Tur variety

Tur variety: तुरीच्या टॉप 5 जातींची नावे

शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रा मध्ये जमिनीच्या प्रकारा नुसार अधिक उत्पादन मिळून देणाऱ्या तुरीच्या टॉप 5 जातींची (Tur variety) बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

जगात सर्वात जास्त कडधान्य उत्पादन, वापर आणि आयात भारतात होते. कडधान्या मध्ये तूर हे पीक सर्वात महत्वाचे असून भारतीय यांच्या अहरामध्ये तूर डाळीचे अन्यनसाधारण असे महत्व आहे. जमिनीची सुपीकता सुधारणे व ठिकून ठेवण्यासाठी इथकेच नव्हे तर शाश्वत शेतीसाठीसुद्धा तूर हे पीक अतिशय महत्वाचे आहे. या पिकाच्या मुळावरील ग्रंथीमधील रायझोबियमची गाठी हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळे या पिकाला नत्राची गरज बऱ्याचशा प्रमाणात परस्पर भागवली जाते. 


तुरीच्या जातींची नावे 

👉BDN-716 - (2016 प्रसारित वर्ष)

1. ही संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत tur variety आहे. 

2. ही लाल दाण्याची तूर असून मध्यम कालावधी मध्ये तयार होते. 

3. हा वाण 165 ते 170 दिवसात परिपक्व होतो. 

4. भारी जमिनी साठी या वाणाची निवड करू शकता.

5. हा  वाण मर आणि वांझ रोगास सहनशील आहे. 

6. या तुरीच्या 100 दाण्याचे वजन 11 ते 12 ग्रॅम भरते. 

7. डाळी साठी उत्तम वाण आहे. 


👉BDN- 711 - (2011 प्रसारित वर्ष)

1. ही  tur variety मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे. 

2. ही पांढऱ्या  दाण्याची तूर असून कमी कालावधी मध्ये तयार होते.

3. हे तूर बियाणे मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये पेरणी करू शकता. 

4.  तुरीची जात 150 ते 155 दिवसात परिपक्व होते. 

5. या जातीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळेत शेंगा परिपक्व होतात, या मध्ये शेंगा न गळणे आणि न फुटणे हे गुणधर्म आहे. 

6. मर आणि वांझ रोगास सहनशील आहे.

7. डाळी साठी उत्तम वाण आहे.


👉BDN 2013-41 - (2020 प्रसारित वर्ष)


1. ही संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे. 

2. ही पांढऱ्या दाण्याची तूर असून मध्यम कालावधी मध्ये तयार होते

3. ही tur seeds variety भारी जमिनी साठी पेरणी करू शकता.

4. हा वाण 160 ते 170 दिवसात परिपक्व होतो. 

5. मर आणि वांझ रोगास सहनशील आहे.

6. अधिक उत्पादन क्षमता 


(सूचना - तूर पिकामध्ये अधिक फुलोरा/बहार येण्यासाठी TATA Bahar - 30 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी)


👉दुर्गा (NTL-30) 

1. ही संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत tur variety आहे. 

2. ही लाल दाण्याची तूर असून मध्यम कालावधी मध्ये तयार होते. 

3. हा वाण 150 ते 160 दिवसात परिपक्व होतो. 

4. भारी आणि मध्यम जमिनी साठी या वाणाची निवड करू शकता.

5. हा वाण मर आणि वांझ रोगास अति सहनशील आहे. 

6. डाळी साठी उत्तम वाण आहे. 

7. हे बियाणे निर्मल सीड्स कंपनीचे आहे. 


👉GRG-152 भीमा - 

1. या  tur variety ची  मध्यम जमिनी साठी निवड करू शकता.

2. ही लाल दाण्याची तूर असून मध्यम कालावधी मध्ये तयार होते.

3. हा वाण 145 ते 155 दिवसात परिपक्व होतो.

4. हा वाण मर आणि वांझ रोगास अति सहनशील आहे .


(सूचना - तूर पिकामध्ये आळीच्या नियंत्रणासाठी Dhanuka EM 1 10 ग्रॅम + IFC Super Sticker - 2 मिली 15 लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता)

       

सारंश -

शेतकरी मित्रांनो, आजचा लेख तूर टॉप 5 व्हारायटी तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतॲग्री कृषी दुकानाच्या वेबसाईटशी कनेक्ट रहा. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह, तोपर्यंत - धन्यवाद.


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

1. तूर लागवड कधी करावी?

उत्तर - तूर जूनचा दूसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा दरम्यान लागवड करू शकता. 

2. तूर हेक्टरी किती बियाण्याची आवश्यकता लागते?

उत्तर - तुरीचे हेक्टरी -15-20 किलो बियाणे लागते. 

3. तुरीचे पीक किती दिवसात येते? 

उत्तर - तुरीचे पीक 5 ते 6 महिन्यात परिपक्व होते. 

4. 4:1 तूर म्हणजे काय?

उत्तर - 4 ओली सोयबीनच्या आणि 1 ओळ तुरीची म्हणजे 4:1 तूर होय. 

5. संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी तुरीचा कोणता वाण चांगला आहे?

उत्तर - BDN 716 वाण संपूर्ण महाराष्ट्रात लागवड करू शकता. 


हे पण एकदा वाचा 

1. kds 726: केडीएस 726 (फुले संगम) सोयाबीन बियाण्याची सर्व माहिती

2. soybean variety: सोयाबीन टॉप 10 सुधारित वाण

3. seed germination test: बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी?

4. मक्यातील लष्करी अळीचा करा संपूर्ण खात्मा

5. हळद आणि 🌱 आदरक पिकातील कंदकुज नियंत्रणलेखक | Author

BharatAgri Krushi Doctor

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी