fruit cracking

fruit cracking: जाणून घ्या फळ तडकणे मागील कारणे आणि उपाय

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण फळ तडकण्याची करणे (fruit cracking) आणि त्यावरील उपाय या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये मोसंबी, संत्री, डाळिंब, टोमॅटो (cracking tomatoes) इ. लागवड मोठ्या प्रमाणात आहे फळबागेमध्ये फळ तडकणे (crack fruits) हि मोठी समस्या आहे. साधारणपणे 15 ते 20 टक्के नुकसान फळे तडकल्याने (fruit cracking in tomato) होते. तडकलेली फळे जरी गोड असली तरी ती साठवून ठेवता येत नाहीत. आणि उशिरा विक्रीस ती अयोग्य ठरतात. फळे भेगाळल्या ने त्यांच्या वजनात आणि रसाच्या प्रमाणात घट होते. फळ तडकणे (fruit cracking) हे केवळ एकाच कारणामुळे न होता त्यास अनेक कारणे कारणीभूत आहेत. त्यामध्ये चुकीचे पाणी व्यवस्थापन, जमिनीची निवड, हवामानातील बदल इत्यादी.

 

फळ तडकणे कारणे -

1. अतिशय हलक्या जमिनीत नांगरटीच्या तासात रोपांची चुकीच्या पद्धतीने लागवड.

2. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 12 टक्केपेक्षा जास्त असल्यास.

3. जमिनीमध्ये नत्र, स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम या दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता तसेच बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता असणे.

4. हवेतील तापमान व आर्द्रतेत विशेषतः रात्र व दिवसातील तापमानात होणारी तफावत.

5. अवर्षणासारखी परिस्थिती जास्त कालावधीसाठी राहिल्यास फळांची साल कडक होते. अशा परिस्थितीत एकाएकी पाऊस झाल्यास किंवा भरपूर पाणी दिल्यास फळांच्या तडकण्याच्या (fruit cracking in watermelon) प्रमाणात वाढ होते.

 

फळ तडकणे उपाय -

1. फळांना तडे पडू नयेत म्हणून पुरेसे परंतु नियमित पाणी द्यावे.

2. जमिनीत जास्त प्रमाणात सेंद्रिय आणि हिरवळीची खते टाकावीत त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, म्हणजे बागेला पाण्याचा ताण पडणार नाही परिणामी फळे तडकणार (tomato fruit cracking) नाहीत.

3. डाळिंब मृगबहार पावसाच्या अनियमितपणामुळे आणि हवेतील कमी - जास्त आर्द्रतेमुळे फळांना जास्त भेगा (fruit cracking in pomegranate) पडतात, मात्र आंबेबहार धरल्यास फळांना कमी प्रमाणात तडे पडतात.

4. जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे नियोजन करावे शक्यतो ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा व पाण्याचे नियंत्रित वापर करावा जास्त पाण्याचा वापर करू नये. काळ्या जमिनीत निचऱ्याची व्यवस्था करावी.

5. सूक्ष्मअन्नद्रव्ये कमतरता उदा. जस्त, लोह किंवा बोरॉनची कमतरता असल्यास सूक्ष्मअन्नद्रव्ये स्लरीद्वारे उदा. एकरी 200 लिटर पाण्यामध्ये 25 किलो ताजे शेण + 5 लिटर गोमुत्र + 5 किलो फेरस सल्फेट + 5 किलो झिंक सल्फेट + 1.5 किलो बोरॉन एकत्र आठवडाभर मुरवून 7 व्या दिवशी झाडांना स्लरी दयावी. 

6. फुले येण्यापुर्वी आणि 50 टक्के फुले असताना झाडांवर मायक्रोनुट्रीएंट ग्रेड-2 या द्रवरूप सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी करावी. 

7. लाल माती असलेल्या, हलक्या जमिनीत बोरॉन कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास बोरॉनची फवारणी फुले आल्यावर व फळे लिंबाच्या आकाराची असताना करावी यासाठी बोरॉन 20 ग्राम प्रतो 15 लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी तसेच ड्रीपद्वारे 3 किलो कॅल्शियम नायट्रेट 200 लिटर पाण्यातून एकरी फळ फुगवणीच्या काळात ड्रीप मधून सोडावे किंवा बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता दिसून आल्यास बोरॉन 20 ग्राम प्रति 15 लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. 

8. बागेत आच्छादनाचा वापर केल्यास तापमान व आर्द्रतेवर नियंत्रण राहील. तसेच बागेच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूला वारा अडविणाऱ्या झाडांची लागवड करावी, त्यामुळे त्या दिशांनी येणाऱ्या वाऱ्याच्या गरम झळा फळांना लागणार नाहीत आणि फळे तडकन्याचे (pomegranate cracking) प्रमाण कमी होते.

9. सांगितलेल्या प्रमाणे उपाययोजना केल्यास 20 ते 25 टक्के डाळिंब फळांचे (fruit cracking in pomegranate) नुकसान टाळता येवु शकते.

 

Conclusions | सारांश -

डाळिंब, संत्री, मोसंबी टोमॅटो इ. पिकांमध्ये फळ तडकण्याची (fruit cracking) समस्या हि काही नैसर्गिक कारणांमुळे  जसे कि हवेतील तापमान व आर्द्रतेत विशेषतः रात्र व दिवसातील तापमानात होणारी तफावत. अवर्षणासारखी परिस्थिती, काएकी पाऊस झाल्यास किंवा भरपूर पाणी दिल्यास तसेच कॅल्शिअम आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे फळांच्या तडकण्याच्या प्रमाणात वाढ होते. यासाठी वेळीच सांगितल्या प्रमाणे उपाययोजना कराव्यात. 

 

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

 

1. फळ कोणत्या कारणामुळे तडकते?

उत्तर - जास्त ऊन, पाऊस या सारख्या नैसर्गिक कारणामुळे तसेच बोरॉन - कॅल्शिअम अन्नद्रव्याच्या कमतरते मुळे फळ तडकते. 

2. कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळ तडकते?

उत्तर - जमिनीमध्ये नत्र, स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम या दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता तसेच बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता

3. फळ तडकू नये म्हणून कोणती स्लरी पिकास द्यावी?

उत्तर -एकरी 200 लिटर पाण्यामध्ये 25 किलो ताजे शेण + 5 लिटर गोमुत्र + 5 किलो फेरस सल्फेट + 5 किलो झिंक सल्फेट + 1.5 किलो बोरॉन एकत्र आठवडाभर मुरवून 7 व्या दिवशी झाडांना स्लरी दयावी.  

4. फळ तडकण्याची समस्या कोणत्या जमिनी मध्ये जास्त जाणवते?

उत्तर - फळ तडकण्याची समस्या लाला माती आणि हलक्या जमिनीमध्ये जास्त जाणवते.   

 

People also read | हे देखील वाचा - 

भाजीपाला पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण

ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन

स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती

IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

कुसुम सोलर पंप योजना 2024 ची संपूर्ण माहिती

 

लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी