नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आजच्या लेखात आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर (पीजीआर) बायर प्लॅनोफिक्सचे planofix bayer फायदे आणि वापरण्याच्या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये बायर प्लानोफिक्स (अल्फा नॅफथिल ऍसिटिक ऍसिड 4.5 एसएल) फवारणीचे उपयोग आणि फायदे याबद्दल जाणून घेणार आहोत.
बायर प्लानोफिक्स । planofix bayer । planofix content -
बायरचे प्लॅनोफिक्स planofix bayer हे द्रावण स्वरूपात असून त्यामध्ये अल्फा नॅफ्थाइल ऍसिटिक ऍसिड 4.5% (w/w) सक्रिय घटक आहे. हा ऑक्सिन ग्रुपचा (प्लांट ग्रोथ रेग्युलेटर) एक वनस्पती वाढ नियंत्रक आहे जे फुलांची संख्या वाढवण्याची तसेच फुलांची आणि अपरिपक्व फळांची गळ रोखण्यासाठी वापरला जाते. त्यामुळे फळांचा आकार, गुणवत्ता आणि उत्पादन वाढण्यास आणि सुधारण्यास मदत होते.
प्लानोफिक्स चे कार्य । planofix bayer uses in marathi -
1. फुलांची संख्या वाढण्यास मदत होते.
2. फुल आणि फळांची होणारी गळ कमी होते.
3. उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
4. हे पाने पडणे आणि फळ गळणे प्रतिबंधित करते.
5. अननस आणि द्राक्ष पिकामध्ये फळांचा आकार आणि वजन वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.
उत्पादनाचे नाव |
बायर प्लानोफिक्स (Planofix Bayer) |
कंपनीचे नाव |
बायर क्रॉप साइंस |
रासायनिक संरचना |
Alpha Napthyl Acetic Acid 4.5 SL (4.5 % w/w) |
उत्पादनाचा प्रकार |
Plant Growth Regulator (प्लांट ग्रोथ रेग्युलेटर) |
वापरण्याचे प्रमाण |
4.5 मिली/पंप किंवा 45 मिली/एकर |
पिके |
अननस, टोमॅटो, मिरची, आंबा, द्राक्ष |
वापरणाचा विधी |
फवारणी |
किंमत planofix price |
339 (250 मिली) planofix 250ml price |
वापरण्याचे प्रमाण -
1. प्लानोफिक्स प्रति एकर 45 मिली 150 ते 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2. प्रति पिंप फवारणी करायची असल्यास 4.5 मिली फवारणी करावी.
3. प्लॅनोफिक्सची पहिली फवारणी फुले येण्याच्या वेळी करावी आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 20 ते 25 दिवसांनी गरजेनुसार करावी.
पिकानुसार फवारणी कधी घ्यावी । planofix use in marathi -
अननस -
1. फुल येण्याच्या वेळी
2. फळ काढण्याच्या दोन महिने आधी फळावर फवारणी करावी.
टोमॅटो -
1. फुले येण्याच्या वेळी
2. पहिल्या फवारणी नंतर 15 दिवसांनी
मिरची -
1. फुले येण्याच्या वेळी
2. पहिल्या फवारणी नंतर 20 दिवसांनी
आंबा -
1. मोहोर येण्याच्या ३ महिने आधी
2. फळे वाटाणा आकाराची असताना
द्राक्ष -
1. छाटणीच्या वेळी
2. फुले येण्याच्या वेळी
3. द्राक्ष काढणीच्या 10 - 15 दिवस आधी फवारणी करावी.
प्लानोफिक्स planofix bayer वापरताना घ्यावयाची खबरदारी -
1. प्लानोफिक्सचा वापर स्वच्छ पाण्याने करावा.
2. प्लानोफिक्स संध्याकाळी वापरावे.
3. बायर प्लानोफिक्स वापरताना जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे.
4. शिफारसीत प्रमाणापेक्षा जास्त मात्र घेऊ नये.
5. फवारणीच्या वेळी पाऊसाचे वातावरण झाल्यास फवारणी टाळावी.
Conclusion | सारांश -
बायर कंपनीचे प्लॅनोफीक्स (अल्फा नॅफथिल ऍसिटिक ऍसिड 4.5 एसएल) हे एक वाढ नियंत्रक असून फुल अवस्थेमध्ये याचा वापर केल्यास फुलांची संख्या जास्त लागते तसेच फुल आणि फळांची होणारी गळ थांबून फळाची गुणवत्ता सुधारून उत्पादनामध्ये वाढ होते.
People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न -
1. प्लॅनोफीक्सची रासायनिक संरचना काय आहे?
ऊत्तर - अल्फा नॅफथिल ऍसिटिक ऍसिड 4.5 एसएल
2. बायर कंपनीचे प्लॅनोफीक्स काय आहे?
ऊत्तर - बायर कंपनीचे प्लॅनोफीक्स (अल्फा नॅफथिल ऍसिटिक ऍसिड 4.5 एसएल) हे एक वाढ नियंत्रक आहे.
3. प्लॅनोफीक्सचा वापर कधी करावा?
ऊत्तर - प्लॅनोफीक्सचा वापर फुल येण्याच्या वेळी १० दिवसाच्या अंतराने दोन वेळा करावा.
4. प्लॅनोफीक्सच्या वापराने पिकामध्ये काय बदल होतो?
ऊत्तर - फुलांची संख्या जास्त लागते तसेच फुल आणि फळांची होणारी गळ थांबून फळाची गुणवत्ता सुधारून उत्पादनामध्ये वाढ होते.
5. प्लॅनोफीक्स कसे वापरावे?
ऊत्तर - फुल अवस्थेमध्ये 4.5 मिली प्रति 15 लिटर पंप फवारणी करावी.
People also read | हे देखील वाचा -
1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !
2. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे
3. शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती
4. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा.
5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?
लेखक
भारतअॅग्री कृषि एक्सपर्ट