halad lagwad

halad lagwad: जाणून घ्या हळद लागवड ते काढणी संपूर्ण वेळापत्रक

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhidukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आपण हळद लागवड संपूर्ण माहिती halad lagwad information in marathi घेणार आहे. जगभरात वापरल्या जाणार्‍या हळदीपैकी 80% हळद भारतात तयार होते. आज भारत हा जगातील सर्वात मोठा हळदीचा उत्पादक देश आहे. महाराष्ट्रातील वातावरण halad lagwad अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे.  महाराष्ट्रामध्ये हिंगोली, सांगली आणि सातारा या जिल्हांमध्ये जास्त प्रमाणामध्ये हळदीची लागवड केली जाते. 

 

हळद लागवड करताना लागवडीची योग्य वेळ, सुधारित जातींचा वापर, रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा वापर, योग्य वेळी पाणी नियोजन तसेच कीड व रोग व्यवस्थापन या गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच अधिक उतपादन निघते. चला तर मग जाणून घेऊयात हळद लागवड कशी करावी. 

 

 हवामान

हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. उगवणीसाठी 30 ते 35 अंश सेल्सिअस, फुटवे फुटण्यासाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस, कंद वाढीसाठी20 ते 25 अंश सेल्सिअस, तर कंद चांगले पोसण्यासाठी 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. थंडीमुळे हळदीच्या पानाची वाढ थांबते व जमिनीतील कंदांची वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते.

 

जमीन 

पिकास चांगला निचरा होणारी तसेच मध्यम प्रतीची जमीन आवश्यक असते. भारी काळ्या चिकन, क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद पीक घेणे टाळावे. अशा जमिनीत पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो व पिकाची वाढ चांगली होत नाही. 

 

पूर्वमशागत 

जमिनीची ट्रॅक्‍टरच्या साह्याने 25 ते 30 सें.मी.पर्यंत खोल नांगरट करावी.  पहिल्या नांगरटीनंतर कमीत कमी 1 ते 2 महिन्यांनी दुसरी नांगरट आडवी करावी. दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून नांगरट करावी.

 

हळद लागवडीची वेळ 

हळद लागवडीसाठी 15 मे ते जूनचा पहिला आठवडा हा कालावधी उत्तम समजला जातो.

 

बेणे निवड 

हळदीची लागवड करण्यासाठी बेणे / कंद निवडण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. प्रत्येक जेठा गड्ड्यावर 8 ते 10 कोंब असतात. लागवडीसाठी वापरण्यात येणारे बेणे जून किंवा डोळे फुटलेले 40 ते 50 ग्रॅम वजनाचे आणि मुळ्याविरहीत असावे. सडलेले आणि कुजके गड्डे बियाण्यासाठी वापरू नयेत.

 

हळदीच्या जाती 

1. फुले स्वरूप :  महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे.  जातीचा पक्क्तेचा काळ हा 8.5 महिन्याचा असून फुटव्यांची संख्या 2 ते 3 प्रति झाड असते. हळकुंडे 35 ते 40 ग्रॅम वजनाची असून प्रत्येक कंदात 7 ते 8 हळकुंडे असतात. त्यांनंतर त्यावर उपहळकुंडाची वाढ होत असते. मुख्य हळकुंडाची लांबी 7 ते 8 सें.मी. असते. या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुण असल्याचे दिसून आले आहे.

    2. सेलम : महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यामध्ये लागवड करण्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर यांनी या जातीची शिफारस केली आहे. झाडास सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 12 ते 15 पाने येतात. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडावरील पेर्‍यांची संख्या 8 ते 9 असते. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण 4.5 टक्के असते. पूर्ण वाढ झालेल्या झाडास 3 ते 4 फुटवे येतात. ही जात पक्क होण्यास 8.5 ते 9 महिने लागतात. 

      3. कृष्णा (कडाप्पा) : हळकुंडे लांब व जाड असतात. हळकुंडाचा गाभा पिवळसर पांढरट असतो. दोन पर्‍यामधील अंतर इतर जातीच्या तुलनेने जास्त असते. पेर्‍यांची संख्या 8 ते 9 असून पिकाच्या कालावधीमध्ये 10 ते 12 पाने येतात. पानावरील ठिपके ( leaf blotch ) या रोगास ही जात कमी प्रमाणत बळी पडते. वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी जवळ जवळ 6 ते 7 सें.मी. असते. 

        4. राजापुरी : जातीस वाढीच्या कालावधीत 10 ते 18 पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा 18 ते 20 टक्के पडतो. ही जात करपा रोगास बळी पडते. काढणीस 8 ते 9 महिने लागतात.

          5. रानहळद किंवा कस्तुरी : कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे व आत नारिंगी लाल असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या हळकुंडास गोड वास येतो. 6.1% हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाने लांब - वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात, फुले सुवासिक, औषधासाठी उपयोग. ही जात वार्षिक असून महाबळेश्वर आणि कोकण विभागत मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

            6. आंबेहळद : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात. बहुवर्षायु जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट - पांढरी असून बोंड तीनधारी असते.

               

              बेणे प्रक्रिया 

              बेणेप्रक्रिया करताना बेणे कैमलॉक्स 20 मीली.+ बुरशीनाशक साफ 25 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये 20-25 मिनिटे बुडून ठेवावे. सावलीमध्ये सुकवून मगच लागवडीसाठी वापरावे साधारणपणे 10 लिटरचे द्रावण 100 ते 120 किलो बेण्यास वापरावे. बेणे प्रक्रिया केल्यास कंद माशी व बुरशीजन्य रोगाचा प्रधुरभाव कमी होतो. 

               

              लागवड करण्याच्या पद्धती 

              1. सरी वरंबा पध्दत: सारी वरंबा पद्धतीमध्ये 75 ते 90 सें.मी. अंतरावर सर्‍या पाडून घ्याव्यात. जमीनच्या उताराप्रमाणे 6 ते 7सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुर्‍याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत. 

                2. गादी वाफ पद्धत : या पद्धतीमध्ये दोन सऱ्यांमधील अंतर 4.5 ते 5 फूट ठेवावे. त्या सऱ्यावरील माथा सपाट करून 25 ते 30 सें.मी. उंचीचे आणि 60 ते 70सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्याच्या बरोबर मध्यभागी ठिबक अंथरून ठिबकच्या दोन्ही बाजूला 15 सें.मी. अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावेत म्हणजेच दोन ओळींमधील अंतर 30 सें.मी. होईल. दोन कंदांमधीलही अंतर 30 सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर दोन ओळी लावाव्यात. बेड तयार करताना एकरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत, 100 किलो दाणेदार सिंगल सुपर फास्फेट, 50 किलो 10:26:26,  100 निंबोळी पेंड, मायक्रोनुट्रीएंट 10 किलो खते शेतात मिसळावे. 

                   

                  तणनाशक 

                  हळद लागवडीनंतर लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना फुस्ट (ॲट्राझिन) हे तणनाशक 300 ग्राम प्रति एकरी फवारणी करावी आणि दीड ते दोन महिन्यांनी खुरपणी करून घ्यावी. 

                   

                  भरणी करणे 

                  हळदीच्या लागवडीनंतर 2.5 ते 3 महिन्यांनी भरणी करणे अत्यंत आवश्यक आहे. माती लावताना संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने माती लावावी. भरणी केल्यानंतर पिकास हलकेसे पाणी द्यावे. भरणी  केली नाही तर उत्पादनामध्ये जवळजवळ 15 ते 20 टक्क्यांनी घट येते. 

                   

                  खत व्यवस्थापन 

                  हळदीस सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा केल्यास भरपूर उत्पादन मिळते. त्यासाठी एकरी 5ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी पूर्वमशागती च्यावेळी जमिनीत मिसळावे. एक एकर क्षेत्रासाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी द्यावे. नत्र दोन हप्त्यांत विभागून द्यावे. नत्राचा 50% पहिला हप्ता लागवडीनंतर 45 दिवसांनी द्यावे. राहिलेला 50% दुसरा हप्ता भरणीच्यावेळी द्यावा. 

                   

                  कीड रोग नियंत्रण 

                  हळद पिकामध्ये कंद माशी, पाने खाणारी व पाने गुंडणारी अळी आणि पानातील रस शोषून घेणारा ढेकूण ह्या महत्वाच्या किडी आहेत तसेच कंदकूज आणि पानावरील करपा हे प्रमुख रोग आहेत.  

                   

                   काढणी आणि उत्पादन 

                  हळदीची काढणी जाती परत्वे 8 ते 9 महिन्यांमध्ये होते. लागवडीचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास ओल्या हळदीचे 100 क्विंटल व वाळलेल्या हळदीचे 30 क्विंटल प्रति एकरी उत्पादन निघते.  

                   

                  काढणी पश्चात तंत्रज्ञान 

                  👉हळद शिजवणे - हळद शिजवण्याची प्रक्रिया काढणीच्या 3-4 दिवसांनी करावी. कांड्या व गड्डे वेगवेगळे  शिजवावे.  कांड्या 45 ते 60 मिनिटं शिजवावे व गड्डे 90 मिनिट शिजवावे. 

                  👉वाळवणे - शिजवलेली हळद वाळवण्यासाठी उन्हात 10-15 दिवस जमिनीवर 5-7 सेमी. जाड थर लावून पसरवावी. 

                  👉पोलिश करणे -  हळदीचे बाहेरील आवरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याला यंत्राच्या साहाय्याने पोलिश करावे.

                   

                   

                   

                  सारांश 

                  शेतकरी मित्रांनो तुम्हाला BharatAgri Krushi Dukan वेबसाइट वरील आमचा “halad lagwad" ची संपूर्ण माहिती. जाणून घ्या लागवड ते काढणी संपूर्ण वेळापत्रक हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेन्ट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.

                   

                  FAQ । प्रश्नउत्तरे 

                  1) हळदीची लागवड कधी करावी? 

                  उत्तर - हळद लागवडीसाठी 15 मे ते जूनचा पहिला आठवडा हा कालावधी उत्तम समजला जातो.

                  2) हळद लागवडीसाठी एकरी किती बेणे लागते.  

                  उत्तर - हळद लागवडीसाठी एकरी 800 किलो ते 1000 किलो पर्यंत बेणे / कंद लागते. 

                  3) हळदीसाठी सर्वोत्तम खत कोणते आहे ?

                  उत्तर - हळद लागवडीसाठी शिफारसी प्रमाणे खत व्यवस्थापन करावे. खते वापरताना 10:26:26, डी ए पी, युरिया तसेच पांढऱ्या पोटॅशचा वापर करावा. 

                  4) हळद पिकामध्ये कोणते तणनाशक वापरावे ?

                  उत्तर - हळद लागवडीनंतर लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना फुस्ट (ॲट्राझिन) हे तणनाशक 300 ग्राम प्रति एकरी फवारणी करावी

                   

                  हे पण एकदा वाचा  

                  1. बायोविटा टॉनिक ची संपूर्ण माहिती

                  2. बायर अ‍ॅडमायर कीटकनाशक (किंमत, उपयोग आणि फायदे)

                  3. सिंजेन्टा कल्टर उपयोग, फायदे आणि किंमत

                  4. सेन्कोर तन नाशकची A to Z माहिती

                  5. ऊस पाचट व्यवस्थापन 

                   

                  लेखक

                  भारतअ‍ॅग्री कृषि एक्स्पर्ट


                  होम

                  एग्री डॉक्टर

                  VIP

                  कृषि किताब

                  केटेगरी