pokkah boeng disease of sugarcane

pokkah boeng disease of sugarcane: पोक्का बोइंग रोग नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. “ऊस पिकातील पोक्का बोइंग रोग नियंत्रण.” या लेखामध्ये आपण ऊस पिकातील पोक्का बोइंग pokkah boeng रोगाचे नियंत्रण कसे करावं या बद्दल माहिती घेणार आहोत. ऊस पिकांमधील हा रोग पाऊस व पावसामुळे हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात शक्यतो जुलै ते सप्टेंबर या कालावधित रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.

 

रोगाची लक्षणे : -

1. रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला शेंड्यापासून येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या कोवळ्या पानांवर दिसतो. 

2. पानांच्या खालच्या भागात सुरुवातीला फिक्कट हिरवे, पिवळसर अथवा पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. रोगट पानांचा आकार बदलून त्यांची लांबी कमी होते. 

3. खोडाकडील भाग आखूड होऊन पाने एकमेकांत गुरफटली जातात. त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नाहीत. 

4. रोगाची तीव्रता जास्त असल्यास कांडी आखूड होते. शेंडा कूज व काडी कापाची लक्षणे दिसतात. 

5. रोगग्रस्त उसामध्ये शेंड्याकडील भाग चाबका सारखा वाळलेला दिसून येतो. अग्र भागाच्या ऊती कुजल्यामुळे उसाच्या बाजूचे डोळे फुटून वाढलेले दिसतात. 

6. ऊस वाढीच्या पेशी मेल्यानंतर बुरशी बाजूच्या पेशीमध्ये वाढत राहते, त्यामुळे वरील पाने मर लागलेल्या रोगाप्रमाणे पिवळसर दिसू लागतात. शेंडा कूज झालेला ऊस पूर्ववत होत नाही. 


रोगामुळे ऊसावर होणार परिणाम : -

1. उसाच्या टोकाकडील काही कांड्याची लांबी कमी झाल्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. 

2. pokkah boeng रोगाचे प्रमाण अधिक असल्यास काही जातीमध्ये मर दिसू शकते. 

3. रोगामुळे उंची, वजन, रसाचे प्रमाण, जाडी, आणि साखरेचे प्रमाण इत्यादी घटकावर विपरीत परिणाम होतो.


पोक्का बोइंग रोग प्रसार : pokkah boeng disease of sugarcane -

1. रोगाचा प्रसार फ्युजॅरीयम मोनिलीफॉरमी आणि फ्युजॅरीयम सॅकॅरी या बुरशीमुळे होतो. 

2. रोग हवेद्वारे पसरतो. वाढलेल्या आद्रतेमुळे हा रोग पानावर दिसून येतो. 

3. रोगाची वाढ पावसाळ्याच्या सुरुवातीला उष्ण दमट हवामानात चांगली होते. या काळात उसाची वाढ सुद्धा झपाट्याने होत असते. 

4. तीन ते सात महिन्याचे पीक रोगास बळी पडते. काही काळ हवामान उष्ण, कोरडे व त्यानंतर आर्द्रतायुक्त असल्यास पाने लवकर करपतात. 

5. हवेतील आर्द्रता 70 ते 80 टक्के ढगाळ हवामान रिमझिम पाऊस pokkah boeng रोग वाढीस अनुकूल असते. 

6. रोग कारक बुरशीचे बीजाणू उसाच्या पानावर पडून पाण्याबरोबर शेंड्यात जातात. साधारण एक महिन्यानंतर रुजून शेंड्याकडील भागात प्रादुर्भाव करतात. 

7. कवकतंतू कोवळ्या पानाच्या ऊती मध्ये शिरल्यामुळे त्या मरतात. त्यानंतर हे कवकतंतू पानातून खोडामध्ये शिरतात. रोगाचा दुय्यम प्रसार हवेतील बीजाणू द्वारे होतो. 


पोक्का बोइंग रोग नियंत्रण : pokkah boeng disease of sugarcane -

1. निरोगी बेण्याची लागवड करावी. 

2. को-86032  या जातीवर कमी प्रमाणात रोग येतो असे दिसून आले आहे. 

3. शेंडा कूज झालेले ऊस काढून नष्ट करावेत. 

4. खालील कोणत्याही एका रासायनिक बुरशीनाशकांची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून आलटून पालटून  10 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.


- क्रिस्टल बाविस्टिन (कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी) - 20 ग्रॅम 

- क्रिस्टल ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% डब्लूपी) 30 ग्रॅम 

- इंडोफिल एम 45 (मैनकोजेब 75 % डब्ल्यूपी) 45 ग्रॅम 

Crystal BavistinCrystal Blue CopperIndofil M45


Conclusion | सारांश -

ऊस पिकावरील पोक्का बोइंग रोगाचा pokkah boeng disease of sugarcane प्रादुर्भाव पावसाळ्यात शक्यतो जुलै ते सप्टेंबर या कालावधित जास्त आढळून येतो कारण हवेतील आर्द्रता 70 ते 80 टक्के ढगाळ हवामान रिमझिम पाऊस रोग वाढीस अनुकूल असते. रोगामुळे उंची, वजन, रसाचे प्रमाण, जाडी, आणि साखरेचे प्रमाण इत्यादी घटकावर विपरीत परिणाम होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी १० दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी घेतल्यास रोग नियंत्रणात येतो. 


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

1. पोक्का बोइंग रोगाची लक्षणे काये आहेत?

ऊत्तर - सुरुवातीला शेंड्यापासून येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या कोवळ्या पानांच्या खालच्या भागात फिक्कट हिरवे, पिवळसर अथवा पांढरट पट्टे अथवा ठिपके दिसतात. खोडाकडील भाग आखूड होऊन पाने एकमेकांत गुरफटली जातात. 

2. रोगामुळे ऊसावर काय परिणाम होतो?

ऊत्तर - रोगामुळे उंची, वजन, रसाचे प्रमाण, जाडी, आणि साखरेचे प्रमाण इत्यादी घटकावर विपरीत परिणाम होतो.

3. रोगाचा प्रसार कधी होतो?

ऊत्तर - रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात शक्यतो जुलै ते सप्टेंबर या कालावधित जास्त आढळून येतो. 

4. कोणते वातावरण रोगास अनुकूल असते? 

ऊत्तर -  हवेतील आर्द्रता 70 ते 80 टक्के ढगाळ हवामान रिमझिम पाऊस रोग वाढीस अनुकूल असते.

5. पोक्का बोइंग रोगाच्या नियंत्रसाठी कोणती फवारणी  घ्यावी?

ऊत्तर - बाविस्टीन, ब्लु कॉपर, एम 45 या बुरशीनाशकाची आलटून पालटून १० दिवसाच्या अंतराने फवारणी  घ्यावी. 


People also read | हे देखील वाचा - 

1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

2. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे

3. शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

4. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा. 

5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?



लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी