rhizome rot of turmeric

rhizome rot of turmeric: हळद-आदरक पिकातील कंदमाशी आणि कंदकुज नियंत्रण

शेतकरी मित्रानो, हळद आणि आले पिकामध्ये महत्वाची कीड आणि रोग म्हणजे कंद माशी rhizome fly of ginger आणि कंद कूज rhizome rot of turmeric. ह्या कीड रोगाचा प्रधुरभाव ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये होतो. कंद माशी आणि कंद कूजचे वेळीच नियंत्रण न झाल्यास उत्पादनामध्ये 30- 50 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. 


1. हळद कंदमाशी | rhizome fly of turmeric - 

👉अशी ओळखा कंदमाशी | rhizome flysymtomps in turmeric -

कंद माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असून माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात. 

👉कंद माशी मुळे होणारे नुकसान -

कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ अथवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. सहा दिवसांत अंड्यातून लालसर रंगाच्या अळ्या बाहेर पडून कंदामध्ये शिरतात. अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्याने तिथे रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंद कूज सुरू होते. कंद मऊ होतात, त्यांना पाणी सुटून ते कुजू लागतात.

👉प्रादुर्भाव कशामुळे होतो? 

सततचा पाऊस आणि जास्त दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये 45 ते 50 टक्के नुकसान होते. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.

👉व्यवस्थापन -

1. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर आले आणि हळद पिकाची भरणी करावी.

2. भरणी करताना खतासोबत फिप्रोनील 0.3% दाणेदार 5 किलो किंवा क्लोरँट्रीनिलीप्रॉल 0.4% दाणेदार  4 किलो प्रति एकर या प्रमाणात जमिनीत मिसळावे. 

3. माशी दिसू लागताच क्विनॉलफॉस 30 मि.ली. + निम ऑइल 10000 पी पी एम 20 मिली प्रति 15 लिटर या प्रमाणात फवारावे. गरजेनुसार 15 दिवसांनी पुन्हा फवारणी घ्यावी. 

4. प्रादुर्भावाची सुरुवातीच्या काळात क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन (धानुका सुपर डी)  40 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 100 इसी 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून ड्रेंचिंग करावी.  

5. एकरी 3 मातीची अथवा प्लॅस्टिकच्या पसरट भांडी घ्यावीत. त्यात भरडलेले एरंडीचे बी 200 ग्रॅम अधिक 1.5 लिटर पाणी मिसळून शेतात ठेवावे. 8 ते 10 दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन, त्यात पडून मरतात. कंदांचे नुकसान करण्या अगोदरच कंदमाश्‍या मरत असल्याने विशेष प्रभावी उपाययोजना आहे.

6. कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किडनाशकासोबत एका बुरशीनाशकाची आळवणी करावी.

Bayer Regent Ultra InsecticideSumitomo Kemloxआईएफसी नीम 10000

धानुका सुपर डीDecis 100 EC


2. हळद कंदकूज | rhizome rot of turmeric - 

हळद किंवा आले पिकात पाणी साचून राहिल्यास कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. या पिकांमध्ये कंदकूज प्रामुख्याने बुरशी किंवा जिवाणूमुळे होतो.

👉अशी ओळखा हळद पिकातील कंदकूज | symtomps of rhizome rot in turmeric -

कंदकुजीचे प्रथम लक्षणे ही कंदातील कोवळ्या फुटव्यावर लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो मऊ पडून त्यातून घाण वास येणारे पाणी बाहेर पडत असते. 

👉व्यवस्थापन: -

1. कंदकूज व्यवस्थापनासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 2 ते 2.5 किलो प्रति एकरी 300 किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून जमिनीमध्ये द्यावे किंवा ड्रीप असलीस ट्रायकोडर्मा 2 लिटर प्रति एकरी द्यावे. याचा वापर प्रतिबंधात्मक म्हणूनच करावा.

2. कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 45 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास मेटॅलॅक्‍सिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 45 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. आले पिकामध्ये जिवाणूजन्य मर असल्यास सोबत 0.5 ग्राम स्ट्रेप्टोसाक्लीन किंवा 2 मिली कासुगामाइसिन प्रतिलिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. आळवणी करताना जमिनीस वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी. 

Dr. Bacto's DermusDhanuka Dhanucophttps://krushidukan.bharatagri.com/products/dr-dermus-trichoderma-viride-bio-fungicide?_pos=5&_sid=4abb09710&_ss=r

Syngenta Ridomil GoldDhanuka Kasu-B Fungicide


Conclusion | सारांश - 

आले आणि हळद पिकामध्ये कंद कूज सततच्या पाऊसामुळे किंवा शेतामध्ये पाणी साचून राहिल्यास होते. रोगामुळे फुटव्यांची मर होऊन उत्पादनात घट येते. कंद माशीसाठी सततचा पाऊस आणि जास्त दिवस लांबलेला पावसाळा या कारणामुळे प्रधुरभाव होतो. तसेच कंदमाशीचा प्रधुरभाव झालेल्या ठिकाणांमधून बुरशीचा शिरकाव होऊन कंदकूजही होते. 


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

1. कंदमाशी कशी ओळखावी?

ऊत्तर - कंद माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असून माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. 

2. कंदमाशी पिकास कधी नुकसान करते?

ऊत्तर - सततचा पाऊस आणि जास्त दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.

3. कंदकूज कशी ओळखावी?

ऊत्तर -  नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो.

4. कंदकूज कोणत्या कारणामुळे होते? 

ऊत्तर -  सततचा पाऊस, शेतात साचलेले पाणी, कंदमाशीचा प्रधुरभाव या कारणामुळे कंदकूज होते. 

5. कंदमाशी आणि कंदकूज नियंत्रण करण्यासाठी कोणती आळवणी करावी?

ऊत्तर - क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन (धानुका सुपर डी)  40 मिली  +  कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 45 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. 


People also read | हे देखील वाचा - 

1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

2. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे

3. सोयाबीन वायरस चे संपूर्ण नियंत्रण

4. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा. 

5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?



लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि डॉक्टर

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी