आयएफसी स्टिकी ट्रॅप (10 पिवळी, 10 निळ्या) (6 x 8 इंच)
आयएफसी स्टिकी ट्रॅप (10 पिवळी, 10 निळ्या) (6 x 8 इंच)
Dosage | Acre |
---|
आयएफसी चिकट सापळे (10 पिवळे आणि 10 निळे सापळे)
चिकट सापळे हे रंगीत प्लास्टिकचे फलक असून हे दोन्ही बाजूंनी एकाच रंगाने रंगवलेले असतात आणि त्यावरून चिकट पदार्थाचा लेप लावलेले असतात. कीड या चिकट पदार्थामध्ये अडकतात, त्यामुळे पिकाचे रस शोषक किडींपासून संरक्षण होते.
उत्पादनाचे नाव | IFC स्टिकी ट्रॅप |
सेट मध्ये समाविष्ट | पिवळे चिकट सापळे -10 आणि निळे चिकट सापळे -10 |
क्रियेची पद्धत | किडीना सापळ्यांकडे आकर्षित करणे. |
कंपनी | इंडियन फार्मर कंपनी |
प्रमाण | 1 एकर साठी पिवळे ट्रॅप 10 + निळे ट्रॅप 10 |
क्रियेची पद्धत:
चिकट सापळ्यांच्या संबंधित रंगाकडे तसेच त्यांच्याद्वारे परावर्तित होणार्या प्रकाशाकडे किडी सहज आकर्षित होतात. यामुळे कीड सापळ्यांच्या दिशेने आकर्षित होऊन चिकट पदार्थ मध्ये अडकतात. पिवळे चिकट सापळे पांढऱ्या माशी, मावा, तुडतुडे, नाग अळी इत्यादी किडीना आकर्षित करतात आणि निळे चिकट सापळे थ्रिप्सला आकर्षित करतात.
पिक आणि लक्षित कीड
पिकाचे नाव | लक्ष्यित कीड | सेट / एकर |
सर्व भाजीपाला आणि फळ पिके | पांढरी माशी, मावा, तुडतुडे, नाग अळी, थ्रिप्स आणि सर्व शोषक किडी. | 1 सेट |
कसे वापरावे :
किडींच्या प्रमाणानुसार नियमित अंतराने फक्त पिकाच्या वर लटकवा किंवा काठीच्या आधारे लावा आणि नियमितपणे किडीचे नियंत्रण करा.
फायदे:
1. चिकट सापळे पिकांना हानी पोहचवणाऱ्या सर्व उडणाऱ्या रस शोषक किडींना आकर्षित करतात.
2. चिकट सापळे शेतात किडीच्या प्रसाराचे निरीक्षण करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी वापरले जातात.
3. चिकट सापळ्यांद्वारे 60 ते 80% किडींचे नियंत्रण होते.
4. चिकट सापळे वापरल्याने पीक दीर्घकाळ सुरक्षित राहते.
5. चिकट सापळे पिकांमध्ये वापरणे सोपे आहे.
6. चिकट सापळे इको-फ्रेंडली असतात आणि विषारी नसतात.