hydroponic fodder

hydroponic fodder: हायड्रोपोनिक चारा निर्मिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण कमी कालावधी मध्ये जनावरांना हिरवा चारा देणाऱ्या हायड्रोपोनिक hydroponic fodder तंत्राबाबद्दल सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. शेतकरी दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कुटुबांची आर्थिक गरज भागवतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतीचं क्षेत्र कमी होत असल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांसमोर चाऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. चाऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यासमोर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन चारा उपलब्ध करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. शेतकरी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे 10 दिवसांमध्ये चारा तयार करु शकतात.

मक्याच्या बियांपासून फक्त हायड्रोपोनिक चारा ट्रे मध्ये पाणी शिंपडून चारा पिकवता येतो. या तंत्राचा वापर करून चारा तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे शेतकरी बांधवांना फक्त 10 दिवसात चारा मिळू शकतो. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे खूप महाग आहे कारण त्यात खूप खर्च होतो. मात्र, स्थानिक बाजारपेठेत किंवा घरी उपलब्ध होणाऱ्या वस्तू आणि साधनं वापरूनकमी खर्चात चारा पिकवता येई शकतो.


हायड्रोपोनिक चारा निर्मिती  | Hydroponic fodder system -

1. हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी बांबू, तोट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते.

2. या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो.

3. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो.

4. चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते.

5. हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे.

6. त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट x 2 फूट x 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे.

7. अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा हायड्रोपोनिक चारा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी.

8. हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा hydroponic chara निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत.

9. एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्‍स चाऱ्यास पाणी देता येते.

10. चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्‍यापासून 10 किलो हिरवा चारा hydroponic chara तयार होतो.


असा द्या जनावरांना हायड्रोपोनिक चारा  | Hydroponic fodder use - 

हा चार  जास्त पचनीय असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. पुर्णपणे वाढ झालेला हायड्रोपोनिक चारा एक प्रकारे चटईसारखा दिसतो. ज्याच्या तळाला मक्याची दाणे, मुळे आणि रोप एकमेकात गुंतून असतात. यामुळे ट्रे मधून चारा काढायला सोपा जातो व हा चारा जसाच्या तास किंवा तुकडे करून देता येतो.  गुरांना फक्त हायड्रोपोनिक चारा दिल्यास अपचन, पोटफुगी होण्याची शक्यता असते म्हणून कधीही हा चारा सुक्या चाऱ्यासोबत द्यावा. एका जनावराला हा चारा २० किलो पर्यंत देवू शकतो. सात ते आठ किलो हायड्रोपोनिक चारा दिल्यास सुमारे १ किलो तयार पशुखाद्य / पेंड कमी करू शकतो. हा चारा सर्व वयोगटातील तसेच सर्व प्रकारच्या रवंथ करणाऱ्या जनावरांना खायला देवू शकतो.

हायड्रोपोनिक्‍स चाऱ्याचे फायदे hydroponic chara

1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय.

2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती.

3. जनावरांना 90 टक्के चारा पचतो.

4. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी.

5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.

6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ.

7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.

8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ.

9. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्‍यकता आहे.

10. दुधाचे 10 ते 15 % उत्पन्न वाढते तसेच जनावराची त्वचेवर चकाकी आली त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले.

11. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्‍सिडंट्‌स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात.


Conclusions | सारांश -

जमिनीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे तसेच शेत मजुरांचा अभाव, कमी पर्जन्यमान या कारणांमुळे जनावरांसाठी चारा लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. या साठी चांगला पर्याय म्हणजे हायड्रोपोनिक hydroponic fodder चारा निर्मिती. या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारा निर्मिती होते. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे शेतकरी बांधवांना फक्त 10 दिवसात चारा मिळू शकतो.


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय?

उत्तर - हायड्रोपोनिक्स मधील हायड्रो म्हणजे पाण्यावर केली जाणारी शेती. 

2. हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीसाठी कोणते बियाणे वापरू शकतो?

उत्तर- चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो.

3. हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीमध्ये किती दिवसात चारा तयार होतो?

उत्तर - हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीमध्ये 10 दिवसात चारा तयार होतो

4. हायड्रोपोनिक्स चारामुळे काय फायदा होतो?

उत्तर- दुधाचे 10 ते 15 % उत्पन्न वाढते तसेच जनावराची त्वचेवर चकाकी आणि चेहऱ्यावर तेज येते. 


People also read | हे देखील वाचा - 

 

1. गव्हाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न

2. ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रण

3. डेलीगेट कीटकनाशकाची संपूर्ण माहिती वापर, फायदे आणि किंमत

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रणलेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी