lavala weed control

lavala weed control: ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण ऊस पिकामध्ये लव्हाळा तण नियंत्रण (lavala weed control) कसे करावे? याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड, रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त आहे परंतु मजुरांची कमतरता मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचा बनलेला आहे उसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची (एकदल) गतवर्गीय तणे, घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची (द्विदल) गवतवर्गीय तणे आढळतात. सर्व ताणांमध्ये लवकर नियंत्रण न होणारे आणि उसाचे उत्पादन कमी करणारे तण म्हणजे लव्हाळा. lavala weed control लव्हाळा तणामुळे ऊस पिकाचे ४० - ५० % पर्यंत नुकसान होऊ शकते.


लव्हाळा तण | lavala weed -

1. लव्हाळा हे तण खूप झपाट्याने वाढते, त्याच्या मुळाशी खूप साऱ्या गाठी तयार होतात त्यांना नागरमोथा असेही म्हणतात. 

2. गाठीपासून पुन्हा नवीन कोंब फुटून त्याचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर ते पूर्ण शेतात पसरते व लवकर नियंत्रणात येत नाही.

3. ऊस पिकाला दिलेली खते आणि पाणी हे तण शोषून घेते परिणामी ऊस पिकाला अन्नद्रव्ये न मिळाल्यामुळे उसाची वाढ कमी होऊन उत्पादन कमी होते. 

 

lavala weed control

ऊस लव्हाळा नियंत्रनासाठी बेस्ट तन नाशक - 

1. सेम्परा (हेलोसल्फ्यूरॉन मिथाइल 75% डब्ल्यूजी)

2. लव्हाळा नियंत्रणासाठी ऊस पिकामध्ये चांगला रिझल्ट देणारे तणनाशक म्हणजे धनुकाचे सेम्परा. 

3. या मध्ये हेलोसल्फ्यूरॉन मिथाइल 75% डब्ल्यूजी हा रासायनिक घटक आहे. 


सेम्परा कधी वापरावे? | sugarcane lavhala niyantran -

सेम्परा तणनाशक उसाची उगवण झाल्यानंतर २५ ते ३० दिवसानंतर वापरू शकता. या तणनाशकांमध्ये इतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी २ ४ डी किंवा टाटा मेट्री/सेन्कोर या सारखे इतर तणनाशक मिसळू शकता. 


सेम्पराची कार्य पद्धती -

1. तणनाशक मुळे आणि खोडामधून वर, झाइलम मार्गे वर आणि फ्लोम मार्गे खाली वहन होते.

2. हे लव्हाळयाच्या गाठीमध्ये साचते आणि एन्झाइम एसिटोलॅक्टेट सिंथेस (एएलएस) प्रतिबंधित करते जे आवश्यक अमीनो ऍसिड साठी जबाबदार आहे.

3. त्यामुळे लव्हाळा  नवीन पेशींसाठी प्रथिने तयार करू शकत नाही.

4. संपूर्ण प्रक्रिया वनस्पतीच्या पाण्याच्या वापराने म्हणजेच बाष्पोत्सर्जनच्या मदतीने चालते.

5. फवारणी केल्यापासून १५ दिवसांमध्ये तणाची पाने पिवळी होतात आणि २५ ते ३० दिवसांनी गाठी काळ्या पडून लव्हाळ्याचा नाश होतो. 


सेम्पराचे फायदे | Benefits of sempra herbicide -

1. कमी डोसमध्ये रिझल्ट - सेम्प्रा 36 ग्रॅम प्रति एकर मध्ये लव्हाळा गवताचे lavala weed control उत्कृष्ट नियंत्रण प्रदान करते. मातीमध्ये तणनाशकाची अवशेष राहत असल्याने उशिरा उगवणाऱ्या तणांवर नियंत्रण ठेवते. इतर तणनाशकांच्या तुलनेत डोस कमी आहे.

2. अन्नद्रव्याचे शोषण थांबवते - सेम्प्रा लव्हाळ्याच्या गाठींद्वारे 24 तासांच्या आत अन्नद्रव्यांचे शोषण थांबवते ज्यामुळे चांगले निरोगी पीक राहते.

3. पिकासाठी सुरक्षित - सेंप्रा ऊस आणि मका पिकासाठी सुरक्षित आहे.

4. मजबूत मातीची अवशिष्ट क्रिया - सेम्प्राचे मातीमध्ये अवशेष राहत असल्याने उशिरा उगवणाऱ्या तणांवर नियंत्रण ठेवते.

5. गवत काढणीचा कमी खर्च - गवत काढणीसाठी मजुरांवर होणार खर्च कमी होतो त्यामुळे होणाऱ्या खर्चामध्ये बचत होते.

6. उत्पादनामध्ये वाढ होते - सेम्प्रामुळे अधिक उत्पादन मिळते त्यामुळे अधिक नफा मिळतो.


चांगल्या रिझल्टसाठी हे करा - 

1. फवारणी आधी जमिनीमध्ये ओलावा आसावा. 

2. फवारणी करताना IFC स्टिकर ५ मिली प्रति १५ लिटर पंप मिसळावे. 

3. फवारणी केल्यानंतर १० दिवस जमिनीची मशागत करू नये. 

4. फवारणी केल्यानंतर १२ ते १५ दिवसांनी पाणी द्यावे. 


👉लव्हाळा तणनाशक वापरण्याची पद्धत - फवारणी.

👉शिफारसीत  पिके - ऊस, मका.


डोस -

👉0.24 ग्रॅम/लिटर पाणी,

👉3.6 ग्रॅम/पंप (15 लिटर पंप),

👉36 ग्रॅम/एकर फवारणी.


सारांश | Conclusion - 

ऊस पिकामध्ये तणांचा प्रधुरभाव मोठ्या प्रमाणात होतो. या ताणांमध्ये लवकर नियंत्रण न होणारे आणि सर्वात जास्त नुकसान करणारे तण म्हणजे लव्हाळा. लव्हाळा गवताच्या lavala weed control मुळांमधील गांठींमुळे हे तण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उगवते. या तणांचे लवकर नियंत्रण न झाल्यास ऊस पिकातील अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेते असल्यामुळे उसाचे ४० ते ५० टाक्यांपर्यंत नुकसान होते. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

1. लव्हाळा तण किती दिवस जगते?

उत्तर -. लव्हाळा तण बहुवार्षिक असल्याने ते अनेकवर्षे शेतामध्ये वाढते. 

2. लव्हाळा हे तण कोणत्या वर्गात मोडते?

उत्तर – लव्हाळा हे तण एकदल वर्गीय आहे.

3. लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकात होतो?

उत्तर – लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव भुईमूग, सोयाबीन, कापूस, ऊस, मका, भात या पिकांमध्ये होतो. 

4. ऊस पिकातील लव्हाळा नियंत्रणासाठी कोणते तणनाशक चांगले आहे?

उत्तर - ऊस पिकातील लव्हाळा नियंत्रणासाठी धनुका सेम्परा हे तणनाशक वापरू शकतो. 

5. लव्हाळा नियंत्रणासाठी धनुका सेम्परा हे तणनाशक कोणत्या पिकामध्ये वापरू शकतो?

उत्तर - ऊस आणि मका ह्या पिकांमध्येच धनुका सेम्परा हे तणनाशक वापरू शकतो. 


People also read | हे देखील वाचा - 

1. कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक | कांदा बेसल डोस

2. कांदा पिकामध्ये या फवारण्या अवश्य घ्या | रिजल्टची 100 % गॅरंटी

3. यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे



लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

कृषी डॉक्टर

VIP

कृषी पुस्तिका

केटेगरी