Nutrient deficiency of chemical fertilizers in crops

पिकातील रासायनिक खतांच्या कमतरता nutrient deficiency आणि उपाय

पिकातील रासायनिक खतांच्या कमतरता nutrient deficiency आणि उपाय  

 वर्षानुवर्षे एकाच जमिनीमध्ये सलग पीक घेतल्यामुळे जमिनीमधील अन्न साठा कमी होऊन जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. जमिनीमधील अन्न द्रव्यांचे योग्य प्रमाण आणि उत्पादन वाढवण्यासाठी खताचा संतुलित वापर करणे आवश्यक आहे.

पिकाच्या उत्तम वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये वेळीच उपलब्धता न झाल्यास पिकांच्या nutritional deficiency अंतर्गत शरीरक्रिया व्यवस्थित चालत नाहीत. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे micronutrient deficiency सर्वसाधारणपणे अन्नद्रव्यांच्या स्थलांतराप्रमाणे जुन्या किंवा नवीन पानावर दिसतात. आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पिकांची पाने पिवळी पडतात. पानावर तपकिरी, करडे डाग पडतात nutritional deficiency diseases. पानाचा आकार लहान होतो, वाढ खुंटते, रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी उत्पादनात घट येते. नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळून १६ अन्नद्रव्ये पिकाला लागतात. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्यांची एकूण गरज कमी जास्त असते. 

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाययोजना.

1) नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.

उपाय: युरिया १०० ग्राम किंवा महाधन १९:१९:१९ -७५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.

2) स्फुरद - phosphorus deficiency पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

उपाय: डी.ए.पी. १०० ग्राम किंवा महाधन १२:६१:०० -७५ ग्राम किंवा महाधन ००:५२:३४  -७५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करा.

3) पालाश - potassium deficiency symptoms जुनी पाने सुकून करडे होण्यास सुरुवात होते पानाच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

उपाय: महाधन १३:००:४५ - ७५ ग्राम किंवा महाधन ००:००:५० - ७५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. पीक लहान असल्यास ००:००:५० वापरू नये.

4) जस्त - zinc deficiency symptoms पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते. कळ्या सुरकुतलेल्या असतात. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

उपाय: शेणखतासोबत झिंक सल्फेट ५ ते ७ किलो प्रति एकरी द्यावे. इंस्टाचील झिंक (चिलेटेड झिंक) १५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे. 

5) लोह - लोहाच्या कमतरतेमुळे पानांत पुरेसे हरितद्रव्य तयार होत नाही, त्यामुळे नवीन येणारी कोवळी पाने पिवळसर दिसतात व नंतर पाने गळून पडतात.

उपाय: शेणखतासोबत फेरस सल्फेट ५ किलो प्रति एकरी द्यावे. इंस्टाचील फेरस (चिलेटेड फेरस) १५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे. 

6) मॅंगेनीज - पिकांच्या पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा, नंतर पांढरट व करडा होतो. कोवळी पाने फिक्कट पिवळसर दिसून येतात.

उपाय: शेणखतासोबत मॅंगेनीज सल्फेट ५ किलो प्रति एकरी द्यावे. इंस्टाचील मॅंगेनीज (चिलेटेड मॅंगेनीज) १५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे. 

7) तांबे - पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात. कणसात किंवा ओंबीत दाणे भरत नाही.

उपाय:: शेणखतासोबत कॉपर सल्फेट ५ किलो प्रति एकरी द्यावे. इंस्टाचील कॉपर (चिलेटेड कॉपर) १५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्यावे. 

8) बोरॉन - टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने मरतात. टोमॅटो, डाळिंबामध्ये फळ तडकते.

उपाय: बेसल डोस देताना इंस्टा बोर (बोरॉन २०%) २ किलो प्रति एकरी द्यावा. इंस्टा बोर (बोरॉन २०%) हे १५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा ५०० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून ७ दिवसाच्या अंतराने २ ते ३ वेळा सोडावे.

9) मॉलिब्डेनम - पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात, पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

उपाय: मोलिब एन (अमोनिअम मॉलिब्डेट) २५० ग्राम प्रति एकरी ड्रीप मधून दयावे किंवा फवारणी मधून १० ते १५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

10) गंधक - झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात.

उपाय: बेसल डोस सोबत युनिफेक्स (गंधक) ९०% दाणेदार ५ ते ७ किलो प्रति एकरी द्यावे. कमततेची लक्षणे दिसू लागताच महाधन ००:००:५० - ७५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

11) कॅल्शिअम - calcium deficiency symptoms नवीन पानाची निर्मिती होत नाही त्याचबरोबर नुकतीच पालवी आली असेल तर त्याची पाने गोल नळीसारखीच राहतात. तसेच पानावर गोल चिकट द्रव तयार होते. 

उपाय: कॅल्शिअम नायट्रेट ३ किलो प्रति एकरी द्यावे. कमततेची लक्षणे दिसू लागताच  कॅल्शिअम नायट्रेट ३ ग्राम किंवा चिलेटेड कॅल्शिअम १५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

१२) मॅग्नेशियम - magnesium deficiency in plants झाडांच्या जुन्या पानांमध्ये पानांमध्ये फिक्कट हिरव्या रंगाचे ठिपके दोन शिरांमधील भागांवर कडेपासून सुरुवात झालेले दिसतात हेच ठिपके नंतर वाढून दोन शिरांमधील भाग पिवळा पडतो. पानाच्या कडा खालच्या बाजूला वळून पिवळ्या पडतात. पानांवर लालसर किंवा तपकिरी चट्टे येतात. पिवळेपणा संपूर्ण पानावर येवून कालांतराने पण गळून पडते.

उपाय: मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो प्रति एकरी शेणखतासोबत मिसळून द्यावे. कमततेची लक्षणे signs of magnesium deficiency दिसू लागताच  इंस्टाचील मॅग्नेशियम (चिलेटेड मॅग्नेशियम) १५ ग्राम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी किंवा ड्रीप मधून २५० ते ५०० ग्राम प्रति एकरी द्यावे.

महत्वाचे - बुरशीनाशक आणि कीडनाशक (कॉपर आणि सल्फर युक्त वगळता) फवारणी करताना दर १५ दिवसांच्या अंतराने इंस्टाफर्ट कॉम्बी (चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट) १५ ग्राम प्रति १५ लिटर पाणी फवारणी केल्यास झिंक, लोह, तांबे, मॉलिब्डेनम, मॅंगेनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही. Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी