seed germination test

seed germination test: बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी?

शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे. जर तुम्ही घराचे किंवा मार्केट मधून आणलेले बियाणे शेतात थेट पेरत किंवा लागवड करत असाल तर तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेत आहे कारण बियाणे उगवल्या नंतर आपल्याला कळते बियाणे किती उगवले आहे त्यामुळे वेळ तर वाया जातोच त्यासोबत पैसा वाया जातो आणि मग नंतर उत्पन्न पण कमी निघते. त्यामुळेच शेतकरी मित्रांनो आपल्याला पेरणी पूर्वी seed germination test कशी करावी? आणि उगवण क्षमता तपासल्यानंतर काय फायदे होतात हे आपण आजच्या लेखा मध्ये पाहणार आहोत.   


बियाणे उगवण क्षमता चाचणी म्हणजे काय?

पेरणी करण्या अगोदर,जे बियाणे पेरणार आहोत त्या बियाण्याची उगवण क्षमता म्हणजेच काय? ते बियाणे किती प्रमाणात उगवू शकते हे तपासणे म्हणजे बियाणे उगवण क्षमता(germination test) होय. 

 

बियाणे उगवण क्षमता का करावी?

उगवण क्षमता तपासने (seed viability test) म्हणजे आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता कळते आणि मग आपण त्यानुसार बियाणे पेरणी करता वापरू शकतो. 


बीज उगवण क्षमता काशी तपासतात? 

seed germination test तपासण्याच्या तीन पद्धती आहेत.

👉गोणपाट पद्धत

👉पेपर पद्धत

👉कुंडी पद्धत 


सोयाबीन बियाणाचे उदाहरण घेऊन गोणपाट  seed germination test methods तीन टप्यात समजून घेऊया - 

1. पहिला टप्पा - 

सगळ्यात पहिल्यांदा एक मोठे पोते(गोणपाट) घ्यावे नंतर त्या पोत्याचे कात्रीने एकसमान सहा भाग कापावे आणि हे कापलेले पोत्याचे सहा तुकडे बदली मध्ये पाण्यात व्यवस्थित भिजवून स्वच्छ धुवावे आणि हि तुकडे पिळून काढावीत. 


2. दुसरा टप्पा - 

नंतर सोयाबीनच्या पोत्यामध्ये चांगला खोल पर्यन्त हात घालून मूठ भर बियाणे काढावे. नंतर स्वच्छ धुतलेले  पोत्याची तीन तुकडे जमीनवर पसरावे आणि काढलेले बियाणांचे सरसकट १०० दाणे मोजून 1.5 ते 2 सेंमी अंतरावर एक याप्रमाणे ओळीत तीन पसरवलेल्या पोत्याच्या नामण्यावर ठेऊन घ्या नंतर त्या गोणपाटावर पाणी शिंपडा आणि उरलेले तीन तुकडे बियाणांवर वरून अंतरा आणि त्यावरती पुन्हा चांगले पाणी शिंपडा. गोणपाटाच्या तुकड्यांची बियाणा सकट गोल गुंडाळी करावी आणि त्याला वरतून रबर किंवा दोऱ्याने व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे. 


3. तिसरा टप्पा - 

या गुंडाळ्या माठ किंवा रांजण अशा थंड ठिकाणी ठेऊन त्यावर दिवसातून दोन वेळा पाणी शिंपडावे.आठव्या दिवशी या गुंडाळ्या उघडल्यास आपल्याला बियाणाला कोंब आलेले दिसतील यामधून कोंब आलेले दाणे वेगळे करून त्याची मोजणी करावी.(9.18to 10:55) तिन्ही गुंडाळ्याची सरासरी काढून 100 पैकी 70 बियाणाला कोंब आलेले असेल तर ते बियाणे मार्केट मधील बियांच्या गुणवत्तेचे आहे असे समजते. अशा बियाण्याची पेरणी आपण बिनदास्त करू शकता. जर 70% पेक्षा कमी बियाणाला कोंब आलेले असेल तर अधिक बियाणे वापरून पेरणी करावी पण 50% पेक्षा कमी असेल तर ते बियाणे पेरणी साठी टाळावे. त्याऐवजी मार्केट मधून बियाणे खरेदी करून पेरावे. 


बियाणे उगवण क्षमता सूत्र - 

उगवण क्षमता = टोटल उगवलेले बियाणे/ टोटल बियाणे * 100 

           

उगवण क्षमता तपासणीचे फायदे  - 

1. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण घरातील साठवलेले बियाणे पेरू शकतो कि नाही हे समजते. 

2. उगवण क्षमता 70% पेक्षा कमी असेल तर आपण बियाणे वाढून घेऊ शकतो त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळते. 

3. बियाणांचा भरपूर खर्च वाचला जातो. 

4. उत्पादनात 20 ते 25% वाढ होते. 


बियाणे बीजप्रक्रिया -

seed germination test methods बरोबर आपल्याला बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. आपण खलील मुद्या मध्ये बियाणे बीजप्रक्रिया पाहू शकता. 

स्वाल कंपनीचे कॅस्केड (ॲझोक्सीस्ट्रोबिन + थिओफेनेट मिथाइल + थायामेथोक्सम ) या औषधा मध्ये किटक आणि बुरशीला नियंत्रित करण्यासाठी दोन्ही घटक उपलब्ध आहेत. हे आपण 1 किलो बियानासाठी 3 मिली चोळावे.

किंवा 

क्रिस्टल बाविस्टिन (कार्बेंडाझिम ५०% डब्ल्यूपी) बुरशीनाशक + बायर गौचो 600 एफएस - इमिडाक्लोप्रिड 600 एफएस कीटकनाशक 1 मिली /किलो बियाणाला आपण चोळावे. 

रासायनिक बीज प्रक्रिया नंतर कमीत कमीत 2 ते 3 दिवसांनी जैविक बीज प्रक्रिया करावी कारण जिवाणू संर्वधने मारणार नाही. यासाठी नत्र स्थिरीकरणासाठी 20  ग्रॅम + स्फुरद विरघळविणारे जीवाणू डॉ. बैक्टो का पीएसबी 4के - 20 ग्रॅम / किलो बियाण्यास चोळावे.


Conclusion / सारंश -

शेतकरी मित्रांनो, आजचा seed germination test लेख तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतऍग्री कृषी दुकानाच्या वेबसाईटशी कनेक्ट रहा. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह, तोपर्यंत - धन्यवाद.


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ -


1. बियाण्याची उगवण शक्ती म्हणजे काय?

उत्तर - आपण जे बियाणे पेरणी करणार आहोत ते किती प्रमाणात उगू शकते याची तापासणी करणे म्हणजे बियाणे उगवण शक्ती होय. 

2. बियाणे उगवण चाचणी कशी करावी?

उत्तर - बियाणे उगवण चाचणी तीन पद्धतीने करतात गोणपाट पद्धत, पेपर पद्धत आणि कुंडी पद्धत. 

3. बियाणे उगवण कसे मोजायचे?

उत्तर - बियाणे उगवण क्षमता मोजण्यासाठी एक सूत्र आहे उगवण क्षमता = टोटल उगवलेले बियाणे/ टोटल बियाणे * 100 

4. बियाणे उगवण चाचण्यांचे महत्त्व काय आहे?

उत्तर - आपल्याला पेरणी पूर्वी बियाणाची उगवण क्षमता कळल्याने आपण ठरू शकतो बियाणे पेरणीसाठी वापरायचे की नाही. 

5. बियाणाचा उगवण दर कमीत कमीत किती पाहिजे? 

उत्तर - बियाणाचा उगवण दर कमीत कमी 70% असला पाहिजे. 


पण एकदा वाचा | People also read -  

1. score syngenta: स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती

2. sencor herbicide: सेन्कोर तन नाशकची A to Z माहिती

3. isabion syngenta: फुलांची संख्या वाढवण्यासाठी मार्केट मधील 1 नंबर औषध

4. oily spot of pomegranate: डाळिंब पिकातील तेल्या रोग नियंत्रण

5. hydroponic fodder: हायड्रोपोनिक चारा निर्मिती


लेखक | Author

BharatAgri Krushi Doctor


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी