcane variety: ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण ऊस पिकांच्या विविध जातींबद्दल sugarcane variety सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये उसाची लागवड सुरु, पूर्वहंगामी आणि आडसाली पद्धतीने करतात. उसाच्या विविध जाती sugarcane variety list असून जमिनीनुसार किंवा हंगामानुसार कोणत्या जाती लावल्या पाहिजे new sugarcane variety 2023 या बद्दल या लेखामधून जाणून घेऊयात. 


को - 86032 । CO 86032 sugarcane variety -

ऊस रंगाने लालसर - पारवा, कांड्या मध्यम जाड, डोळा गोल असतो. पक्व कांड्यांना भेगा पडतात, पाने लांब, रुंद व टोकाला वळलेली असतात. हि जात उशिरा पक्व होणारी असून, ऊस व साखरेचे उत्पादन चांगले देते. तीन हंगामासाठी शिफारस असून जास्त फुटवे, उशिरा तुरा येतो. खोडवा चांगला येत असून काणी रोगास मध्यम प्रतिकारक आहे. शेंडेअळी व कांडीकिडीस बळी पडते. फुटव्यांची संख्या जादा असल्याने ऊस बारीक असतो, नत्राची मात्रा २५% जादा द्यावी. को - 86032 sugarcane जात आडसाली साठी 65 टन/एकरी. उत्पादन व साखर उतारा 9.5, पूर्वहंगामासाठी 55 टन/एकरी व साखर उतारा 8.5 तसेच सुरु हंगामासाठी 45 टन/एकरी. व साखर उतारा 6 इतकी उत्पादन क्षमता या वाणात आहे.


कोएम 0265 (फुले 265) -

फुले 265 या जातीचा ऊस मध्यम जाड असून ऊसाची संख्या जादा असल्याने उत्पादन जादा मिळते. खारवट, चोपण जमिनीत चांगला प्रतिसाद देत असून खोडवा चांगला येतो. कांड्या आखूड मध्यम जाड असून मध्यभागी फुगीर व टोकास निमुळते असतात. ऊस रंगाने हिरवट असून पाने सरळ टोकाची आहेत. या जातीत तुरा लवकर येतो, कांड्यांवर पांगशा फुटतात, ऊस लोळण्याचे प्रमाण जास्त आहे. या वाणाचे उत्पादन आडसाली हंगामासाठी 55 टन/एकरी. व साखर उतारा 10.5  इतके असून पूर्व हंगामासाठी 50 टन/एकरी व साखर उतारा 8.5 इतक्या प्रमाणात देत असून हि जात तीनही हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. 


को व्हीएसआय 9805 - 

हि जात मध्यम उशिरा पक्व होणारी असून आडसाली व पूर्व हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. उथळ, मध्यम खोल जमीन आणि निचरूयाच्या जमिनीत चांगला प्रतिसाद देते. ऊस सरळ वाढणारा असून पाचट सहज निघते. ठिबक सिंचनासाठी जात योग्य आहे. खोल काळ्या जमिनीत सुरुवातीला वाढ कमी असते पण नंतर ऊस जोमात वाढतो. आंतरपिकासाठी उपयुक्त वाण. गवताळ रोगास थोड्या प्रमाणात बळी पडते. हे वाण आडसाली हंगामात 65 टन/एकरी. व साखर उतारा 10 इतके देते, तसेच पूर्वहंगाम मध्ये 55 टन/एकरी. व साखर उताऱ्याचे प्रमाण 8.5 टन/एकरी. इतके देते. 


को 92005 (फुले 92005) -

हे वाण लवकर पक्व होणारे असून गुळ उत्पादनासाठी चांगला आहे. या जातीस तुरा येत नसल्यामुळे पावसाच्या भागात लागवड करणे फायदेशीर ठरते पण हि जात पानांवरील ठिपके रोगास बळी पडते. पानांवरील तपकिरी ठिपके व तांबेरा रोगास जास्त पावसाच्या भागात बळी पडते. हे वाण पूर्व हंगाम व सुरु हंगाम लागवडीसाठी असून ऊस उत्पादन 68 टन/एकरी. आणि साखर उतारा 7.5 टन/एकरी. इतके देते. 


एम एस 10001 (फुले 10001) - 

हा वाण खारवट चोपण जमिनीत चांगला येतो. ऊस जाड असून रंगाने हिरवट पिवळसर आहे. व त्यावर थोडे मेणाचे प्रमाण आहे. या वाणास तुरा येतो व पक्व ऊसास डोळे फुटतात. हे वाण पूर्वहंगामी व सुरु लागवडीसाठी शिफारस केले असून 55 टन/हे. इतके उत्पादन व 8.5 टन/एकरी. साखर उताऱ्याचे प्रमाण आहे.


व्ही एस आय 08005 | 8005 sugarcane variety -

या वाणाचा खोडवा चांगला येत असून पाण्याचा ताण सहन करते, कांडी किडीस कमी प्रमाणात बळी पडत असून काणी व तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. ऊसास दशी पडत नसून तुरा कमी प्रमाणात येतो. वाणाचे ऊस उत्पादन 55 टन/एकरी. व साखर उताऱ्याचे प्रामण 8.5 टन/एकरी. आहे.


व्ही एस आय 434 - 

हि जात लवकर वाढणारी असून ऊस मध्यम जाड आहे. पाण्याचा ताण सहन करते व उत्तम खोडवा देणारी जात आहे. हे वाण पूर्वहंगाम व सुरु लागवडीसाठी शिफारस केले असून ऊस उत्पादन 50 टन/एकरी. आणि साखर उतारा 7 टन/एकरी. इतके मिळते. 


व्ही एस आय 03102 | 3102 sugarcane variety -

जास्त पाण्याचा ताण सहन करत असून उशिरा तुरा येतो. तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. हा वाण 60  टन/एकरी. व साखर उतारा 9 इतका देत असून अतीपर्जन्य भागासाठी पूर्वहंगाम व सुरु लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे. 


कोसी 671(वसंत) - 

ही जात लवकर पक्व होणारी असून साखर उतारा चांगला आहे. तसेच गुळासाठी अति उत्तम आहे. पूर्व हंगामी व सुरु हंगामासाठी अतिशय योग्य आहे. मध्यम काळी व खोल जमिनीत चांगली येते, तसेच सेंद्रिय व रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. पाण्याचा ताण सहन करते. पाने लांब रुंद, देठावर कूस आहे. पानगळ लवकर होते. ऊसाच्या कांड्यावर मेण नाही. पानाच्या देठावर कूस, गवताळ वाढ या रोगास बळी पडते. कानडी कीड, पांढरी माशी, बुडखा कांडी या किडीस ही जात बळी पडते. पाणी साचलेल्या जमिनीत उत्पादन कमी देते.  या जातीमध्ये उत्पादन 50 टन/एकरी. व साखर उतारा 8.5 टन/एकरी. मिळतो.

 

को 8014 (महालक्ष्मी)  - 

या वाणाची पाने लांब, रुंद गर्द हिरवे असून कांड्या मध्यम जाड व लांब असतात. हि जात कोल्हापूर विभागासाठी प्रसारित केली असून लवकर पक्व होणारी, जास्त उत्पादन व साखर उतारा साठी चांगली आहे. पूर्वहंगामी व सुरुसाठी योग्य असून खोल काळ्या निचऱ्याचा जमिनीत चांगला प्रतिसाद देते. हि जात गुळ तयार करण्यासाठी चांगली असून उशिरा तुरा येत असल्याने चांगले उत्पादन देते. या वाणाचे वाढे लांब असून व जास्त असल्याने ऊस काही प्रमाणात लोळतो, उशिरा तुरा येतो. या जातीमध्ये उत्पादन 55 टन/एकरी. पूर्वहंगामी व 40  टन/एकरी. सुरुसाठी मिळते. तसेच साखर उतारा 8 व 6 अनुक्रमे आहे.


कोसी 671 (वसंत) - 

या वाणाची पाने लांब रुंद, देठावर कूस आहे. पानगळ लवकर होते. ऊसाच्या कांड्यावर मेण नाही. ही जात लवकर पक्व होणारी असून साखर उतारा चांगला आहे. तसेच गुळासाठी अति उत्तम आहे. पूर्व हंगामी व सुरु हंगामासाठी अतिशय योग्य आहे. मध्यम काळी व खोल जमिनीत चांगली येते, तसेच सेंद्रिय व रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. पाण्याचा ताण सहन करते. पानाच्या देठावर कूस, गवताळ वाढ या रोगास बळी पडते. कानडी कीड, पांढरी माशी, बुडखा कांडी या किडीस ही जात बळी पडते. पाणी साचलेल्या जमिनीत उत्पादन कमी देते. या जातीमध्ये उत्पादन 50 टन/एकरी. व साखर उतारा 8.5 टन/एकरी. मिळतो. 


कोव्हीएसआय - 03102 -

या जातीची जाडी आणि वजन जास्त असल्याने ऊस उत्पादनात चांगली वाढ मिळते. ऊस तोडणीपर्यंत (14 महिने आणि जास्त) सरळ वाढत (न लोळणारा) असणारी ही जात असल्याने ठिबक सिंचन व्यवस्थापन करणे सोपे जाते. तसेच यंत्राच्या साह्याने लागवड व तोडणी करणे शक्‍य आहे. या जातीला तुरा येत नाही. त्यामुळे ऊस व साखर उत्पादनात घट होत नाही. तोडणी कार्यक्रम उशिरापर्यंत राबविण्यास उपयुक्त आहे. हलक्‍या, मध्यम ते भारी जमिनीत या जातीचे चांगले उत्पादन मिळते. ही जात वाढीच्या अवस्थेत काही प्रमाणात पाण्याचा ताण सहन करते.  या जातीच्या उसात दशीचे प्रमाण आढळून येतात, उसास पांक्षाही फुटत नाहीत. ही जात खोड कीड, कांडी कीड, पिठे कीड व लोकरी मावा या किडींस, तसेच गवती वाढ, पोक्का बोंग लालकूज या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. ही जात काणी व तांबेरा या रोगांना प्रतिकारक आहे. 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जातीपेक्षा उसाचे उत्पादन 21.21 टक्के, साखर उत्पादन 27.26 टक्के जास्त मिळते. खोडवा पिकाचे चांगले उत्पादन मिळते.


Conclusions | सारांश -

सन १९८०-८१ मध्ये उसाची उत्पादकता हेक्‍टरी ९० टनापेक्षा जास्त होती. परंतु, अनेक कारणामुळे ती घटत जाऊन २०११-१२ मध्ये हेक्‍टरी ७७ टनांपर्यंत खाली आली आहे. ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी उसाच्या सुधारित जातींची लागवड आणि  शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे आवश्‍यक आहे


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. गुळ तयार करण्यासाठी उसाच्या कोणत्या जातींची लागवड करावी?

उत्तर - गुळ तयार करण्यासाठी उसाच्या को 8014 (महालक्ष्मी) आणि कोसी 671 (वसंत) जातींची लागवड करावी. 

2. ऊस लागवडीचे तीन हंगाम कोणते?

उत्तर- ऊस लागवडीचे सुरु, पूर्वहंगामी आणि आडसाली असे तीन हंगाम आहेत. 

3. उसाची सुधारित आणि जास्त उत्पादन देणारे वाण कोणते?

उत्तर - को - 86032 हि उसाची जास्त उत्पादन देणारी सुधारित जात आहे. 

4. को - 86032 जातीचा ऊस कसा ओळखावा?

उत्तर- ऊस रंगाने लालसर - पारवा, कांड्या मध्यम जाड, डोळा गोल असतो. पक्व कांड्यांना भेगा पडतात, पाने लांब, रुंद व टोकाला वळलेली असतात.


People also read | हे देखील वाचा - 

1. गव्हाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न

2. ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रण

3. डेलीगेट कीटकनाशकाची संपूर्ण माहिती वापर, फायदे आणि किंमत

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रणलेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी