gogalgai niyantran

शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे.  या लेखामध आपण शंखी गोगलगाय नियंत्रण कसे करावे gogalgai niyantran या बद्दल जाणून घेणार आहोत.  पावसाळा हंगामात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत गोगलगाय सोयाबीन, कापुस, पपई, केळी, वाल, दोडका काकडी या सारखी वेलवर्गीय पिके, वांगी, भेंडी, मिरची, कोबी, फुलकोबी व सर्वप्रकारच्या पालेभाज्या, ऊस रोपवाटीकेतील रोपे, ऊगवून आलेली नवती पाने फुले कंद यामध्ये खाण्यासाठी छिद्र करतात. तसेच बीयापासून अंकुरीत कोवळे टोब यांना कुरतडून खातात. यामुळे उपद्रव होऊन तसेच कुरतडलेल्या ठिकाणी बुरशीचा प्रार्दुभाव होऊन लहान रोपे मरतात. यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्के घट येते.

शंखी (Snail) तसेच शेंबडी (Slugs) हे प्राणी मालुस्का या वर्गातील किडी आहेत. शंखी shankhi gogalgay गोगलगायीच्या अंगावर कवच असते तर शेंबडीच्या अंगावर कवच नसते. शंखीच्या पाठीवर एक ते दिड इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी शंखी गर्द, करडया, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. शंखी गोगलगाय आफ्रिकन जॉइन्ट स्नेल या नावाने परिचित असून, तिचे शास्त्रीय नाव अचेटिना फुलिका आहे. ती निरनिराळया 500 वनस्पती खाऊन उपजिविका करते. 

गोगलगाय किडीस पाय नसतात त्या सरपटत चालतात व चालतांना सतत शेंबडासारखा चिकट स्त्राव सोडते, त्यामुळे त्यांना पुढे सरकणे सोपे जाते. ही किड दिवसा ती दगड, पालापाचोळयाच्या खाली, झाडाच्या खोडाभोवतालच्या दाट गवतात, जमिनीला लागून झाडाच्या असलेल्या फांद्या खाली इ. ठिकाणी लपते  तर रात्रीच्या वेळी सक्रीय राहून पिकाचे नुकसान करते. 

जीवनक्रम : -

पुर्ण वाढ झालेल्या शंखीची लांबी 15 ते 17.5 सेंमी असते. सर्व गोगलगायी हया बहुलिंगी असून त्या अंडी देण्यास सक्षम असतात. अंडी गोलाकृती व पांढऱ्या रंगाची साबुदान्यासारखी असतात. एक मादी सरासरी 70 ते 100 अंडी एकाचवेळी पिकाच्या खोडाशेजारी किंवा मुळाजवळ भुसभुशीत मातीत 3 ते 5 सेंमी खोलीचे छिद्र करून अंडी घालते. अशाप्रकारे एक मादी वर्षातून 6 वेळा अंडी देते. या किडीची एक वर्षात पूर्ण वाढ होते. गोगलगाय तीन ते चार दिवसात 100 ते 400 अंडी देते. अंडी देण्यासाठी मिलनाची आवश्यकता नसते. मिलनासाठी ते योग्य साथीदाराची निवड करून एकमेकांशी सहा ते आठ दिवस मिलन करतात. सर्वसाधारण 17 दिवसापर्यत अंडयातुन पिल्ले बाहेर येतात. त्यांची वाढ पुर्ण होण्यास आठ महिने ते एक वर्ष कालावधी लागतो. या काळात ही पिल्ले पिकांचे नुकसान करतात. शंखी रात्रीच्या वेळी कार्यक्षम असते. दिवसा ती सावलीमध्ये पानाखाली किंवा ओल्या जागी आढळते. शंखी अती थंड किंवा अती उष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुद्रयाने बंद करून झाडाला / भिंतीला चिटकून सुप्तावस्थेत जाते. 

प्रसार : -

या किडीचा प्रसार शेतामध्ये वापरात असणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर ट्रॉली, तसेच अन्य साधनांमधुन होतो. तसेच ते वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे प्लॉस्टीकचे ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळु, कलम, रोपे, बेणे, ऊस, मास आदीमार्फतही होतो. गोगलगायी सर्वसाधारणपणे अन्नपाण्याशिवाय 4 ते 6 महिने जिवंत राहु


गोगलगाय नियंत्रण उपाय योजना | gogalgai niyantran

अ. सामूहिक मशागतीचे नियंत्रण : -

1. उन्हाळ्यात खोल नांगरट करावी. 

2. पिवळट पांढऱ्या रंगाची शाबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत. 

3. शेतावरील बांध स्वच्छ ठेवावेत. 

4. शेताभोवती 2 मी. पट्टयात राख, मोरचूद व चुना यांचे मिश्रण पसरावे. 

5. शेतामध्ये 7 ते 10 मीटरवर वाळलेले गवत, पपईचा पाला, गोणपाट, कुजलेली लाकडे, भाजीपाला यांचे ढीग ठेवावेत. 

6. सुर्यादयापूर्वी रात्रीनंतर गोगलगाय या ठीगाखाली आश्रय घेतात. या ढिगाखालील गोगलगाय मीठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. 

7. फळबागेतील उपद्रव टाळणेसाठी 10 % बोर्डोपेस्ट बुंध्याला लावावी. 

8. लहान गोगलगाय नियंत्रणासाठी मीठ 5% द्रावण फवारणीची शिफारस आहे. 


ब. जैविक उपाय : -

1. गोगलगायींच्या नैसर्गिक शत्रूंचे संवर्धन करावे. उदा. कोंबडी, बदक

2. पाच टक्के सोपनटचे ( शिकाकाई फळ )  द्रावण करून फवारणी केल्यास नियंत्रण होते. 


क. रासायनिक उपाय : -

कापूस, सोयाबीन पीकावरील गोगलगाय नियंत्रणासाठी स्नेल किल (मेलाल्डिहाईड) 2 किलो प्रति एकर + 10 लि. पाणी + 2 किलो गुळ + 25 ग्रॅम यीस्ट + 50 किलो गव्हाचे काड 10 - 12  तास भिजत घालून त्यामध्ये 50 ग्राम अरेवा (थायामेथोक्साम) मिश्रण करून पट्टयात छोटे छोटे ढीग केल्यास प्रभावी नियंत्रण करता येते.


Conclusion | सारांश -

खरिफ हंगामध्ये हंगामामध्ये भाजीपाला पिकांचे रात्रीच्या वेळी नुकसान करणारी कीड म्हणजे शाखीय गोगलगाय. या किडीचे एकात्मिक नियंत्रण केल्यास नियंत्रित येऊ शकते. आशा करतो की Bharatagri krsuhi Dukan वेबसाइट वरील आमचा आजचा “शंखि गोगलगायचा (shankhi gogalgay) प्रकोप वाढलाय!  जाणून घ्या कोणत्या उपाय योजना कराव्यात.” हा लेख तुम्हाला आवडला असेल तर याला तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

1. शंकी गोगलगाय कोणत्या पिकाचे नुकसान करते?

उत्तर - शंकी गोगलगाय खरिफ पिके - सोयाबीन, कापूस इ., फळपिके - पपई, केळी इ., भाजीपाला पिके - वांगी, भेंडी, मिरची, कोबी, फुलकोबी, वेलवर्गीय भाजीपाला पिके तसेच ऊस पिकाचे नुकसान करते. 

2. गोगलगाय पिकाचे कश्याप्रकारे नुकसान करते ?

उत्तर - गोगलगाय रोपवाटीकेतील रोपे, ऊगवून आलेली नवती पाने फुले कंद यामध्ये खाण्यासाठी छिद्र करून पिकाचे नुकसान करतात.

3. शंखी (Snail) व शेंबडी (Slugs) गोगलगाय कशी ओळखावी ?

उत्तर - शंखी गोगलगायीच्या अंगावर कवच असते तर शेंबडीच्या अंगावर कवच नसते. 

4. गोगलगायचे जैविक नियंत्रण कसे करावे ?

उत्तर - सोपनटचे 5 टक्के पाणी प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.  

5. गोगलगायचे रासायनिक नियंत्रण कसे करावे ?

उत्तर - स्नेल किल (मेलाल्डिहाईड) 2 किलो प्रति एकर + 10 लि. पाणी + 2 किलो गुळ + 25 ग्रॅम यीस्ट + 50 किलो गव्हाचे काड 10 - 12  तास भिजत घालून त्यामध्ये 50 ग्राम अरेवा (थायामेथोक्साम) मिश्रण करून पट्टयात छोटे छोटे ढीग केल्यास प्रभावी नियंत्रण करता येते.

 

People also read | हे देखील वाचा - 

1. वाणी/पैसा कीड (millipede insect) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

2. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?

3. बीजप्रक्रिया (seed treatment) करण्याच्या पद्धती आणि फायदे

4. ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख किडींपैकी खोड कीड early shoot borer in sugarcane हि अत्यंत महत्वाची कीड आहे.


लेखक

भारतअ‍ॅग्री कृषि एक्स्पर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी