jowar variety

jowar variety: रब्बी हंगामात ज्वारीच्या या वाणांची पेरणी करा आणि मिळवा भरगोस उत्पादन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण रब्बी हंगामात ज्वारीच्या या वाणांची  jowar variety संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रात पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची लागवड होत नाही. गोकुळाष्टमीनंतर १ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोल रब्बी ज्वारीची लागवड करतात. या उलट मराठवाड्यात दोन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जाते. रब्बी ज्वारीसाठी ऑक्‍टोबर महिन्याचा पहिला पंधरवाडा (१ ते १५ ऑक्‍टोबर) हा कालावधी सर्वांत चांगला असून, या काळात पेरणी केल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन चांगले मिळते. पण ज्वारी लागवड करतं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो कि कोणत्या  वाणाचा वापर करावा तर या लेखामध्ये आपण जमिनीच्या प्रकारानुसार तसेच ज्वारीच्या उपयोगावरून वाणाची माहिती घेऊ. 


ज्वारी वाण | hybrid jowar seeds -


1. फुले अनुराधा -

पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस.

अवर्षणास प्रतिकारक्षम.

भाकरी उत्कृष्ट, सकस आणि चवदार.

जनावरांसाठी कडबा अधिक पौष्टीक व पाचक.

खोडमाशीस प्रतिकारक्षम.

कोरडवाहू क्षेत्रासाठी, हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य.

कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी ४-५  क्विं. व कडबा १२ - १५ क्विं.


2. फुले माऊली -

पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस.

भाकरीची चव उत्तम.

जनावरांसाठी कडबा पौष्टीक व चवदार.

हलक्या व मध्यम जमिनीसाठी लागवडीस योग्य.

धान्याचे उत्पादन हलक्या जमिनीत एकरी  ४-५ क्विं. व कडबा १२ - १५ क्विं.

धान्याचे उत्पादन मध्यम जमिनीत एकरी  ७-८ क्विं. व कडबा १८-२० क्विं.


3. फुले सुचित्रा -

पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस.

उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत.

मध्यम जमिनीसाठी शिफारस.

धान्य उत्पादन एकरी १०- १२ क्विंटल व कडबा २५-२६ क्विंटल.


4. फुले वसुधा -

पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस.

दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार.

भाकरीची चव उत्तम.

ताटे भरीव, रसदार व गोड.

खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.

भारी जमिनिकारिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.

कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी १०-१२ क्विं. व कडबा २५-२७ क्विं.

बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी १२-१४ क्विं. व कडबा २८-३० क्विं.


5. फुले यशोदा -

पक्व होण्याचा कालावधी 120 ते 125 दिवस.

दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार, भाकरीची चव चांगली.

भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित.

कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी १०-१२ क्विं. व कडबा २५-२७ क्विं.

बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 12-15 क्विं. व कडबा ३०-३२ क्विं.


6. सी.एस.व्ही 22 । hybrid jowar -

पक्व होण्याचा कालावधी 116 ते 120 दिवस.

दाणे मोत्यासारखे चमकदार, भाकरीची चव चांगली.

खोडमाशीस प्रतिकारक्षम.

भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.

कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 10-12 क्विं. व कडबा 25-27 क्विं.

बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 13-14 क्विं. व कडबा 30-32 क्विं.


7. परभणी मोती -

पक्व होण्याचा कालावधी 125 ते 130 दिवस.

दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार.

खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.

भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस.

कोरडवाहू धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 7 क्विं. व कडबा 22-23 क्विं.

बागायती धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 13 क्विं. व कडबा 25-26  क्विं.


8. फुले रेवती -

पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.

दाणे मोत्यासारखे, पांढरे चमकदार.

भाकरीची चव उत्कृष्ट.

कडबा पौष्टीक व अधिक पाचक.

भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस.

धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 17-18 क्विं. व कडबा 38-40 क्विं.


9. मालदांडी 35-1 -

मध्यम खोल जमिनीत कोरडवाहू साठी शिफारस.

पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.

दाणे चमकदार, पांढरे.

भाकरीची चव चांगली.

खोडमाशी प्रतिकारक्षम.

धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 6-7 क्विं. व कडबा 23क्विं.


10. फुले उत्तरा -

हुरड्याची अवस्था येण्यास 90-100 दिवस.

हुरड्यासाठी शिफारस.

भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात.

सरासरी 70-90 ग्रॅम इतका हुरडा मिळतो.

हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.


11. फुले पंचमी -

लाह्याचे प्रमाण (वजनानुसार) 87.4 टक्के.

लाह्या मोठ्या प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात.

खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.

महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी लाह्यांसाठी प्रसारित.


( सूचना - वरील सर्व वाणाच्या hybrid jowar price किमती आपल्या भागात वेगवेगळ्या असू शकतात.  )


सारांश | Conclusion - 

महाराष्ट्रामध्ये ज्वारी jowar variety हे महत्वाचे पीक आहे. हे पीक बागायती आणि कोरडवाहू अश्या दोन्ही प्रकारे लागवड करता येते. ज्वारीची लावण्यात येणारे बियाणे varieties of jowar हे जर उपयोग आणि जमिनीच्या प्रकारानुसार असेल तर अपेक्षित उत्पादन मिळते. ज्वारीच्या वाणासोबतच अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पेरणीची वेळ, खत - पाणी नियोजन आणि कीड रोग व्यवस्थापन असणे गरजेचे आहे. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. ज्वारी किती महिन्याचे पीक आहे?

उत्तर - जाती नुसार ज्वारी ४ ते ५ महिन्याचे पीक आहे. 

2. ज्वारीच्या लागवडीच्या पद्धती काय आहेत?

उत्तर  - बियाणे 5 सेमी खोलीवर पेरून मातीने झाकून टाका. 60 सेंटीमीटर अंतरावर जोडलेल्या ओळींमध्ये 15 सेमी अंतर ठेवून बिया पेरा. 

3. ज्वारी पेरण्याची योग्य वेळ कोणती?

उत्तर - ऑक्‍टोबर महिन्याचा पहिला पंधरवाडा (१ ते १५ ऑक्‍टोबर) हा कालावधी सर्वांत चांगला असून, या काळात पेरणी केल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन चांगले मिळते. 

4. कोरडवाहू लागवडीसाठी ज्वारीचे कोणते वाण चांगले आहे?

उत्तर - कोरडवाहू लागवडीसाठी  मालदांडी 35-1 हे वाण चांगले आहे. 

5. हुरड्यासाठी आणि लाह्यांसाठी ज्वारीचे कोणते वाण चांगले आहे?

उत्तर - हुरड्यासाठी फुले उत्तरा आणि लाह्यांसाठी फुले पंचमी हे वाण चांगले आहेत. 


People also read | हे देखील वाचा - 

1. कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक | कांदा बेसल डोस

2. कांदा पिकामध्ये या फवारण्या अवश्य घ्या | रिजल्टची 100 % गॅरंटी

3. यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदेलेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी