kalingad lagwad

kalingad lagwad: कलिंगड लागवड A to Z माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण कलिंगड लागवडी kalingad lagwad mahiti पासून ते काढणीपर्यंत सर्व सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. कलिंगड हे कमी वेळेत जास्त उत्पादन देणारी पीक आहे. कलिंगड पिकाची लागवड करताना जमिनीची मशागत watermelon cultivation , लागवडीचे अंतर, बियाणे, खत, पाणी, कीड रोग नियोजन करणे महत्वाचे असते. 

जमीन | Soil -

हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. चुनखडीयुक्त खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अतिप्रमाणात असणाऱ्या सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट, क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगडाच्या kalingad sheti फळावर डाग पडण्याची शक्यता असते. तथापि दशावतार फवारल्याने हे फळावरील डाग थांबलेत. लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम – काळ्या ते करड्या रंगाची पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस  kalingad lagwad mahiti योग्य आहे.


हवामान | Climate - 

उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळ्याचा आणि भर पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड kalingad lagwad केली जाते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.


लागवडीचा हंगाम आणि बियाणे दर | Sowing time & Seed rate - 

लागवड शक्यतो जानेवारी-मार्च महिन्यात करावी. म्हणजे उन्हाळ्याच्या तोंडावर याची फळे तयार होत असून त्यांना मागणी अधिक राहते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळतात. काही ठिकाणी कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये तयार होतात. उत्पादन कमी येते. परंतु भाव चांगला मिळतो.

एक एकर कलिंगड लागवडीसाठी 250 ते 500 ग्रॅम संकरित बियाणे वापरावे. 


संकरित कलिंगड जाती | Best variety of watermelon -

1. सिन्जेंटा सिम्बा : ही जात जोमदार व लवकर तयार होणारी आहे. फळाचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचे सरासरी वजन 3.5 ते 4 किलो आहे. फालचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.

2. जेंटेक्स ब्लैक एवेन्यू: अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळ गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे. ही जात मर रोगास (फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन 8 किलो आहे.

3. शुगर क्वीन: या जातीचा फळांची साल गडद हिरव्या रंगाची, गर लाल आणि कुरकुरीत असतो. फळांमध्ये साखरेचे प्रमाण 12 ते 14 टक्के असते. तसेच या जातीमध्ये चांगली फळधारणा होते. ही जात लांब वाहतुकीसाठी उपयुक्त आहे आणि फळांची टिकवणक्षमता पण जास्त आहे.


टोकण पद्धतीऐवजी रोपवाटिका | Watermelon nursery -

टोकण पद्धतीमध्ये उगवणक्षमता कमी राहते. न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकावे लागते. पर्यायाने खर्चात वाढ होते. शक्यतो रोपे कोकोपीट ट्रेमध्ये तयार करून लागवड करावी. रोपे तयार होण्यासाठी 20-25 दिवसांचा कालावधी लागतो. लागवडीपूर्वी बेड पूर्ण ओले करावेत. गादीवाफ्यात वापसा स्थिती आल्यावर रोपांची लागवड सकाळी किंवा संध्याकाळी करावी. 


मल्चिंग पेपरचा वापर | Mulching paper use in kalingad lagwad - 

गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी 1.25 मीटर रुंद आणि 400 मीटर लांब प्रति रोल सिल्वर मल्चिंग पेपर (30 मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. यामुळे जमिनीचे तापमान, आर्द्रता, अनुकूल राहून पांढऱ्या मुळ्यांची वाढ उत्तम होते. पाण्याची बचत, तणनियंत्रण, खताची बचत तसेच काहीशा प्रमाणात रसशोषक किडींचे नियंत्रणही होते. एकरी पेपरचे 4-5 रोल लागतात. रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कलिंगड लागवडीसाठी  kalingad lagwad वाफ्याच्या मध्यभागी 2 फूट अंतरावर 10 सें.मी. व्यासाची छिद्रे तयार करावीत. दोन्ही बाजूने लागवड पद्धतीमध्ये मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर 2 इंची पाईपच्या तुकड्याच्या सहाय्याने ड्रीपरच्या दोन्ही बाजूला 10 सें.मी. अंतरावर छिद्रे पाडावीत. एकाच बाजूच्या दोन छिद्रामधील अंतर 2 फुट ठेवावे. पुनर्लागवड केलेली रोपे प्लास्टिक पेपरला चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी.


ठिबक सिंचन | Drip irrigation -

ठिबक सिंचनासाठी 30 से.मी. अंतरावर इमीटर असेल्या इनलाईन लॅटरल (2 लिटर/ तास क्षमतेच्या) गादीवाफ्यावर मधोमध टाकाव्यात. दोन लॅटरलमधील अंतर 6 फुट ठेवावे. फळधारणा व फळवाढीच्या अवस्थेत एकसारख्या प्रमाणात पाणी द्यावे. फळे पक्वतेवेळी पाण्याचे प्रमाण कमी करावे, जेणेकरून फळामधील शर्करा व गराचे प्रमाण उत्तम राहील.

अन्नद्रव्य व्यवस्थापन | Fertilizer management - 

बेड तयार केल्यानंतर मल्चिंग पेपर टाकण्याच्या आधी डीएपी 50 किलो, एम ओ पी 50 किलो, अमोनियम सल्फेट 25 किलो, निंबोली पेंड 150 किलो, फरटेरा 4 किलो मिक्स करून बेड भरून घ्यावेत. पुढील खताचे नियोजन माती परीक्षण आणि पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांची मात्र ड्रीप मधून द्यावी. पीक वाढीच्या अवस्थेनुसार फवारणीचे नियोजन खालील प्रमाणे करावी. 

पीक 15 दिवसाचे झाले असता 19:19:19 - 3 ग्रॅम + IFC स्कुबा (सीवीड अर्क) 1.5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. 

पीक फुलोरा आणि फळ धारणा अवस्थेत असताना 00:52:34 - 5 ग्रॅम + IFC मायक्रोनुट्रीएंट 1 ग्राम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. फुलोरा अवस्थेत 00:52:34 सोबत सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी केल्यास बोरॉनची उपलब्धता होऊ शकते. बोरॉनच्या कमतरतेमुळे फळांचे तडकण्याचे प्रमाण वाढते. 

फळ पोसत असताना 13:00:45 या विद्राव्य खताची 5 ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 

छाटणी (प्रुनिंग) | Prunning -

वेलीची वाढ एकसारखी होण्यासाठी, पानाचा आकार मोठा, कीड व रोगांप्रती वेलीची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी नको असलेला वेलीचा भाग म्हणजेच मध्यभागचा शेंडा व अनावश्यक बगलफुटी छाटून टाकाव्यात. छाटणी केल्यामुळे फळांचा आकार, रंग, चव, आकर्षकपणा व वजन यामध्ये वाढ होते.

फूल व फळ व्यवस्थापन | FLower & Fruit managment - 

पाण्याची अनियमित वेळ व मात्रा यामुळे फूल व फळाची गळ होऊ शकते, तसेच फळे तडकण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याची मात्रा व वेळ निश्चित करावी. फळ लागण्यास सुरवात झाल्यास पाण्याचा टन बसू देऊ नये.पाणी दुपारच्या वेळी देऊ नये.

कलिंगड पिकातील कीड व रोग नियोजन | Pest & Disease management in watermelon farming - 


1. रोप खोडापासून सुकणे | Damping off -

लागवडी नंतर मल्चिंग च्या आत मधील गरम झालेली हवा मल्चिंग च्या होल मधून निघताना त्याची रोपांना झळ बसते व रोप खोड / देटापासून सुकून जाते.

उपाय: रोप लागवड करताना डिस्पोजल पेपर कपाची बंद असलेली बाजू कट करावी व त्यामधून लावलेले रोप मधून काढावे जेणेकरून उष्ण हवेची झळ बसणार नाही किंवा रोपांच्या बाजूला मल्चिंग वर माती टाकावी जेणेकरून बेड आणि मल्चिंग या मध्ये पोकळी (गॅप) राहणार नाही.


2. मर रोग | Wilt Disease - 

बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात. व कालांतराने मरतात. 

उपाय: डॉ बैक्टोस डर्मस (ट्राइकोडर्मा विरिडी) 1 लिटर / मास्टर (मैनकोजेब 64% डब्ल्यूपी + मेटलैक्सिल) 500 ग्राम / रोको (थियोफैनेट-मिथाइल) 400 ग्राम या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. आळवणी करताना प्रति रोप 30 ते 40 मिली द्रावणाची आळवणी झाली पाहिजे.


3. रस शोषक कीड (थ्रिप्स / पांढरी माशी / मावा ) | Thrips, White fly & Aphid - 

किडी पानांच्या खालच्या भागावर मोठ्या संख्येने लपून राहतात व पाने व फुलांतील रस शोषतात. त्यामुळे फुले गळतात. या किडीमधून एक चिकट द्रव स्रवतो, त्यावर बुरशी वाढते. रोपांची वाढ खुंटते उत्पादनावर परिणाम होतो.

उपाय: प्रति बंधात्मक उपाय म्हणून पिवळे व निळे चिकट सापळे 20 प्रति एकरी लावावेत व निम तेल 25 मिली प्रति पंप फवारणी करावी.

प्रधुरभाव झाल्यास डॉ. बैक्टो वर्टिगो (वर्टिसिलियम लेकेनी) 50 मिली / अरेवा (थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी) 10 ग्राम / कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8%) 8 मिली / उलाला (फ्लोनिकैमिड 50% डब्ल्यूजी) 6 ग्राम या पैकी कोणत्याही एका कीडनाशकाची रोपाच्या अवस्थेनुसार आलटून पालटून प्रति 15 लिटर पंप फवारणी करावी.


4. भुरी आणि डावानी मिल्ड्यू | Powdery & Downey mildew -

भुरी रोगामध्ये पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.

डावानी मिल्ड्यू रोगामध्ये पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो. यामुळे पाने वाळतात व संपूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.

उपाय: दोन्ही रोगासाठी अवतार (हेक्साकोनाज़ोल 4% + ज़िनेब 68%) 30 ग्राम / ताकत (कैप्टन 70% + हेक्साकोनाज़ोल) 30 ग्राम या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची रोपाच्या अवस्थेनुसार आलटून पालटून प्रति 15 लिटर पंप फवारणी करावी.


5. फळ माशी | Fruit fly - 

खरबूज व कलिंगड या दोन फळांसाठी ही कीड अतिशय हानिकारक आहे. किडीची मादी माशी फळाच्या सालीमध्ये अंडी घालते. अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या फळांमध्ये शिरतात व आतील गर खातात. त्यामुळे फळे कुजतात व त्याचा घाणेरडा वास येतो.

उपाय: प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कामगंध सापळे 5 प्रति एकरी प्रत्येकी १ मीटर अंतरावर लावावे.

प्रधुरभाव झाल्यास कोराजेन (क्लोरैंट्रानिलिप्रोल 18.5%) 5 मिली + निम तेल 25 मिली प्रति 15 लिटर पंप फवारणी करावी.


6. फळ तडकणे | Fruit cracking - 

फळ विकासाच्या अवस्थेत फळे तडकण्याची समस्या येते. यामुळे फळांची गुणवत्ता ढासळून अशी फळे बाजारात विकली जात नाही.

उपाय: पाणी जास्त दिल्यास फळे तडकतात त्यामुळे पाणी उष्णता व पिकाच्या गरजेनुसार द्यावे.

कॅल्शिअम आणि बोरॉन यांच्या कमतरता झाल्यास फळ तडकते म्हणून फुल येणास सुरुवात झाल्यावर कॅल्शिअम नायट्रेट 3 किलो + बोरॉन 500 ग्राम प्रति एकरी 7 दिवसांच्या अंतराने 3 वेळा द्यावे तसेच 13:00:45  - 75 ग्राम + कॅल्शिअम - बोरॉन यांचे मिश्रण असलेले इन्स्टा सी.बी. 15 ग्राम + सीवीड एक्सट्रॅक्ट 25 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फळ विकास अवस्थेमध्ये फवारणी करावी.


काढणी व उत्पादन  | Harvesting - 

फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात. फळांचा आकार गोलसर व मधे फुगीर तयार होऊन देठ सुकल्यानंतर बोटांच्या मागच्या बाजूने पक्व फळावर वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो तर अपक्व फळांचा टणटण असा आवाज येतो. कलिंगडाच्या देठाजवळील बाळी सुकते. साधारणपणे बियाणे लागवडीपासून 90 ते 100 दिवसांमध्ये फळे काढणीस तयार होतात. साधारणतः जातीनिहाय एकरी 30 ते 50 टन उत्पादन मिळते.


Conclusions | सारांश -

कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक आहे. त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. आरोग्यवर्धक, व्याधीशामक, स्वदिष्ट असून जाम –जेली, सौस निर्मितीत उपयुक्त. सुकवलेल्या बिया आयुर्वेदिकदृष्ट्या गुणकारी आणि पौष्टिक असतात. त्यामुळे शेतकरी आता उच्च तंत्राद्यानच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागलेत. कलिंगड पिकाची लागवड kalingad lagwad करताना जमिनीची मशागत, लागवडीचे अंतर, बियाणे, खत, पाणी, कीड रोग नियोजन असल्यास एकरी 35 टनांपर्यंत उत्पादन मिळते. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. कलिंगडाची लागवड कधी करावी?

उत्तर - लागवड शक्यतो जानेवारी-मार्च महिन्यात करावी. काही ठिकाणी कलिंगडाची लागवड ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात करतात व ही फळे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये तयार होतात.

2. कलिंगड लागवडीसाठी एकरी किती बियाणे वापरावे?

उत्तर- कलिंगड लागवडीसाठी एकरी 350 ग्राम ते 500 ग्राम बियाणे वापरावे. 

3. कलिंगड पिकाची लागवड किती अंतरावर करावी?

उत्तर - कलिंगड पिकाची लागवड करताना दोन ओळीतील अंतर 6 फूट आणि दोन रोपांतील अंतर 2 फूट ठेवावे. 

4. कलिंगड पिकासाठी किती मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरावा ?

उत्तर- कलिंगड पिकासाठी 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर वापरावा


People also read | हे देखील वाचा - 

1. हायड्रोपोनिक चारा निर्मिती

2. ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रण

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रणलेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी