potato harvesting

potato harvesting: बटाटा काढणी व साठवणूक व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण बटाटा काढणी नियोजन आणि साठवणूक (Post harvesting) व्यवस्थापना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बटाटा काढणी कधी करावी, कोणत्या पद्धतीने करावी आणि काढणी झाल्यानंतर बटाटा साठवणूक कशी करावी  या विषयी माहिती पाहूया. 

कंदवर्गीय पिकामध्ये बटाटा हे महत्वाचे कंद वर्गीय पीक आहे. बटाटा चांगल्या स्तिथीमध्ये राहण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी बटाटा काढणीनंतर त्याची चांगल्या ठिकाणी साठवण करणे गरजेचे आहे.  बटाट्याची साठवणूक (potato harvesting) योग्यरित्या केल्यास ते सहा महिने किंवा त्याहून अधिक वेळ चांगले राहू शकतात.

हंगामानुसार बटाटा काढणीचा काळ बदलत असतो. साधारणपणे बटाटे 90 ते 100 दिवसांत (Potato harvesting time) काढणीस येतात. खरीप हंगामामध्ये लागवड केलेला बटाटा नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये काढणीस तयार होतो. तर रब्बी हंगामामध्ये लागवड केलेला बटाटा मार्च ते एप्रिलमध्ये काढणीस तयार होतो. बटाटा जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात झाल्यावर आणि पूर्णपणे पिकल्यावर काढणी करावी. कोरड्या हवामानात बटाटा पिकाची काढणी करावी. काढणीआधी सुमारे 20 दिवस पाणी देण्याचे बंद करावे. त्यामुळे बटाट्याची साल घट्ट तयार होते तसेच ओलसरपणा कमी होतो. काढणीपूर्वी बटाट्याची झाडे जमिनीलगत कापून घ्यावीत, 5-6 दिवसांनी बटाट्याची काढणी करावी. त्यामुळे बटाट्याची साल निघत नाही व वाहतुकीत बटाटा चांगला राहतो.


बटाटे काढणीच्या पद्धती


अ) पोटॅटो डिगरच्या सहय्याने बटाटे काढणे -

ज्या शेतकऱ्यांचे बटाटा लागवडीखालील क्षेत्र खूप जास्त आहे अशा वेळी ‘पोटॅटो डिगर’ या यंत्राच्या सहय्याने बटाटा पिकाची काढणी करतात. या पद्धतीने काढणी केल्यास कमी खर्चात, कमी वेळेत काढणी होतेच. शिवाय प्रतवारीनुसार विभागणही केली जाते. 

ब) लाकडी कुळव / नांगर / रिजरच्या सहय्याने बटाटे काढणे -

ज्या शेतकऱ्यांचे बटाटा लागवडीखालील क्षेत्र कमी आहे अशा वेळी  सरीतून नांगर किंवा रिजर चालवून बटाटा पिकाची काढणी करावी. या काढणी पद्धतीमुळे जमिनीतील बटाटे खराब न होता जमिनीवर येतात. उर्वरित बटाटे बाहेर येण्याकरिता दुसऱ्यांदा पुन्हा त्याच सरीमध्ये नांगर किंवा रिजर चालवावा. जमिनीवर आलेले बटाटे वेचून घ्यावेत.

क) कुदळीच्या सहय्याने बटाटे काढणे -

ज्या शेतकऱ्यांचे बटाटा लागवडीखालील क्षेत्र खूप जास्त आहे अशा वेळी कुदळीच्या सहय्याने बटाटा पिकाची काढणी करतात. बटाटा काढणी पद्धतींपैकी ही सर्वांत सोपी पद्धत असली तरी या पद्धतीने बटाटे काही प्रमाणात चिरतात, त्यांची साल निघते. परिणामी बटाट्यांची गुणवत्ता खालावते.


बटाटा प्रतवारी

1. बटाटा काढणीनंतर त्याची प्रतवारी करावी. 

2. प्रतवारीमुळे बटाट्याचे वर्गीकरण होते आणि त्यानुसार त्याची विक्री किंवा वापर केला जातो. 

3. प्रतवारीमुळे बटाट्याच्या गुणवत्तेचे संरक्षण होते आणि त्याचे नुकसान कमी होते. 

4. प्रतवारीमुळे बटाट्याची वाहतूक आणि साठवण (potato storage) सोपी होते. त्यामुळे बटाटा काढणीनंतर त्याची प्रतवारी करून घ्यावी. 

5. प्रतवारी करताना बटाट्याचा आकार, वजन, रंग आणि गुणवत्ता यानुसार वर्गीकरण करावे.


बटाटे साठवणीच्या पद्धती | best way to store potatoes


अ) शीतगृह -

1. शीतगृहामध्ये बटाटे साठवल्यास (potato storage) बटाट्यांची उगवणक्षमता टिकून राहते. 

2. बटाट्यांचा पुरवठा जास्त काळपर्यंत करता येतो. 

3. शीतगृहामध्ये 1.5-5 अंश सेल्शिअस तापमान आणि 85 टक्के सापेक्ष आर्द्रता असल्यास 6 ते 12 महिनेपर्यंत बटाटे साठवून ठेवता येतात. 

4. बटाट्याचे कोंब 1.5 अंश सेल्शिअस तापमानात 1 वर्षाहूनही जास्त काळ आणि 5 अंश सेल्शिअस तापमानात 30 आठवडे सुप्तावस्थेत राहू शकतात. 

5. शीतगृहातून बाहेर काढल्यावर थोड्या अवधीमध्ये चांगल्या रीतीने फुटून येतात. या पध्दतीमध्ये 5 टक्क्यापेक्षा जास्त बटाटे वाया जात नाहीत. 

6. बटाटे टणक राहतात व ते पोखरणारी अळी त्यातील तापमानात जिवंत राहत नाही. परंतु पाने वळणे या रोगाचा व्हायरस आणि गरवा करपा या रोगाचे कवक शीतगृहातील तापमानामध्ये क्रियाशील राहतात.

ब) सामान्य साठवण -

1. बटाटा साठवण्यासाठी थंड, कोरडे आणि हवाबंद जागेची निवड करावी. 

2. साठवण जागेची उंची कमीत कमी 60 सें.मी. असावी. बटाटा साठविण्यासाठी जागेत 25 ते 30 सें.मी. अंतर ठेवावे.त्या जागी 5 ते 6 सें.मी. जाडीचा गवताचा थर टाकावा. त्यानंतर बटाटा पसरवावा. 

3. बटाट्याचे थर टाकल्यावर त्यावर पुन्हा गवताचा थर टाकावा. असे थर टाकून बटाटा साठवू शकता.

4. बटाटा साठवणुकीसाठी 60 ते 65 टक्के आर्द्रता आणि 10 ते 12 अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे.

5. बटाटा साठवणुकीसाठी वाळू, चांगल्या दर्जाचे शेणखत किंवा प्लॅस्टिकचा वापर करता येईल.


Conclusions | सारांश -

बटाटा काढणी आणि साठवण प्रक्रिया (potato harvesting)  हे एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. बटाट्याची गुणवत्ता आणि दीर्घायुष्य टिकवून ठेवण्यासाठी योग्य वेळी कापणी करणे, योग्य हाताळणीचे तंत्र वापरणे आणि प्रभावी साठवण पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे. स्टोरेज दरम्यान पुरेसा योग्य तापमान आणि आर्द्रता नियंत्रण आणि नियमित देखरेख बटाटा खराब होण्यापासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. काढणी आणि साठवणीच्या (potato storage) सर्वोत्तम पद्धती लागू केल्याने वर्षभर उच्च-गुणवत्तेच्या बटाट्याच्या ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्यातही हातभार लागतो.

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. बटाटा पिकाची काढणी कधी करावी? 

उत्तर -  बटाटा जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात झाल्यावर आणि पूर्णपणे पिकल्यावर काढणी करावी. बटाटा पिकाची काढणी साधारणपणे बटाटे 90 ते 100 दिवसांनी करावी. 

2. बटाटे किती काळ टिकू शकतात?

उत्तर -  योग्य साठवण बटाटे 6 ते 12 महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येतात. 

3. बटाटा काढणीची सोपी पद्धत कोणती?

उत्तर - बटाटा काढणीची सोपी पद्धत  पोटॅटो डिगरच्या सहय्याने बटाटे काढणे. 

4. बटाटा साठवणुकीसाठी सर्वात चांगली पद्धत कोणती?

उत्तर - बटाटा साठवणुकीसाठी सर्वात चांगली पद्धत म्हणजे शीतगृहात (best way to store potatoes) साठवून ठेवणे. 


People also read | हे देखील वाचा - 

1. kalingad lagwad: कलिंगड लागवड A to Z माहिती

2. isabion syngenta: फुलांची संख्या वाढवण्यासाठी मार्केट मधील 1 नंबर औषध

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

6. ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापन
लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी