bacterial leaf blight of rice

bacterial leaf blight of rice: धान पिकावरील करपा रोग नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आजच्या लेखात धान/भात पिकावरील करपा रोग नियंत्रण bacterial leaf blight या विषयावर चर्चा करणार आहोत. भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्रामध्ये भात पिकाची लागवड कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागामध्ये होते. भात पिकावर बुरशीजन्य रोगांपैकी करपा रोगाची जास्त प्रमाणामध्ये लागण होते. 


अनुकूल हवामान | Favorable climate for bacterial leaf blight of rice -

कधी ऊन तर कधी पाऊस, सलग नसणारा पाऊस, त्यामुळे हवेत असणारी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अशी आर्द्रता; पावसात असणारा वारा, तापमान (19 ते 28 अंश से.) हे सर्व घटक रोगाच्या बुरशीच्या वाढीस आणि प्रसारास अत्यंत उपयुक्त व पोषक आहे.


करपा रोगाचे प्रकार -

अ) कडा करपा | bacterial leaf blight of rice - 

1. प्रादुर्भाव साधारणतः फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात होतो. जास्त पावसाच्या प्रदेशात, उदा. कोकणामध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात येतो. 

2. रोगग्रस्त रोपांची पाने कडेकडून मध्य शिरेच्या दिशेने करपतात. कालांतराने संपूर्ण पान करपते. सकाळी पानांचे निरीक्षण केले असता पानांच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे जिवाणूंचे दवबिंदू साचलेले दिसतात. 

3. चुडातील पाने करपून रोपे मरतात. या अवस्थेस क्रेसेक किंवा रोपांची मर असे म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना झाल्यास दाणे कमी भरतात. पळींजाचे प्रमाण वाढते.

DhanucopPlantomycin

👉उपाय -

धनुकॉप (कॉपर ऑक्सिक्लोराइड) 30 ग्रॅम आणि प्लँटोमायसीन (स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट)  8 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. पिकाला नत्रयुक्त खतांची मात्रा कमी प्रमाणात द्यावी.


ब) करपा | Blast -

1. रोगाचा प्रादुर्भाव अगदी पिकाच्या कोणत्याही अवस्थेत पान, खोड sheath blight of rice व लोंबीच्या मानेवर होऊ शकतो.

2. पानावर लंबगोलाकार म्हणजेच मध्यभाग फुगीर व दोन्ही कडा निमुळते होत जातात, असे पानांवर असंख्य ठिपके पडतात. ठिपक्यांचा मध्य राखाडी रंगाचा व कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात.

3. ठिपक्यांचा आकार आणि रंग यावरून हा रोग ताबडतोब ओळखता येतो. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास अनेक ठिपके एकत्र मिसळून पाने मोठ्या प्रमाणावर करपतात. पानाप्रमाणेच लोंबीच्या दांड्यावर सुद्धा रोग येतो, त्यामुळे रोगट ठिकाणी मान मोडून लोंबीत दाणे भरत नाहीत.


क) पर्ण करपा | leaf blight of rice -

1. लागवड झाल्यानंतर साधारणत: 30 ते 40 दिवसांनी या रोगाची लागण होते. या रोगाचा प्रादुर्भाव जवळ जवळ संपूर्ण पीक कालावधीमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. 

2. सुरवातीला पानाचे टोक किंवा कडेवर अर्धवर्तुळाकार फिकट ठिपके येतात. हळूहळू ठिपके रुंद होत जाऊन तपकिरी होतात. 

3. पर्णकरपा रोगामुळे मुख्यतः पानाचे शेंडे करपतात. परंतु कधी कधी मधील भाग सुद्धा करपलेला दिसतो. थोड्याच दिवसात करपलेला भात राखाडी रंगाचा दिसतो.

UPL SaafBayer-NativoGodiwa Super

Bayer Folicur

👉करपा (ब्लास्ट) आणि पर्ण करपा उपाय | Control measures for sheath & leaf blight of rice -

1. साफ (कार्बेन्डाजिम 12% + मैनकोजेब 63% डब्ल्यूपी) - 30 ग्रॅम 

2. नेटीओ (टेबुकोनाज़ोल + ट्राइफ्लॉक्सीस्ट्रोबिन ७५ डब्ल्यूजी) - 8 ग्रॅम 

3. गोडीवा सुपर (एज़ोक्सिस्ट्रोबिन 18.2% और डिफेनोकोनाज़ोल 11.4% एससी) - 15 मिली 

4. फोलिकुर (टेबुकोनाज़ोल 250 ईसी) - 15 मिली 

4. या पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. प्रत्येक फवारणी मध्ये IFC स्टिकर 5 मिली प्रति पंप मिसळावे. 


करपा रोग कधी होतो?

साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत आणि पोटरी अवस्थेत असताना पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, खोड करपा, जिवाणूजन्य करपा आणि काही भागात पर्णकोष करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. त्यानंतर पुढील टप्प्यात फुलोरा अवस्थेत वातावरण सतत ढगाळ राहिल्यास तसेच नियमित मध्यम ते तुरळक पाऊस सतत राहिल्यास पिकांवर पर्णकोष कुजवा, आभासमय काजळी आणि लोंबीतील दाणे काळे पडणे या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.


Conclusion | सारांश - 

भात हे तृण धान्यांपैकी एक प्रमुख पीक आहे. या पिकावर बुरशीजन्य प्रमुख रोगांपैकी करपा रोगाचा जास्त प्रमाणामध्ये प्रधुरभाव होतो. साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत आणि पोटरी अवस्थेत असताना पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, खोड करपा, जिवाणूजन्य करपा आणि काही भागात पर्णकोष करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. रोगाचे नियंत्रण न झाल्यास उत्पादनामध्ये 50-60 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. 


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

1. धान पिकावर पडणाऱ्या करपा रोगाचे कोणते प्रकार आहेत?

ऊत्तर -  करपा रोगाचे ३ प्रकार आहेत. कडा करपा, करपा (ब्लास्ट) आणि पर्ण करपा. 

2. करपा रोगासाठी पोषक हवामान काय आहे?

ऊत्तर - कधी ऊन तर कधी पाऊस, सलग नसणारा पाऊस, त्यामुळे हवेत असणारी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अशी आर्द्रता; पावसात असणारा वारा, तापमान (19 ते 28 अंश से.)  

3. धान पिकामध्ये कडा करपा पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये होतो?

ऊत्तर - प्रादुर्भाव साधारणतः फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात होतो.

4. धान पिकामध्ये करपा (ब्लास्ट) पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये होतो?

ऊत्तर -  रोगाचा प्रादुर्भाव अगदी पिकाच्या कोणत्याही अवस्थेत पान, खोड व लोंबीच्या मानेवर होऊ शकतो.

5. धान पिकामध्ये पर्ण करपा पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये होतो?

ऊत्तर - लागवड झाल्यानंतर साधारणत: 30 ते 40 दिवसांनी या रोगाची लागण होते. या रोगाचा प्रादुर्भाव जवळ जवळ संपूर्ण पीक कालावधीमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. 

 

People also read | हे देखील वाचा - 

1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

2. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे

3. शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

4. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा. 

5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?



लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी