kds 726 soybean variety

kds 726: केडीएस 726 (फुले संगम) सोयाबीन बियाण्याची सर्व माहिती

शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे.  2019 या वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सोयाबीन संशोधन केंद्र कसबे दिग्रस येथे संशोधित केलेल्या KDS-726 म्हणजेच फुले संगम या वाणाची महाराष्ट्रा मध्ये पेरणीसाठी प्रचंड मागणी असल्यामुळे आज आपण या वाणाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

राज्यभरात सध्या खरीप हंगामाची तयारी चालू आहे फक्त पाऊस आला म्हणजे आपला बळीराज्याच्या जीवात जीव येईन.या हंगामात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, उस, कापूस, बाजरी इत्यादि पिके घेतली जातात या मध्ये सोयाबीन हे कमी कालावधीचे नगदी पीक आहे. शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकामध्ये चांगले पैसे मिळत असल्याने शेतकरी सोयाबीन पिकांमध्ये विविध प्रयोग करत आहेत.


kds 726 soybean variety ची ठळक माहिती - 

खालील टेबल मध्ये फुले संगम सोयाबीन ची माहिती दिलेली आहे.

नाव 

kds -726 (फुले संगम)

प्रसारण वर्ष 

2019 

दुरुस्ती संस्था

कसबे दिग्रस

पिकाचा कालावधी 

110 -115 दिवस 

पिकाची उंची 

मध्यम स्वरूपाची

फुलांचा रंग 

जांभळा 

पेरणीचा हंगाम 

15 जून ते 25 जुलै पर्यंत 

पेरणी अंतर 

विद्यापीठ नुसार - 

45*10 सेमी 

प्रोटीनचे प्रमाण 

38.14%

तेलाचे प्रमाण 

18.42%

प्रतिकार क्षमता 

तांबेरा रोगास आणि खोड माशी 

दाण्याचे वजन आणि आकार 

रंग पिवळसर व दाण्याची साईज मोठी

प्रति एकरी बियाणे 

पेरणी - 20 - 22 किलो 

टोकण पद्धत - 15 किलो 

उत्पन्न 

सरासरी 10-12 क्विंटल/एकरी 

शिफारस 

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व मध्य प्रदेश इत्यादी.


kds 726 सोयाबीन साठी जमीन आणि हवामान - 

👉जमीन - या व्हारायटी साठी मध्यम आणि भारी जमीन लागवडीसाठी योग्य आहे.पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. मातीचा ph 7 - 7.5 असला पाहिजे. 

👉हवामान - उष्ण हवामान हे पिकाच्या वाढीसाठी अनुकूल असते. या पिकाला १८ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. साधारणपणे, सोयाबीन हे खरीप हंगामात लागवड केले जाते. या पिकाला ६०० ते १००० मिलिमीटर पर्जन्य आवश्यक असतो.

(सूचना - सोयाबीन पिकाच्या आळी नियंत्रणासाठी क्रिस्टल प्रोक्लेम कीटकनाशक (इमामेक्टीन बेंझोएट 5% एसजी) 100 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी)


फुले संगम सोयाबीन पेरणी व्यवस्थापन माहिती - 

पेरणीतील अंतर किंवा दाटी जास्त  झाल्यास परिणाम - 

1. रस शोषण किडी आणि रोगाचे प्रमाण वाढते 

2. फुलगळ होते 

3. उत्पादनात घट 

4. पेरणीचे अंतर कशावर अवलंबून असते - 

5. बियाणे कोणते वापरतात 

6. जमीन कशी आहे 

7. रासायनिक खतांच्या मात्रा 

8. नत्राचे प्रमाण 

8. सिंचन व्यवस्था 


खालील चार्ट मध्ये kds 726 soybean variety पेरणी व्यवस्थापन दिलेले आहे -

जमीन 

पेरणी अंतर 

हलकी 

18-20 इंच*10 सेमी 

मध्यम 

20-22 इंच*10 सेमी

भारी 

22-24 इंच*10 सेमी


टोकण पद्धत अंतर - 

3.5 फूट बेड + बेड वरती 2 ओळीतील अंतर 1 फूट ठेऊन 6 इंच वर 2 ते 3 बिया ठोकाव्यात.   

(सूचना -सोयबीनला चांगले फुले येण्यासाठी Tata Bahaar Plant Growth Promoter आपण फवारणी करू शकता)


Conclusion | सारंश -

शेतकरी मित्रांनो, आजचा लेख फुले संगम(kds-726) सोयाबीन माहिती हा तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारत ॲग्री कृषी दुकानाच्या वेबसाईटशी कनेक्ट रहा. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह, तोपर्यंत - धन्यवाद.


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न |  People also ask -

 

1. फुले संगम सोयाबीन बियाणे किंमत किती आहे. 

उत्तर - 26 किलो बॅगची  price 3000 रुपये आहे.

2. फुले संगम कोणत्या विद्यापीठाने प्रसारित केली आहे? 

उत्तर- फुले संगम सोयाबीन महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली आहे. 

3. Kds- 726 सोयबीनचे पेरणी साठी एकरी किती बियाणे लागते?

उत्तर - पेरणी साठी 20 - 22 किलो बियाणे पुरेसे आहे. 

4. kds -726 हा वाण किती दिवसात परिपक्व होतो?

उत्तर - हा वाण 110 - 115 दिवसात परिपक्व होतो. 

5. केडीएस 726 सोयाबीन एकरी उतारा किती मिळतो? 

उत्तर - उत्पादन - 10 ते 12 Qtl/ एकर 


हे पण एकदा वाचा | People also read - 

1. seed germination test: बियाणे उगवण क्षमता चाचणी कशी करावी?

2. soybean fertilizer management: सोयाबीन खत व्यवस्थापन वेळापत्रक

3. मार्केटमधील नं 1 मायक्रो न्यूट्रियंट | 100 % रिजल्टची गॅरंटी

4. डॉ बॅक्टोज कॉम्बो - नंबर 1 जिवाणू खत

5. समुद्री शेवाळी अर्क म्हणजे काय ?



लेखक | Author

BharatAgri Krushi Doctor


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी