kakdi lagwad

kakdi lagwad: काकडी लागवड A to Z माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण उन्हाळी हंगामामध्ये जास्त उत्पन्न देणारे काकडी विषयी माहिती (kakdi lagwad) जाणून घेणार आहोत. 

 

हवामान आणि जमीन 

काकडी हे उष्‍ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी मध्‍यम ते भारी जमीन या पिकास योग्‍य असते. काकडी लागवडीसाठी मातीचे पीएच 6-7 दरम्यान असावा. उच्च तापमानात त्याची लागवड चांगली आहे. आणि हा थंडी सहन करू शकत नाही. म्हणून, काकडी लागवड उन्हाळी करावी. 

 

लागवडीचा हंगाम (kakdi lagwad)

काकडीची लागवड खरीप आणि उन्‍हाळी हंगामात होते. खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून जूलै महिन्‍यात व उन्‍हाळी हंगामामध्‍ये जानेवारी महिन्‍यात करतात तर डोंगराळ भागात त्याची लागवड मार्च व एप्रिल महिन्यात होते.

 

बियाणे

एक एकर लागवडीसाठी हायब्रीड काकडीचे 200 ग्रॅम बियाणे लागते.  

 

काकडीच्या जाती 

👉सलोनी (शाइन सीड्स) : रंग - फिकट हिरवा, पहिली काढणी - 35 ते 40 दिवस , अधिक माहिती -  तिन्ही हंगामात घेता येणारे रोगप्रतिकार क्षम वाण, जास्त टिकवणं क्षमता.

👉NS 404 ( नामधारी सीड्स ) : रंग - फिकट हिरवा, पहिली काढणी  - 30 ते 35 दिवस , फळाची लांबी - 25-28 सेमी , फळाचे वजन - 200 ते 220 ग्राम , अधिक माहिती -  अधिक उत्पादन देणारी व जास्त टिकवणं क्षमता असलेले वाण.

👉मालिनी (सेमिनीस) : रंग - फिकट हिरवा, पहिली काढणी  - 40 ते 45 दिवस , फळाची लांबी 19 -22  सेमी, फळाचे वजन - 200 ते 250  ग्राम , अधिक माहिती -  रोगप्रतिकार क्षम वाण.

👉जिप्सी (पिरामिड) : रंग - फिकट हिरवा पांढऱ्या रेषा , पहिली काढणी  - 45 ते 50 दिवस , फळाची लांबी 18 - 20 सेमी , फळाचे वजन - 200 ते 250 ग्राम , अधिक माहिती -  चांगली टिकवणं क्षमता. 

👉क्रिश (वीएनआर) : रंग - आकर्षक हिरवा रंग, पहिली काढणी  - 45 ते 50 दिवस, फळाची लांबी  15  - 17 सेमी, अधिक माहिती - अधिक उत्पादन देणारी जात, लवकर फळधारणा

 

काकडी लागवड कशी करावी?

शेतास उभी आडवी नांगरणी करुन ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले 20 ते 30 गाडया शेणखत प्रति एकरी टाकावे नंतर वखरणी करावी. काकडी लागवड (kakdi lagwad) करताना बेड वर लागवड करावी. शिफारसी प्रमाणे रासायनिक खताने बेड भरून घ्यावेत. बेड बनवताना मल्चिंगचा वापर करणे फायदेशीर ठरते, कारण यामुळे तणाचा बंदोबस्त होतो, तसेच मातीतील ओलावा टिकण्यास मदत होते. दोन ओळींमधील अंतर हे 5 ते 6 फूट असणे आवश्यक आहे. बेडच्या पृष्ठभागाची रुंदी 3 फूट ठेवून दोन बेड मधील चालण्याचा रस्ता 50 सें. मी ठेवावा व उंची 40 सें.मी. असावी. दोन रोपातील अंतर 2 फूट ठेवून त्याजागी एक किंवा दोन बिया टोकाव्यात किंवा रोप लावावे.  काकडी लागवड (kakadi lagwad) करण्याच्या पहिले संपूर्ण बेड ओले करावे. लागवडीनंतर एक महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी. वेलीची जास्त हालचाल होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी अश्या दोन तीन नायलन बारीक दोरी करून घ्यावे.किंवा आता मार्केटमध्ये बारीक नायलॉन जाळी उपलब्ध आहे ती वापरावे. काकडी लागवड (kakadi lagwad) झाल्यावर 25 ते 30 दिवसानंतर जर झाडाच्या खाली गवत असला तर तो काढून टाकावा आणि झाडाला फळे लागल्यावर फळाचा संपर्क हा मातीशी होणार नाही याची काळजी घेणे गरजेची आहे. 

 

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

काकडी पिकास 50 किलो नत्र 50 किलो पालाश 50 किलो स्‍फूरद लागवडीपूर्वी द्यावे. व लागवडीनंतर 1 महिन्‍याने नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्‍ता द्यावा. या प्रमाणे युरिया -23 kg + 10:26: 26- 65 kg + मॅग्नेशियम सल्फेट - 4 kg + दाणेदार गंधक 12 kg + निंबोळी पेंड 100 kg + सूक्ष्म पोषक खत - 10 kg + सेंद्रिय एंझाइम प्रति एकर नुसार बेड भरून घ्यावेत. पुढील खतांचा डोस विद्राव्य खतांमधून द्यावा.  पावसाळयात 8 ते 10 दिवसाचे अंतराने पाणी द्यावे व उन्‍हाळयात 4 ते 5 दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे. 

 

कीड नियंत्रण

👉मावा - हा कीटक पानांतील रस शोषण करतो त्यामुळे वेली निस्तेज होतात व पिकाची वाढ खुंटते.

नियंत्रणासाठी धनप्रीत 10 ग्राम प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी. 

👉पांढरी माशी - माशी पानांतील रस शोषण करून व्हायरस रोगाचा प्रसार करते. पांढरी माशी नियंत्रणासाठी 

उलाला 6 ग्राम प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी. 

👉तुडतुडे - हे किडे पानांतील रस शोषून घेतात. नियंत्रणासाठी डायमेथोएट 25 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.1% हे 10 मिली प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी. 

👉पाने खाणारी अळी व फळातील अळी (फळ माशी) - पाने खाणारी अळी व फळांच्या आत तयार झालेल्या अळीमुळे फळ वाकडे होते. नियंत्रणासाठी किडलेली फळे काढून टाकावी व धानुका इ एम -1 हे 10 ग्राम किंवा  बायर फेनोस क्विक 10 मिली प्रति 15 लिटर पंप घेऊन फवारणी करावी 

 

रोग व्यवस्थापन

👉डाउनी मिल्ड्यू (केवडा)- पानाच्या खालील बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात या रोगाचा नंतर प्रसार पानांचे देठ यावर होतो दमट हवामानात हा रोग झपाट्याने वाढतो. नियंत्रणासाठी डायथेन एम 45 हे औषध 15 दिवसांच्या अंतराने लक्षणे दिसताच 45 ग्राम 15 लिटर पाण्यातून फवारावे.

👉पावडरी मिल्ड्यू (भुरी) - पानाच्या खालच्या बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते वाळलेल्या अगर जुन्या पानांवरून सुरुवात होते. ढगाळ वातावरणात व दमट हवामानात या रोगाची वाढ मोठ्या प्रमाणात होते. नियंत्रण - रोको 10 ग्राम किंवा टाटा ताकत 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

👉फळ कुज - फळे ओलसर जमिनीला टेकल्यास अगर फळे पावसाळ्यात काढणीस आल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात दिसतो. नियंत्रण फळांचा जमिनीशी संपर्क रोखवा, कॉपर ओक्झिक्लोराईडची 2.5 ग्राम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.

👉मोझॅक व्हायरस - व्हायरसजन्य रोग असून मावा किडीद्वारे त्याचा प्रसार होतो. नियंत्रण अरेवा (थायोमिथोक्साम) 10 ग्राम किंवा उलाला 6 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिवळे व निळे चिकट सापळे 20 नग लावावेत. 

 

काढणी व उत्पादन

काकडी पिकाची काढणी करताना फळे थोडी कोवळी असल्यास तोडावेत यामुळे बाजारामध्ये काकडीला चांगला भाव मिळतो. काकडी पिकांची तोडणी हि 2 ते 3 दिवसामध्ये करणे आवश्यक आहे. काकडीचे उत्पादन हे जाती व हंगामानुसार प्रति एकरी 100 ते 120 क्विंटल पर्यंत उत्पादन होऊ शकेल. 

विविध जातीच्या काकडी बियाणे किंमत पाहण्यासाठी भारत ऍग्री आप्लिकेशन डाउनलोड करा. 

 

Conclusions | सारांश

काकडीमध्ये पाण्याचा अंश असल्याने उन्हाळी हंगामात याला चांगली मागणी असते. या पिकाची लागवड (kakdi lagwad) तीनही हंगामात करता येते परंतु पाण्याची उपलब्धता आणि मल्चिंग पेपरचा वापर यामुळे चांगले उत्पादन काढता येते. सुधारीत जातींची लागवड, नियोजनबद्ध खत आणि पाणी व्यवस्थापन, कीड-रोगांचे नियंत्रण या गोष्टींचे चांगले नियोजन केल्यास काकडी लागवड फायद्याची होऊ शकते. 

 

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 

1. काकडी पिकांची लागवड कशी करावी आणि किती अंतरांवर करावी?

उत्तर -  काकडी पिकाची लागवड बेड वर करावी. दोन ओळीतील अंतर 5 फूट ठेवून दोन रोपातील अंतर 2 फूट ठेवावे. 

2. काकडीची बांधणी कधी करावी?

उत्तर- लागवडीनंतर एक महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी.

3. काकडी मध्ये किती टक्के पाणी असते?

उत्तर - काकडी मध्ये 90 ते 95 % पाणी असते.  

4. काकडीचे एक एकर लागवडीसाठी किती बियाणे लागते?

उत्तर- काकडीचे एक एकर लागवडीसाठी 200 ग्राम बियाणे लागते.  

 

People also read | हे देखील वाचा 

1. भाजीपाला पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण

2. ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन

3. स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. कुसुम सोलर पंप योजना 2024 ची संपूर्ण माहिती

 

लेखक | Author

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी