cotton red leaf disease

cotton red leaf disease: कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा.

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. “कापसाची पाने लाल झाली आहेत? मग या उपाय योजना नक्की करा.” या लेखामध्ये आपण कापूस पिकातील लाल्या विकृती cotton red leaf disease बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये खरिफ हंगामातील कापूस हे नगदी पीक आहे. कपाशीची लागवड महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागामध्ये केली जाते. 

पानेलाल पडण्याच्या क्रियांमध्ये reddening of cotton leaves सुरुवातीला पानांचे कडा पिवळ्या रंगाच्या होतात आणि नंतर शिरांमधील जागा लाल होते आणि शेवटी पानेगळून पडतात. या मध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे की एकदा पानलाल पडले तर ते पुन्हा हिरवे होत नाही. त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

 

कापसाची पाने लाल का होतात ?

1. जमिनीची निवड : उत्पादन क्षमता अधिक असलेल्‍या बी टी वाणांची लागवड हलक्‍या जमिनीत केल्‍यास उपलब्‍ध अन्‍नद्रव्‍यांच्‍या कमतरतेमुळे पाने लाल leaf reddening in cotton होण्‍याची लक्षणे दिसून येतात.

2. पाणथळ चिबाड जमिनीवर कपाशी पिकाची लागवड केल्‍यास झाडांना अन्‍नद्रव्‍ये शोषणास अडथळा होतो. चिबाड जमिनीत पाण्‍यासोबत नत्राचे वहन होऊन निचरा झाल्‍यामुळे नत्राच्‍या कमतरतेमुळे पाने लाल होतात.

3. जमिनीतील ओलाव्‍याच्‍या अभावामुळे किंवा पाण्याचा निचरा न झाल्यास मातीमधून अन्नद्रव्ये शोषली जाऊ शकत नाही. परिणामी प्रकाश संश्‍लेषण कमी होते. अन्‍नद्रव्‍यांच्‍या अभावामुळे पानातील अन्‍नद्रव्‍यांचे विघटन होऊन पाने लालसर होऊन गळतात.

4. हवामान : जमिनीतील ओलाव्‍याची कमतरता व रात्रीच्‍या वेळी तापमान 15 डिग्री से. पेक्षा कमी झाल्‍यास पानातील हरितद्रव्‍याचे विघटन होऊन अँथोसायनीन हे रंगद्रव्‍य तयार होते. या रंगद्रव्‍यामुळे पानांना लाल रंग येतो.

5. अन्‍नद्रव्‍यांची कमतरता : खतांची मात्रा शिफारशीप्रमाणे  न दिल्‍यास अन्‍नद्रव्‍यांच्‍या कमतरेमुळे बोंडे लागणे व बोंडे फुटण्‍याच्‍या वेळी झाडाची पाने लाल होतात.

6. जमिनीतील नत्राचे प्रमाण कमी झाल्‍यामुळे बोंडे लागणे व पक्‍व होण्‍याच्‍या काळात नत्राची आवश्‍यकता पुर्ण होण्‍यासाठी झाडाच्‍या खालच्‍या पानांतील नत्राचे बोंडांकडे वहन होते. त्‍यामुळे जुनी पाने पिवळसर होऊन त्‍यांना लालसर रंग येतो.

7. मॅग्‍नेशिअम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांच्‍या शिरांमधील भाग लाल होतो.

8. तुडतुडयांचा प्रधुरभाव झाल्यास ते पानातील रस शोषून घेतल्यामुळे पानाच्‍या कडा लाल होऊन, नंतर पुर्ण पान लाल होते. 

 

लाल्‍या cotton reddening टाळण्‍यासाठी उपाययोजना : 

1. पिक फेरपालट - कापुस पीक घेण्‍यापुर्वी जमिनीमध्‍ये जास्‍त अन्‍नद्रव्‍ये शोषुन घेणारी मका, ऊस, केळी अशी पीके घेतलेली असल्‍यास अशा जमिनीत सेंद्रीय द्रव्‍याचे प्रमाण कमी होते. जमिनीत सामु वाढल्‍यास या जमिनीत नत्र, सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये यांचे शोषण कमी होते, त्‍यामुळे कापुस पीक घेण्‍यापुर्वी मुग, उडीद, सोयाबीन, ज्‍वारी, बाजरी ही पीके घ्‍यावीत. कपाशीचा खोडवा घेऊ नये.

2. पिकांच्‍या संतुलीत अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍‍थापन पध्‍दतीनुसार रासायनिक खतासोबत शेणखत किंवा कंपोस्‍ट खत, हिरवळीची खते, जीवाणु खते - एनपीके मायक्रोबियल लिक्विड कन्सोर्टिया  1 लिटर प्रति एकरी वापर केल्‍यामुळे जमिनीमध्‍ये अन्‍नद्रव्‍यांची उपलब्‍धता वाढते तसेच जलधारणशक्‍ती व सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍याचे प्रमाण वाढते.

3. जमिन : चिबाड व हलक्‍या जमिनीमध्‍ये कपाशीची लागवड करू नये. मातीची खोली कमी असल्‍यास मुळांची वाढ कमी होते. अश्या वेळी फुल किंवा बोन्डे लागताना ह्यूमिक ऍसिड - 200 ग्राम प्रति एकरी खतासोबत मिसळून किंवा ड्रेंचिंग मार्फत द्यावे. 

4. कपाशीची पेरणी उशीरा केल्‍यास बोंडे लागण्‍याचा कालावधी ऑक्‍टोबर – नोंव्‍हेंबर महिन्‍यात येतो. या काळात रात्रीचे तापमान कमी असते, त्‍यामुळे पेरणी वेळेवर करावी.

5. नत्राचे व्‍यवस्‍थापन : कपाशीमध्‍ये व्दिदलवर्गीय पीकांचा आंतरपीक म्‍हणुन अंतर्भाव करावा. पेरणीपुर्वी एनपीके मायक्रोबियल लिक्विड कन्सोर्टिया प्रती कीलो बियाण्‍यास 10 मिली या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. नत्रयुक्‍त खतांच्‍या मात्रा विभागुन दयाव्‍यात. 12:61:00 या खतांची 5 ग्राम प्रति लिटर पाणी प्रमाणात पाते व बोंडे लागतांना फवारणी करावी. परिणामकारक तणनियंत्रण व आंतरमशागत यामुळे अन्‍नद्रव्‍यांची उपलब्‍धता वाढते.

6. पेरणीपुर्वी मातीची तपासणी करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी. मातीमध्‍ये मॅग्‍नेशिअमची कमतरता असल्‍यास एकरी 8 किग्रॅ मॅग्‍नेशियम सल्‍फेट जमिनीतुन द्यावे.

7. फुले व बोंडे लागतांना मॅग्‍नेशियम सल्‍फेटची प्रती 10 लिटर पाण्‍यात 25 ग्रॅम फवारणी करावी किंवा चिलेटेड मॅग्नेशियम 1 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी kapus lalya rog favarni करावी. 

8. जमिनीत पाण्‍याची उपलब्‍धता वाढविण्‍यासाठी जलसंधारण पध्‍दतीचा अवलंब करावा. पावसाचा खंड पडल्‍यास उपलब्‍धेनुसार पाणी द्यावे. 

9. तुडतुड्यांचा प्रधुरभाव असल्यास खालील पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची फवारणी प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. kapus lalya rog favarni


👉बायर सोलोमन (बीटा-साइफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी) - 15 मिली 

👉बायर कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.एसएल) - 10 मिली 

👉बायर अलेंटो (थियाक्लोप्रिड 240 एससी) - 8 मिली 

👉धानुका पेजर (डायफेंथियुरॉन 50% डब्ल्यूपी) - 25 ग्राम

👉पीआय रॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + साइपरमेथ्रिन 4% ईसी) - 30 मिली 

👉यूपीएल लांसर गोल्ड (एसेफेट 50% + इमिडाक्लोप्राइड 1.8 % एसपी) - 30 ग्राम

Bayer Solomon Insecticideकॉन्फिडोर | ConfidorBayer Belt Expert

Dhanuka Pager InsecticidePI Roket InsecticideUPL Lancer Gold

 

Conclusion | सारांश -

कापूस पिकाची पाने लाल होण्याची समस्या ( कापूस लाल्या रोग नियंत्रण ) फुल किंवा बोन्डे लागल्यानंतर येते. नैसर्गिक ताण - तणाव, पुरेश्या अन्नद्रव्यांचा अभाव, रस शोषक किडींचा प्रधुरभाव या मुळे होतो. लेखा मध्ये सांगितलेल्या उपायजोना केल्यास लाल्याचा cotton reddening प्रधुरभाव कमी करता येऊ शकतो. 


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

1. कापूस पिकातील लाल्या रोग म्हणजे काय?

ऊत्तर - अन्नद्रव्यांची (मॅग्नेशियम) कमतरता, नैसर्गिक ताण तणाव या कारणामुळे पाने लाल होऊन गळुन पडतात याला लाल्या रोग म्हणतात. 

2. लाल्या रोगाची लक्षणे काय आहेत?

ऊत्तर - सुरुवातीला पानांचे कडा पिवळ्या रंगाच्या होतात आणि नंतर शिरांमधील जागा लाल होते आणि शेवटी पानेगळून पडतात. 

3. लाल्या रोग पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये येतो?

ऊत्तर - लाल्या रोग फुल किंवा बोन्डे लागण्याच्या अवस्थेनंतर येतो. 

4. लाल्या रोग येऊ नये म्हणून काय करावे? 

ऊत्तर -  शिफारसीनुसार खते द्यावी, लागवडीच्या वेळी मॅग्नेशियम सल्फेट ८ किलो प्रति एकरी द्यावे. 

5. कापूस लाल्या रोग नियंत्रण कोणती फवारणी kapus lalya rog favarni घ्यावी?

ऊत्तर - चिलेटेड मॅग्नेशियम 1 ग्राम + 12:61:00 5 ग्राम + बायर कॉन्फिडोर 10 मिली  प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 

EDTA Chelated MagnesiumMahadhan 12:61:00Bayer Confidor


People also read | हे देखील वाचा - 

1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

2. vermicompost: गांडूळ खत निर्मितीची सोप्पी पद्धत आणि फायदे

3. शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

4. वाणी/पैसा कीड (millipede insect) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?
लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी