sugarcane fertilizer schedule

sugarcane fertilizer schedule: ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण ऊस खत व्यवस्थापन (sugarcane fertilizer schedule) याबद्दल जाणून घेणार आहोत. ऊस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी चांगले उत्पादन देणारे नगदी पीक आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे ऊस पट्टा म्हणून ओळखले जातात. ऊस लागवडचे आडसाली, पूर्व हंगाम आणि सुरु असे तीन हंगाम आहेत. 


हंगामानुसार लागवड | Sugarcane sowing time -

👉सुरु – 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी

👉पुर्वहंगामी – 15 ऑक्टोंबर ते 15 नोंव्हेबर

👉आडसाली – 15 जुलै ते 15 ऑगस्ट


ऊस खत डोस चार्ट | sugarcane fertilizer dose in maharashtra -

खतमात्रा देण्याची वेळ

आडसाली

पूर्व हंगामी

सुरु

नत्र

स्फुरद

पालाश

नत्र

स्फुरद

पालाश

नत्र

स्फुरद

पालाश

लागणीच्या वेळी (basal dose for sugarcane)

16

34

34

14

34

34

10

24

24

लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी

64

-

-

55

-

-

40

-

-

लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी

16

-

-

14

-

-

10

-

-

मोठ्या बांधणीच्या वेळी

64

34

34

55

34

34

40

22

22

एकूण

160

68

68

136

68

68

100

46

46

एकूण को. 86032 साठी

200

80

80

160

68

68

120

56

56


सुरु खत व्यवस्थापन | fertilizer schedule for sugarcane -

1. ऊस खत व्यवस्थापन (sugarcane fertilizer dose per acre) करताना मातीचे परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील तेवढीच गरज असते. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर त्यानुसारच खतांचे नियोजन करावे.  

2. बेसल डोस (sugarcane basal dose) - सिंगल सुपर फॉस्फेट 200 किलो + युरिया 50 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो + दाणेदार कीटनाशक 4 किलो 

3. रोप लागवडीनंतर २० दिवसानी किंवा बेणे लंगडी नंतर 30 दिवसानी - युरिया 50 किलो + अमोनिअम सल्फेट 50 किलो + मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो + मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो + निंबोळी पेंड 50 किलो 

4. लागवडीनंतर 70 दिवसानी (बाळबांधणी) - 10:26:26 - 100 किलो + युरिया 100 किलो + अमोनिअम सल्फेट 50 किलो + मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो +  निंबोळी पेंड 100 किलो 

5. लागवडीनंतर 100- 110 दिवसानी (मोठी बांधणी) -  डी ए पी  - 100 किलो + युरिया 50 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो + दाणेदार कीटनाशक 4 किलो 

6. प्रत्येक खत दिल्यानंतर IFC NPK जिवाणू 500 ग्राम + IFC मायकोराहीझा 100 ग्राम + 2 किलो काळा गूळ रात्र भर भिजत ठेवून ड्रीप / ड्रेंचिंग किंवा पाटपाण्याने द्यावे. 


ड्रीपच्या माध्यमातून खत व्यवस्थपन -

ऊस पीक वाढीच्या अवस्था

युरिया (किलो)

अमोनियम सल्फेट (किलो)

12:61:00 (किलो)

पांढरा पोटॅश (किलो)

मॅग्नेशिअम सल्फेट (किलो)

उगवण (0-45 दिवस)

10

10

6

4

-

फुटवा फुटणे (46-90 दिवस)

25

-

4

5

-

कांडी सुटणे (91-180 दिवस)

15

15

9

8

2

पक्वता (181-240 दिवस)

-

10

6

13.50

2


*  सर्व खते प्रति आठवडा प्रति एकरी ड्रीप ने द्यावे. 


खते देताना घ्यावयाची काळजी -

1. खते जमिनीवर पसरून न देता ती मातीत मिसळण्यासाठी चळी घेऊन किंवा खत पेरणी अवजाराच्या साह्याने द्यावीत. 

2. युरिया खत देताना निंबोळी पेंडीबरोबर 6 - 1 या प्रमाणात मिसळून द्यावीत. 

3. हलक्‍या प्रतीच्या जमिनीत युरियाचा वापर जास्तीत जास्त वेळा विभागून करावा.

4. जमिनीमध्ये वाफसा असताना खते द्यावीत. जमीन कोरडी असल्यास किंवा पाणी दिल्यानंतर लगेच खते देऊ नयेत. 

5. हिरवळीचे पीक घेऊन ऊस लागण करावयाची असल्यास उसासाठीचा स्फुरद खताच्या पहिल्या हप्त्यापैकी 50 टक्के हिरवळीच्या पिकास द्यावा. उरलेला 50 टक्के ऊस लागणीच्या वेळी सरीमध्ये द्यावा. 

6. पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश या खताची मात्रा एकरी 50 किलो वाढवून द्यावी. 


फवारणीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन -


👉पहिली फवारणी (लागवडीनंतर 65 दिवसांनी) -


1. 4 ग्रॅम जीब्रालिक ऍसिड आणि प्रॉमिक्स हे पाण्यात आणि 4 ग्रॅम 6 बेंझिल अमिनोप्युरीन (6 BA) 400 मिली सॉल्व्हेंटमध्ये (6 BA सह सॉल्व्हेंट मिळते) विरघळवून घ्या आणि हे दोन्ही विरघळलेले द्रावण पाण्यातून मिसळून 12 लिटर द्रावण करा.

2. कूण 12 लिटर द्रावणातून 2 लिटर घ्या आणि फवारणी करण्यासाठी 15 लिटर क्षमतेच्या पंपामध्ये पाण्यात मिसळा.

3. यासोबत तुम्ही 12:61:00 - 75 ग्रॅम + 25 मिली सीव्हीड अर्क प्रति 15-लिटर पंप मिसळू शकता.


👉दुसरी फवारणी (लागवडीनंतर 85 दिवसांनी) -


1. 6 ग्रॅम जीब्रालिक ऍसिड आणि प्रॉमिक्स हे पाण्यात आणि 6 ग्रॅम बेंझिल अमिनोप्युरिन (6 BA) 600 मिली सॉल्व्हेंटमध्ये (6 BA सह सॉल्व्हेंट मिळते) विरघळवून घ्या आणि हे दोन्ही विरघळलेले द्रावण पाण्यातून मिसळून १८ लिटर द्रावण करा.

2. एकूण 18 लिटर द्रावणातून 2 लिटर घ्या आणि फवारणी करण्यासाठी 15 लिटर क्षमतेच्या पंपामध्ये पाण्यात मिसळा.

3. यासोबत तुम्ही नॅनो युरिया (50 मिली) आणि 25 मिली सीव्हीड अर्क प्रति 15-लिटर पंप मिसळू शकता.


👉तिसरी फवारणी (लागवडीनंतर 105 दिवसांनी) -


1. 7 ग्रॅम जीब्रालिक ऍसिड आणि प्रॉमिक्स हे पाण्यात आणि 7 ग्रॅम 6 बेंझिल अमीनोप्युरिन (6 BA) 700 मिली सॉल्व्हेंटमध्ये विरघळवून घ्या (6 BA सह सॉल्व्हेंट मिळते) आणि हे दोन्ही विरघळलेले द्रावण पाण्यातून मिसळून २० लिटर द्रावण करा.

2. एकूण 20 लिटर द्रावणातून 2 लिटर घ्या आणि फवारणी करण्यासाठी 15 लिटर क्षमतेच्या पंपामध्ये पाण्यात मिसळा.

3. यासोबत तुम्ही ट्रायकोन्टॅनॉल 0.1% (30 मिली) + चेलेटेड मॅग्नेशियम (15 ग्रॅम) प्रति 15 लिटर पंपामध्ये मिसळू शकता.


फवारणीचे फायदे -

1. उसाच्या पानाची लांबी रुंदी वाढते. 

2. प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून अन्न तयार करण्याचे प्रमाण वाढते. 

3. फुटव्यांची जाडी वाढते. 

4. उसाचे सरासरी वजन वाढण्यासाठी याचा फायदा होतो.


Conclusions | सारांश -

उसाचे अपेक्षित उत्पादन घेयचे असल्यास उसाची योग्य जात, लागवड पद्धती, बेणे प्रक्रिया बरोबरच ऊस खत नियोजन करणे तेवढेच महत्वाचे आहे. खत व्यवस्थापन (sugarcane fertilizer schedule) करताना मुख्य अन्नद्र्व्यसोबतच सल्फर, मॅग्नेशियम या सारखी दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव देणे तेवढेच महत्वाचे आहे. एकंदरीत ऊस पिकास शिफारसी प्रमाणे सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास नक्कीच उसाचे उत्पादन वाढण्यास मदत होते. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. ऊस लागवडीचे किती हंगाम आहेत?

उत्तर - ऊस लागवडीचे सुरु, आडसाली, पूर्वहंगामी असे तीन हंगाम आहेत. 

2. कोणते दुय्यम अन्नद्रव्य ऊस पिकास जास्त लागते?

उत्तर- सल्फर आणि मॅग्नेशियम हि अन्नद्रव्ये ऊस पिकास जास्त प्रमाणात लागतात. 

3. उसाची सुधारित आणि जास्त उत्पादन देणारे वाण कोणते?

उत्तर - को - 86032 हि उसाची जास्त उत्पादन देणारी सुधारित जात आहे. 

4. को - 86032 जातीचा ऊस कसा ओळखावा?

उत्तर- ऊस रंगाने लालसर - पारवा, कांड्या मध्यम जाड, डोळा गोल असतो. पक्व कांड्यांना भेगा पडतात, पाने लांब, रुंद व टोकाला वळलेली असतात.


People also read | हे देखील वाचा - 

1. गव्हाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न

2. ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रण

3. डेलीगेट कीटकनाशकाची संपूर्ण माहिती वापर, फायदे आणि किंमत

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण



लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी