नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण हरभरा लागवडीसाठी बेस्ट जाती chickpea variety कोणत्या लावाव्यात आणि त्यांची सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. हरबरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पिक आसून रब्बी हंगामात मोठ्या क्षेत्रावर हरबरा पेरणी शेतकरी करतात. हे पिक कमी खर्चातलं पिक आहे तसेच कमी खर्चातही भरपूर उत्पादन या पिकाचं मिळवता येतं. हरभरा पिकाचे अधिकाधिक व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी चांगल्या बियाण्याच्या वापर करनं अत्यंत गरजेचं असते.
देशी वाण | Desi chickpea variety -
1. दिग्विजय -
उत्पादन क्विंटल / एकर : 7 - 8
पिकाचा कालावधी - 110
वैशिष्ट्ये - मर, करपा रोगास प्रतिकारक, पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता, 100 दाण्याचे वजन सुमारे 24 ग्रॅम.
2. विजय (फुले जी 81-1-1) -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू 8 आणि बागायती - 16
पिकाचा कालावधी : 105 - 110
वैशिष्ट्ये - पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता, मर रोगास प्रतिकारक्षम, हा वान बुटका तसेच पसरट असून पाने, घाटे व दाणे आकाराने मध्यम आहे.
3. विशाल -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू 7 आणि बागायती - 15
पिकाचा कालावधी : 110 - 115
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, पिवळ्या रंगाचे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षम, निमपसरट व पाने, घाटे आकाराने मोठे तसेच गर्द हिरवे असतात. 100 दाण्यांचे वजन 28 ग्रॅम. इतर हरभरा वाणांपेक्षा 300-400 रुपये प्रति क्विंटल अधिक बाजारभाव आणि बाजारात सर्वाधिक मागणी असलेला एकमेव वाण.
4. जाकी 9218 -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू 7 आणि बागायती 14-15
पिकाचा कालावधी: 115 - 120
वैशिष्ट्ये - झाडे अर्धवट पसरलेली, टपोरे दाने आणि पिवळसर तांबूस रंगामुळे चांगला बाजारभाव या वानाला मिळतो. मर रोगास प्रतीकारक्षम. 100 दाणे 28.5 ग्रॅम वजन. पक्व झाल्यावर 15-20 दिवसांनी हरभरा फुटण्याची/तडण्याची समस्या नाही. कोरडवाहू/बागायती दोन्ही प्रकारच्या जमीनीत पेरणी करता येते आणि भरपूर उत्पादन मिळते.
5. आयसीसीव्ही 10 -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू 7 आणि बागायती - 13
पिकाचा कालावधी : 110 - 115
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता
6. साकी 9516 -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू 6 आणि बागायती - 12
पिकाचा कालावधी : 105 - 110
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, दाणे आकाराने मध्यम
7. राजस -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू 8 आणि बागायती - 16
पिकाचा कालावधी : 100 - 105
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, पिवळसर तांबूस आणि टपोरे दाणे, उशिरा पेरणीसाठी योग्य
कबुली वाण | Kabuli chickpea variety -
1. आयसीसीव्ही 2 -
उत्पादन क्विंटल / एकर - कोरडवाहू 4 आणि बागायती - 8
पिकाचा कालावधी : 90 - 100
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक टपोर्या दाण्याचा असल्या मुळे अधिक बाजारभाव, बोट्रीटिस ग्रे मोल्ड प्रतिकारक्षम
2. पीकेव्ही काबुली 2 -
उत्पादन क्विंटल / एकर - 11
पिकाचा कालावधी : 110 - 120
वैशिष्ट्ये - मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक टपोर्या दाण्याचा असल्या मुळे अधिक बाजारभाव
3. पीकेव्ही काबुली 4 -
उत्पादन क्विंटल / एकर 7 - 8
पिकाचा कालावधी : 110 - 120
वैशिष्ट्ये - कोरडे रूट सडणे बोट्रीटीस राखाडी बुरशीजन्य रोग आणि वाळवण्यास सहनशील, सिंचनासाठी अनुकूल परिस्थिती, विस्तृत पाने असलेले अर्ध पसरणारे, जास्त मोठे पांढरे बियाणे.
बियाण्याचे प्रमाण | Seed rate for chickpea variety -
1. हरभरा वाणांच्या लहान दाण्यांचा वाणाकरिता (उदा. विजय, विशाल, दिग्विजय,आयसीसीव्ही-10, राजस, साकी 9516) : 20-25 किलो प्रति एकरी.
2. मध्यम आकारमानाच्या वाणाकरिता (उदा. जाकी 9218) : 30-32 किलो प्रति एकरी या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.
3. काबुली वाणांमध्ये आयसीसीव्ही-2, पीकेव्ही काबुली-2 व पीकेव्ही काबुली-4 : 40 ते 50 किलो प्रतिएकरी या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.
बीजप्रक्रिया आणि जीवाणूसंवर्धन | Seed treatment for chickpea variety -
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 5 मिली ट्रायकोडर्मा चोळावे अथवा 3 ग्रॅम कार्बेन्डॅझिम एकत्र करून प्रति केिली बियाण्यास चोळावे. यानंतर 10 किलो बियाण्यास नत्र, स्फुरद, पालाश या जीवाणू संवर्धक 100 ग्रॅम हे गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे 3 ते 5 टक्के उत्पादन वाढते.
पेरणीची वेळ | Sowing Time -
👉कोरडवाहू - 20 ऑक्टोबर - 15 नोव्हेंबर अगोदर (फुल अवस्थेत पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही)
👉बागायती - 15 नोव्हेंबर
पेरणी पद्धती | Sowing Methods -
1. देशी हरभऱ्याच्या पेरणीकरिता दोन ओळीतील अंतर 30 सें.मी., तर दोन झाडातील अंतर 10 सें.मी. ठेवावे.
2. काबुली वाणाकरिता दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन झाडातील अंतर 10 सें.मी. ठेवावे.
अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी महत्वाच्या बाबी -
1. बुरशीनाशक आणि जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
2. खतांसोबत सल्फर मिल्स कंपनीचे टेक्नो-जेड सल्फर-जिंक माइक्रोग्रेन्युलचा 4 किलो प्रति एकरी वापर करावा.
3. पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्यासोबत सोबत मायकोरायझा 100 ग्राम + नत्र, स्फुरद, पालाश या जीवाणू संवर्धक 500 ग्राम + 1 किलो काळ गूळ एक दिवस अगोदर पाण्यामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी द्यावे.
4. प्रत्येक फवारणी सोबत सीवीड अर्क २५ मिली किंवा चिलेटेड मिक्रोनुट्रिएंट 15 ग्राम प्रति 15 लिटर पंप वापरावे.
सारांश | Conclusion -
आर्थिकदृट्या शेतकऱ्यांना सधन करणारे हरभरा हे महत्वाचे कडधान्य पिक आहे. हरभरा भरघोस उत्पादन वाढीसाठी सुधारीत जातींची निवड करणे chickpea variety, बीजप्रक्रिया, योग्य वेळेवर पेरणी करणे, रासायनिक खताचा वापर, पाणी व्यवस्थापन आणि कीड व्यवस्थापन याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न -
1. हरभरा पेरणी कधी करावी?
उत्तर - जिरायती हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. बागायती हरभऱ्याची पेरणी 15 नोव्हेंबर पर्यन्त पूर्ण करावी.
2. हरभऱ्याचे सर्वात बेस्ट वाण कोणते?
उत्तर - विशाल है वाण अधिक बाजारभाव आणि बाजारात सर्वाधिक मागणी असलेला एकमेव वाण.
3. काबुली हरभऱ्याची सर्वात बेस्ट वाण कोणते आहे?
उत्तर – पीकेव्ही काबुली-2 हे काबुली हरभऱ्याचे सर्वात बेस्ट वाण आहे.
4. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी हरभऱ्याचे कोणते वाण आहे?
उत्तर - जाकी 9218
5. हरभरा बियाण्यास कोणत्या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी?
उत्तर - हरभरा प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम कार्बेन्डॅझिम बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
People also read | हे देखील वाचा -
1. गव्हाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न
2. रब्बी हंगामात ज्वारीच्या या वाणांची पेरणी करा आणि मिळवा भरगोस उत्पादन
3. डेलीगेट कीटकनाशकाची संपूर्ण माहिती वापर, फायदे आणि किंमत
4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !
5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण
लेखक
भारतअॅग्री कृषि एक्सपर्ट