wheat variety

wheat variety: गव्हाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण  रब्बी हंगामातील गहू पिकाच्या जातींची wheat variety संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये गव्हाचे पीक ( Wheat) बऱ्याच मोठया प्रमाणत घेतले जाते . महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील (Rabbi Season) एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत व बागायत types of wheat अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी वेळेवर पेरणी, योग्य वाणांचा वापर, योग्य प्रकारे खत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या बाबींचा अवलंब करून गव्हाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. यापैकी गहू लागवडीसाठी गव्हाच्या top 5 variety of wheat कोणत्या जातीची निवड करावी याविषयी माहिती पाहणार आहोत. 


गहू बेस्ट वान | wheat variety - 

वाण wheat variety

कालावधी (दिवस)

उत्पादन क्विंटल / एकर

प्रमुख वैशिष्ट्ये wheat variety list

बागायती वेळेवर पेरणी 

त्रंबक (NIAW-301)

115

18 - 20

सरबती वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम, चपातीसाठी       उत्तम, दाणे जाड व तेजदार.

गोदावरी (NIAW-295)

110

18 - 20

बन्सी वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम, रवा, शेवया, कुरडईसाठी उत्तम, प्रथिनांचे प्रमाण 12 टक्के, दाणे मोठे, पिवळसर व तेजदार.

तपोवन (NIAW-917)

115

18 - 20

सरबत्ती वाण sharbati wheat, बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम, चपाती व पावासाठी उत्तम.

फुले समाधान (NIAW-1994)

115

18 - 20

सरबत्ती वाण sharbati wheat, बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम, चपाती व पावासाठी उत्तम.

बागायती उशिरा पेरणी 

कादवा (NI-9947)

100

14 - 16

सरबती वाण sharbati wheat, चपातीसाठी उत्तम, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम.

NIAW-34

100

14 - 16

सरबती वाण sharbati wheat, चपातीसाठी उत्तम, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम, भरपूर फुटवे येतात, सर्व हंगामासाठी यौग्य

NKAW-4627

105

16 - 18

सरबती वाण sharbati wheat, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम, चपातीसाठी योग्य, उशिरा येणाऱ्या तापमानास सहनशील

जिरायती पेरणीसाठी 

गोदावरी (NIAW-15)

110

5 - 6

बन्सी वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम, रवा, शेवई व कुरडईसाठी उत्तम, दाणे जाड, प्रथिने प्रमाण 12 टक्के.

शरद (AKDW-2997-16)

100

5 - 6

बन्सी वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम, रवा, शेवई व कुरडईसाठी उत्तम.

जिरायत किंवा मर्यादित पाण्यावर पेरणीसाठी (पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक पाणी)

नेत्रावती (NIAW-1415)

110

10 - 12

सरबती वाण, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम, चपातीसाठी उत्तम, प्रथिने 12 टक्के



बीजप्रक्रिया | Seed treatment for wheat variety - 

गव्हाच्या बियाण्यास wheat variety पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम ५०% या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति 10 किलो बियाण्यास 5 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश या  जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

BavistinNPK Bacteria


सारांश | Conclusion - 

गहू पिकाचे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढायचे असल्यास खत, पाणी आणि कीड रोग नियोजनासोबतच चांगले उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची wheat variety लागवड केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते. बाजार मागणीनुसार योग्य त्या जातीची लागवड केल्यास चांगला बाजारभाव मिळतो. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. गहू लागवडीसाठी जमीन कशी असावी?

उत्तर –  गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. 

2. गव्हाची पेरणी कधी करावी?

उत्तर - जिरायती गव्हाची पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. 

3. शरबती गहू कसा ओळखाल?

उत्तर – शरबती धान्य चमकदार, ठळक, सोनेरी रंगाचे, रोगमुक्त आणि धान्यावर कमी पिवळे बेरी डाग असलेले , उच्च प्रथिनेयुक्त आणि सर्वात चवदार चपात्या तयार होणारे असते.

4. बागायती गहू पेरणीसाठी कोणते वाण लावावे?

उत्तर - त्रंबक, गोदावरी, तपोवन किंवा फुल समाधान या वाणाची लागवड करावी. 

5. जिरायत गहू पेरणीसाठी कोणते वाण लावावे?

उत्तर - गोदावरी किंवा शरद वाणाची लागवड करावी. 


People also read | हे देखील वाचा - 

1. कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक | कांदा बेसल डोस

2. कांदा पिकामध्ये या फवारण्या अवश्य घ्या | रिजल्टची 100 % गॅरंटी

3. यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण




लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी