sugarcane rust control

sugarcane rust control: ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रणाबद्दल sugarcane rust control संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आडसाली हंगामासाठी लागवड केलेल्या सर्व प्रचलित जातींवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. जास्त पाऊस आणि जास्त ऊन यामुळे हवेमध्ये आद्रता वाढल्यास तांबेरा रोगाचा प्रधुरभाव होतो. 

 

रोगाची लक्षणे | Sugarcane tambera symtomps -

1. उसाच्या पानावर तांबेरा rust disease हा रोग पुनक्सिनिया मिल्यानोसेफिला व पुक्सिनिया कुहिनीय या दोन बुरशींमुळे होतो. ही बुरशी फक्त ऊस पिकावर उपजीविका करते.

2. बुरशीचा प्रादुर्भाव पानाच्या दोन्ही बाजूंना होऊन पानावर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपक्‍यांची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतो.

3. ठिपक्‍याच्या भोवती फिक्कट पिवळसर हिरवी कडा तयार होऊन पानाच्या खालच्या बाजूस ठिपक्‍याच्या जागेवर उंचवटे तयार होतात. ठिपके फुटून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात.

4. हवेद्वारे बीजाणूंचा प्रसार होतो. पानांवरील ठिपक्‍यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे ठिपके तयार होतात. या रोगग्रस्त ठिपक्‍यातील पेशी मरून जाऊन पाने करपलेली दिसून येतात.

5. रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात घट दिसते.

बुरशीचा जीवनक्रम व रोगाचा प्रसार | Sugarcane tambera spread - 

1. उसाच्या पानावर दवाच्या स्वरुपातील असलेले पाणी प्रामुख्याने रोगवाढीसाठी महत्त्वाचा व अनुकूल घटक आहे. 

2. पानावर ओलसरपणा असताना बिजाणू रुजून बुरशी तयार होते. ही बुरशी पानांच्या आंतरभागात प्रवेश करुन रोग निर्मिती करते. 

3. पानामध्ये रोगनिर्मिती प्रक्रिया सुरू झाल्यापासून 3 ते 4 दिवसांत पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसतात. 

4. दोन आठवड्यात नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. 

5. रोगाचा जीवनक्रम 10 ते 12 दिवस इतक्या कमी कालावधीत पूर्ण होतो. 

6. प्रामुख्याने या us tambera rog रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो. या रोगाचा प्रसार बेण्यामार्फत अगदी कमी प्रमाणात होतो. 

 

रोग वाढीस अनुकूल बाबी | Favourable climate - 

1. सकाळचे धुके, दव व थंड वातावरण.

2. सतत पडणाऱ्या पाउसानंतर जास्त ऊन पडणे

3. बळी पडणाऱ्या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड

4. नत्र खतांचा आडसाली उसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरणे.

 

एकात्मिक पद्धतीने नियंत्रणाचे उपाय |  Sugarcane rust control -

1. लागवड फेब्रुवारी ते मे या महिन्यांमध्ये करू नये.

2. बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे निवडावे.

3. रोगप्रतिकारक्षम जातींची (को-86032) लागवड करावी.

4. बेणे कार्बेन्डाझिम द्रावणात (100 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 100 लिटर पाणी) दहा मिनिटे बुडवावे. त्यानंतर लागवड करावी.

5. योग्य निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करावी.

6. लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब केल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

7. शिफारशीनुसार नत्राची मात्रा द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

8. us tambera rog रोगामुळे बाधित ऊस (शेंडे कूज अथवा पांगशा फुटलेले ऊस) नष्ट करावेत.

 

UPL Saaf FungicideHifield Counter PlusBayer Folicur

रासायनिक नियंत्रण | Chemicle control - 

1. साफ (कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब) - 30 ग्रॅम 

2. काउंटर प्लस (हेक्साकोनाज़ोल 5% एससी) - 1 मिली 

3. फोलिकुर (टेबुकोनाज़ोल 250 ईसी) - 1 मिली 

या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. चांगल्या रिझल्टसाठी प्रति पंप 5 मिली IFC स्टिकर मिसळावे.  

 

सारांश | Conclusion - 

ऊस पिकामध्ये तांबेरा बुरशी rust disease रोग प्रामुख्याने आडसाली ऊसमध्ये दिसून येतो. सतत पडणारा पाऊस आणि जास्त ऊन यामुळे हवेमध्ये जास्त आद्रता वाढते तसेच सकाळचे धुके, दव व थंड वातावरण या कारणामुळे रोगाचा प्रसार होतो. रोगमुक्त बियाणे, बेणे प्रक्रिया, को-86032 या वाणाची लागवड केल्यास रोगाचा प्रसार कमी होतो. रोगाची लागण झाल्यास रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा, रोगाचे लवकर नियंत्रण न झाल्यास sugarcane rust control उत्पादनामध्ये 30 ते 50 टाक्यांची घट येऊ शकते. 

 

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

1. उसावरील तांबेराची लक्षणे काय आहेत?

उत्तर -. पानाच्या दोन्ही बाजूंना लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपक्‍यांची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतो.

2. तांबेरा रोगास अनुकूल हवामान काय आहे?

उत्तर – सतत पडणारा पाऊस आणि जास्त ऊन यामुळे हवेमध्ये जास्त आद्रता वाढते तसेच सकाळचे धुके, दव व थंड वातावरण या कारणामुळे रोगाचा प्रसार होतो.

3. तांबेरा रोगाचा प्रसार कसा होतो?

उत्तर – तांबेरा रोगाचा प्रसार रोगग्रस्त बेणे, हवा, पाणी, किडींमार्फ़त होतो. 

4. तांबेरा रोगाच्या प्रधुरभावामुळे ऊस पिकावर काय परिणाम होतो?

उत्तर - रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात घट दिसते.

5. तांबेरासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय करावे?

उत्तर - लागवडीच्या वेळी उस बेण्याची प्रक्रिया करावी आणि को-86032 या वाणाची लागवड करावी. 

 

People also read | हे देखील वाचा - 

1. कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक | कांदा बेसल डोस

2. कांदा पिकामध्ये या फवारण्या अवश्य घ्या | रिजल्टची 100 % गॅरंटी

3. यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रणलेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

 

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी