sugarcane trash

sugarcane trash: ऊस पाचट व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण ऊस पाचट (sugarcane trash) व्यवस्थापना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ऊस पाचटाचे व्यवस्थापन करताना ऊस पाचट शेतामध्ये गाडल्यानंतर त्याचा कसा फायदा होतो आणि जाळून टाकले तर काय तोटे होतात या विषयी माहिती पाहूया. 


एक एकर मधून आपल्याला किती पाचट मिळते? 

ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाने शेतात पडतात, त्यास पाचट असे म्हणतात. पाचटामध्ये लिग्रिनचे प्रमाण 15 टक्के असते. पाचटावर टोकदार केसासारखी कुसे असल्यामुळे जनावरे ते पाचट खात नाहीत. पाचट लवकर भरभर जळून राख होते. त्यामुळे पाचटाचा उपयोग जाळण्यासाठी करता येत नाही. सर्वसाधारणपणे एक एकर शेतातून 3 ते 4 टन पाचट उपलब्ध होते व त्यापासून 1 ते 2 टन सेंद्रिय खत मिळते. 

 

पाचटाचे फायदे | sugarcane trash uses -

1. शेतामध्ये वेगळे सेंद्रिय खत घालण्याची गरज नाही, कारण पाचटाद्वारे एकरी 1 ते 2 टन सेंद्रिय खत मिळते.

2. पाचट आच्छादन (sugarcane trash mulching) म्हणून काम करते, जमिनीवर पाचट पसरल्यामुळे बाष्पीभवन कमी होते त्यामुळे पाण्याची बचत होते.

3. पाचटामुळे जमीन झाकल्यामुळे तणाची वाढ होत नाही.

4. हिरवळीसाठी किंवा शेणखतासाठी लागणा-या खर्चात बचत होते.


ऊस पाचट व्यवस्थापन |  sugarcane trash management -

👉शेतीमध्ये खत निर्मिती -

1. उसाच्या पाचटात 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फुरद आणि 0.7 ते 1 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते. 

2. ऊस तोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. शक्य असल्यास पाचट कुट्टी मशीन किंवा रोटावेटर ने पाचट बारीक करून घ्यावे.  त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत. 

3. उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते.
शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति एकरी 40 किलो युरिया, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि उसाचे पाचट ४५ दिवसाच्या आत कुजवायचे असले तर पाचट कुजविणारे जिवाणू डॉ. बैक्टो 5 जी फास्ट डी 2 कॅप्सूल प्रति एकरी फवारणी करावी. त्यानंतर उसास पाणी द्यावे. 

4. जमीन ओली असताना सरीतील पाचट (sugarcane trash management) पायाने थोडे दाबून द्यावे किंवा शेतात जनावरे मोकळी सोडावीत. जनावरांच्या पायाने पाचट दबण्यास मदत होते. 

5. पाचटाचा मातीशी संबंध येऊन ते हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते. ऊस तुटून गेल्यावर पहिल्या 15 दिवसात ही क्रिया करावी.


👉शेताच्या बाहेर खत निर्मिती -

1. शेताच्या बाहेर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी एक टन पाचटासाठी 2 मीटर रुंद व 1 मीटर खोल आणि 5 ते 6 मीटर लांबीचा खडुा घ्यावा तसेच शक्य झाल्यास त्या पाचटाचे लहान तुकडे करावे. त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते. 

2. पाचटाचा सुरुवातीला 20 ते 30 सें.मी. जाडीचा थर देऊन या थरावर एक टन पाचटासाठी 8 किलो युरिया व 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 100 लिटर पाणी शिंपडावे. त्यानंतर 1 किलो पाचट कुजविणा-या जिवाणू संवर्धनाचे मिश्रण असलेला शेणकाला समप्रमाणात पाचटावर टाकावा. तसेच आवश्यकता वाटल्यास जास्त पाणी शिंपडावे. 

3. रासायनिक खतांचे द्रावण व जिवाणू संवर्धनाच्या द्रावणांचे एकत्रित मिश्रण न वापरता स्वतंत्रपणे वापरावे. अशारितीने पाचटाचे वरचा भाग शेणमातीने झाकून घ्यावा. 

4. एक ते दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्याची चाळणी करावी व आवश्यकतेनुसार खडुयामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी पाणी शिंपडावे. 

5. साधारणत: 60 टक्के ओलावा राहील या बेताने पाण्याचा वापर करावा. अशाप्रकारे चार ते साडेचार महिन्यात पाचटापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते.

 

शेतातील पाचट लवकर का कुजत नाही त्याची काही करणे - 

1. उसाच्या पाचटामधील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर हे 122:1 असे असते. यातील कर्बाचे प्रमाण अधिक असले तरी नत्राची उपलब्धता कमी असल्याने जिवाणूंना अधिक वेळ लागतो. 

2. कर्बामुळे जिवाणूंना उर्जा मिळते; तर नत्रापासून प्रथिने मिळतात. जिवाणूंच्या चांगल्या वाढीसाठी पिकांच्या अवशेषांतील कर्ब:नत्र गुणोत्तर 24:1 असे असावे. असे गुणोत्तर शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये असते. त्यामुळे त्यामध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक असते. 


पाचट (sugarcane trash) जाळल्यामुळे होणारे तोटे 

1. पाचट जाळल्यामुळे सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा नाश होतो.

2. जमीन तापल्यामुळे नत्र व इतर अन्नघटकांचा थोड्याफार प्रमाणात वायुरुपात नाश होतो.

3. जमीन भाजल्यामुळे

4. पाचट जाळल्यामुळे 100 टक्के नत्र व 75 टक्के इतर अन्नघटक वाया जातात.

5. पाचटावर असलेले मित्रकीटक यांचा सुध्दा नाश होतो.

 

Conclusions | सारांश -

उसाचे पीक निघून गेल्यानंतर राहिलेल्या पाचटाचे (sugarcane trash) योग्य व्यवस्थापन करावे. काही शेतकरी पाचट जाळून टाकतात. पाचट झाल्यानंतर जमिनीची आणि पर्यावरणाची हानी होते. तसेच उसाचे पाचट जमिनीमध्ये गाडल्यानंतर जमिनी मधील आवश्यक सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून जमिनीची सुपीकता वाढते.

 

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. ऊस पाचट व्यवस्थापनाचे फायदे कोणते ? 

उत्तर -  शेतात ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते, त्यामुळे पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढले तरी ऊसाची वाढ चांगली होते.

2. उसाच्या पाचटामध्ये कोण कोणते अन्नद्रव्य असते?

उत्तर - उसाच्या पाचटात 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फुरद आणि 0.7 ते 1 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते. 

3. एक एकर शेतीमधून किती उसाचे पाचट मिळते आणि त्यापासून किती खत मिळते?

उत्तर - सर्वसाधारणपणे एक एकर शेतातून 3 ते 4 टन पाचट उपलब्ध होते व त्यापासून 1 ते 2 टन सेंद्रिय खत मिळते. 

4. उसाचे पाचट कुजवण्यासाठी काय वापरावे?

उत्तर - शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति एकरी 40 किलो युरिया, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाचट कुजविणारे जिवाणू डॉ. बैक्टो 5 जी फास्ट डी 2 कॅप्सूल प्रति एकरी फवारणी करावी. त्यानंतर उसास पाणी द्यावे.


People also read | हे देखील वाचा - 


1. kalingad lagwad: कलिंगड लागवड A to Z माहिती

2. isabion syngenta: फुलांची संख्या वाढवण्यासाठी मार्केट मधील 1 नंबर औषध

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

6. ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापनलेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी