fruit fly

fruit fly : संत्रा आणि मोसंबी पिकातील फळमाशी नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण संत्रा आणि मोसंबी पिकातील फळमाशी fruit fly नियंत्रणाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. फळमाशीवर आजपर्यंत झालेल्या संशोधनानुसार भारतामध्ये फळमाशीच्या सुमारे 200 प्रजाती आढळून आल्या असून, त्यापैकी 5 ते 6 प्रजाती पिकांना थेट नुकसान पोचविणार्‍या आहेत. प्रामुख्याने बॅक्ट्रोसेरा डॉर्सेलिस, बॅक्ट्रोसेरा झोनॅटा, बॅक्ट्रोसेरा करेक्टा व बॅक्ट्रोसेरा टाऊ या चार जाती आढळून येतात. या केवळ पाच ते सहाच प्रजाती असल्या तरी देशात पिकणार्‍या सुमारे 150 फळांसाठी उपद्रवी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, वेगवेळ्या फळांची फळमाशी वेगवेगळ्या प्रकारची असते. यासाठी योग्य उपाययोजना केल्यास फळमाशीवर fruit fly नियंत्रण मिळवणे सहज शक्य होते. मात्र यासाठी वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. 


किडीची ओळख | fruit fly identification - 

1. मोसंबी फळबागेतील फळमाशी fruit fly घरातील माशीप्रमाणे असते. परंतु मोसंबी फळावरील फळमाशी घरातील माशीपेक्षा आकाराने मोठी दिसते व फळमाशीचा रंग पुढील भागात काळसर असून मागील भाग तपकिरी रंगाचा असतो.

2. फळमाशीचा मध्यभागावर सोनेरी पिवळसर रंग छटा दिसते.

3. मोसंबी फळमाशीची अळी दुधी रंगाचे असून दोन्ही भागाकडे टोके निमुळती असतात.

 

किडीचा जीवनक्रम | fruit fly lifecycle -

1. अळी अंड्यातून बाहेर पडते. साधारणत: हिरवा रंगातून पिवळसर रंग येण्याचा वेळेस मादी अंडनलीकेच्या सहायाने फळाच्या साली खाली अंडी घालतात.

2. अळीची अवस्था साधारणत: 8-15 दिवसांची राहते.

3. अळी नंतर कोषावस्था असते पूर्ण वाढलेल्या अळ्या कोषावस्थेत जातात कोषावस्था 10-12 दिवसांची असते.

4. कोषावस्थेतून फळ माशीचे प्रौढ कीटक बाहेर पडतात. साधारणत: दिड महिन्यात फळ माशीचा जीवनक्रम संपतो.

 

नुकसानीचा प्रकार | damage type -

1. फळमाशीची मादी फळाच्या सालीखाली अंडी घालते आणि अंडी उबवण होते. 

2. अंडी उबवण झाल्यानंतर अळ्या फळाच्या रसावर आणि गरावर उदरनिर्वाह करतात. 

3. फळ पक्वतेच्या वेळी प्रादुर्भाव मोठ्या प्रमणात आढळतो आणि नुकसान देखील जास्त होते. 

4. मादी माशीच्या अंडी घालण्याच्या वेळेस अंडाशय फळांच्या सालीमध्ये खुपसल्यामुळे फळ त्या ठिकाणी पिवळसर बनते, आणि फळ दाबल्यानंतर दुर्गंधीयुक्त रस बाहेर येतो. शेवटी इजा झालेल्या ठिकाणी काळपट डाग पडतो आणि बुरशीकारकांचा प्रादुर्भाव वाढतो आणि फळ गळून पडते आणि कालांतराने सडते.

 

 एकात्मिक कीड नियंत्रण | fruit fly control - 

1. जमिनीची सारखी वखरणी करावी त्यामुळे कोषावस्था सूर्यकिरणे व मित्रकिडी तसेच पक्षांद्वारे नियंत्रित होते.

2. फळ पक्वतेच्यावेळी प्रादुर्भाव वाढल्यामुळे फळगळ वाढते अशा फळांमध्ये फळमाशीची जीवनक्रिया चालूच राहते म्हणून गळलेली फळे बागेत न ठेवता ताबडतोब बागेच्या बाहेर काढून नष्ट करावीत.

3. मादी अंडी निर्मिती करते असते, म्हणून नर पतंगाची संख्या नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा उपयोग करावा बागेच्या चार कोपऱ्यात चार आणि बागेच्या मध्यभागी असे 5 कामगंध सापळे fruit fly trap प्रति एकरी लावून ठेवावेत.

4. फळमाशीचा प्रादुर्भाव फळ पक्वतेच्या वेळी वाढत असतो म्हणून या किडीचा जीवनक्रम विस्कळीत करण्यासाठी फळ येण्याच्यापूर्वीच कामगंध सापळे fruit fly trap लावावेत.

5. तुळसीच्या पानांमध्ये मिथाईल युजेनॉल हा घटक असतो म्हणून बागेच्या चारही बाजूने तुळसीची लागवड करावी जेणेकरून फळमाशी या सुगंधाकडे आकर्षित होईल.

6. रासायनिक प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 50% ईसी 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 

Fruit Fly Pheromone TrapChloropyriphos 50% EC

 

सारांश | Conclusion - 

फळमाशी फळाच्या अंतर्गत भागात राहत असल्यामुळे कोणत्याही किटनाशाकाचा फळमाशीवर परिणाम दिसत नाहीत. फळमाशीचा प्रादुर्भाव साधारणता: फळ पक्त्वेच्या वेळी वाढत असल्यामुळे तोडणीच्या वेळी फळावर कीटकनाशकाची फवारणी केल्यास कीटकनाशकांंचा उर्वरित अंश फळामध्ये राहिल्यास फळे खाण्यासाठी तसेच निर्यात करण्यासाठी योग्य नसतात. अशी फळे आंतरराष्ट्रीय निर्यातवेळी फळ क्वारंटाईन कायद्यानुसार नाकारली जातात. म्हणून किडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रसाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. 

 

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. संत्रा आणि मोसंबी सारख्या फळ पिकांमध्ये कोणत्या फळमाशीचा प्रधुरभाव होतो?

उत्तर - प्रामुख्याने बॅक्ट्रोसेरा डॉर्सेलिस, बॅक्ट्रोसेरा झोनॅटा व बॅक्ट्रोसेरा करेक्टा या जाती आढळून येतात.

2. संत्रा आणि मोसंबी पिकातील माशी कशी दिसते?

उत्तर - फळमाशी घरातील माशीप्रमाणे असते. परंतु मोसंबी फळावरील फळमाशी घरातील माशीपेक्षा आकाराने मोठी दिसते व फळमाशीचा रंग पुढील भागात काळसर असून मागील भाग तपकिरी रंगाचा असतो.

3. फळमाशी पिकाचे कश्याप्रकारे नुकसान करते?

उत्तर - मादी माशीच्या अंडी घालण्याच्या वेळेस अंडाशय फळांच्या सालीमध्ये खुपसल्यामुळे फळ त्या ठिकाणी पिवळसर बनते, आणि फळ दाबल्यानंतर दुर्गंधीयुक्त रस बाहेर येतो. शेवटी इजा झालेल्या ठिकाणी काळपट डाग पडतो आणि बुरशीकारकांचा प्रादुर्भाव वाढतो आणि फळ गळून पडते आणि कालांतराने सडते.

4. संत्रा आणि मोसंबी पिकातील फळमाशीचे जैविक नियंत्रण कसे करावे?

उत्तर - कामगंध सापळ्यांचा उपयोग करावा बागेच्या चार कोपऱ्यात चार आणि बागेच्या मध्यभागी असे 5 कामगंध सापळे प्रति एकरी लावून ठेवावेत.

5. संत्रा आणि मोसंबी पिकातील फळमाशीचे रासायनिक नियंत्रण कसे करावे?

उत्तर - रासायनिक प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 50% ईसी 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 


People also read | हे देखील वाचा - 

1. एम्प्लिगो कीटकनाशकाची संपूर्ण माहिती

2. वांगे पिकातील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या आळीचे नियंत्रण

3. यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे



लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी