soybean variety in maharashtra

soybean variety: सोयाबीन टॉप 10 सुधारित वाण

शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण या लेखामध्ये खरीप ऋतु मध्ये सोयबीनची पेरणी करून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल यासाठी टॉप soybean variety बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिका हा सोयाबीन पिकाचा सर्वात मोठा उत्पादक देश होता. त्याचा मोठा भाग त्याच्या बाजारामध्ये खालील प्रमुख निर्यातकांच्या हातात होता - ब्राझील आणि अर्जेंटिना. भारतात देखील सोयाबीन हे एक महत्त्वाचे गळिताचे पीक म्हणून उदयास येत आहे. खेड्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यास हे पीक महत्त्वपूर्ण ठरत आहे. 


सोयाबीन टॉप 10 सुधारित वाण  - 

खालील पॉइंट मध्ये best soybean variety बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे 

1. KDS-726 (फुले संगम) 

✔️हा वाण 2016 या वर्षी प्रसारित झाला आहे. 

✔️कालावधी: 100 ते 105 दिवस ( जवळपास 3 महीने 15 दिवस )

✔️हा वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे खास करून ही soybean variety बागायती क्षेत्रा मध्ये लागवड करावी असे विद्यापीठाने शिफारस केले आहे. 

✔️kds 726 soybean variety वर खोडमशी किडीचा,तांबेरा आणि जीवाणूजन्य ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव कमी येतो. 

✔️दाण्याचा आकार आणि रंग अतिशय आकर्षक आहे.

✔️उत्पादन: 10-15 क्विंटल/एकरी 


2. KDS 753  (फुले किमया)

✔️हा वाण 2017 या वर्षी प्रसारित केलेला आहे. 

✔️कालावधी:  90-100 दिवस ( जवळपास 3 महीने 10दिवस )

✔️Kds 753 ही soybean seed varieties तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे. 

✔️या सोयाबीन व्हरायटीच्या दाण्याचा आकार मोठा आणि झाडाला अधिक फुटवे येतो.

✔️या वणाला तीन दाण्याच्या शेंगा आणि तेलाचा उतार 18.25% आहे. 

✔️उत्पादन: 10-12 क्विंटल/एकरी.


3. KDS- 344 (फुले अग्रणी) 

✔️ही सोयाबीन व्हरायटी 2013 मध्ये प्रसारित केलेली आहे. 

✔️कालावधी: 100-105 दिवस 

✔️हा वाण अति पावसात उगवला जाऊ शकतो. 

✔️KDS- 344 हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे. 

✔️हा वाण संपूर्ण महाराष्ट्रात पेरणी साठी शिफारीत आहे तसेच लवकर काढणीला येतो. 

✔️उत्पादन: 8-10 क्विंटल/एकरी 


4. AMS- 1001 (PKV यलो गोल्ड)

✔️अमरावती विद्यापीठाने 2018 ला पी के व्ही येलो गोल्ड हा वाण प्रसारित केलेला आहे. 

✔️कालावधी:  95-100 दिवस (जवळपास 3 महीने 10 दिवसात हा वाण परिपक्व होतो)

✔️AMS- 1001 हा सोयाबीन सुधारित वाण मूळकूज / खोडकूज ,यलो मोझॅक,चक्री भुंगा, खोडमाशी या कीड आणि रोगांना प्रतिकारक आहे.

✔️उत्पादन: 10-15 क्विंटल/एकरी 


5. AMS-MB 5 -18( सुवर्ण सोया) 

✔️अमरावती विद्यापीठाने हा वाण 2019 ला प्रसारित केलेला आहे.   

✔️कालावधी:  95-100 दिवस

✔️शेंगा आणि झाडांवर लव असते त्यामुळे येणाऱ्या किडीला प्रतिरोध होतो.

✔️सुवर्ण सोया मूळकूज / खोडकूज रोगास अति प्रतिकारक आहे आणि पानावरील बुरशी ,येलो मोझॅक,चक्री भुंगा, खोडमाशी साठी मध्यम प्रतिकारक आहे 

✔️उत्पादन: 10-15 क्विंटल/एकरी 


6. MAUS- 612 

✔️हा वाण 2016 या वर्षी प्रसारित केलेला आहे.  

✔️कालावधी:  93-98 दिवस 

✔️अवर्षण आणि जास्त पावसात या वाणापासून अधिक उत्पादन मिळते. 

✔️मूळकूज / खोडकूज मध्यम प्रतिकारक आणि जीवाणूजन्य ठिपके या रोगासाठी अधिक प्रतिकारक. 

✔️उत्पादन: 8-12 क्विंटल/एकरी 

 

7. MACS- 1281   

✔️ही soybean variety 2016 या वर्षी प्रसारित केलेली आहे.

✔️कालावधी: 95-100 दिवस

✔️हा वाण खोड आणि शेंगा पोखरणाऱ्या किडीसाठी आणि पानावरील ठिपके यासाठी अधिक प्रतिकारक आहे.  

✔️उत्पादन: 12-15 क्विंटल/एकरी 


8. जे एस- 2034 

✔️हा वाण 2014 ला प्रसारित केलेला आहे.    

✔️कालावधी:  86-88  दिवस 

✔️सगळ्यात कमी दिवसात काढणीला येणार वाण. 

✔️रोग आणि किडीसाठी सहनशील. 

✔️उत्पादन: 8-10 क्विंटल/एकरी 


9. JS- 335 (जवाहर) 

✔️हा वाण वर्ष 1994 ला प्रसारित केलेला आहे.    

✔️कालावधी: 95-98 दिवस 

✔️JS- 335 जीवाणूजन्य ठिपके या रोगासाठी अधिक प्रतिकारक आहे. 

✔️उत्पादन: 10-11 क्विंटल/एकरी 


10. AMS- 100-39 (पीडीकेव्ही अंबा)

✔️सोयाबीन नवीन व्हरायटी पीडीकेव्ही अंबा  2021 ला प्रसारित केलेली आहे. 

✔️सोयाबीन वाण लवकर परिपक्व होणारे असुन तसेच जास्त उत्पादन देणारे वाण आहे.      

✔️कालावधी:  94-96 दिवस

✔️सोयाबीनच्या परिपक्वते नंतर 10 ते 12 दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक आहे.

✔️हा वाण मूळकूज / खोडकूज मध्यम प्रतिकारक आहे. 

✔️उत्पादन: 10-15 क्विंटल/ एकर 


सोयबीन बीजप्रक्रिया -

आपण सोयबीन वाण सांगितले पण त्या बियाणाला पेरणी पूर्वी बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे यामध्ये खाली दिलेली औषधे वापरू शकतो. 

👉स्वाल कंपनीचे कॅस्केड (ॲझोक्सीस्ट्रोबिन + थिओफेनेट मिथाइल + थायामेथोक्सम ) या औषधा मध्ये कीटक आणि बुरशीला नियंत्रित करण्यासाठी दोन्ही घटक उपलब्ध आहेत. हे आपण 1 किलो बियाण्यासाठी 3 मिली चोळावे.  

किंवा 

👉बायर एव्हरगोल एक्सटेंड (पेनफ्लुफेन 13.28% डब्ल्यू/डब्ल्यू + ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन 13.28% डब्ल्यू/डब्ल्यू एफएस) - 1 मिली + यूपीएल रेनो थायामेथोक्सम 30% एफएस कीटकनाशक 3 मिली / किलो बियाणाला आपण चोळावे. 

किंवा 

👉क्रिस्टल बाविस्टिन (कार्बेंडाझिम ५०% डब्ल्यूपी) बुरशीनाशक + बायर गौचो ६०० एफएस - इमिडाक्लोप्रिड ६०० एफएस कीटकनाशक 1 मिली /किलो बियाणास आपण चोळावे. रासायनिक बीज प्रक्रिया नंतर कमीत कमीत 2 ते 3 दिवसांनी जैविक बीज प्रक्रिया करावी कारण जिवाणू संवर्धन मारणार नाही. यासाठी नत्र विरघळणारे जिवाणू 20 ग्रॅम + स्फुरद विरघळविणारे जिवाणू बॅक्टोच्या PSB 4K मध्ये डॉ - 20 ग्रॅम / किलो बियाण्यास चोळावे.


Conclusion | सारंश -

शेतकरी मित्रांनो, आजचा soybean fertilizer management लेख तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतऍग्री कृषी दुकानाच्या वेबसाईटशी कनेक्ट रहा. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह, तोपर्यंत - धन्यवाद.


शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न |  People also ask -


1. सोयाबीन पीक किती दिवसात येते?

उत्तर - सोयाबीनचे पीक साधारण 3 ते 3.5 महिन्यात तयार होते. 

2. सोयाबीनची लागवड कधी करावी? 

उत्तर - सोयाबीनची लागवड 15 जून ते 15 जुलै पर्यंत करावी. 

3. सोयाबीन सुधारित वाण कोणते आहेत?

उत्तर द्या - kds 726, kds -753, kds- 344, AMS- 1001, AMS- 100-39 इत्यादि आहे. 

4. सोयाबीन पेरणी साठी किती बियाणे लागते?

उत्तर - 30-35 किग्रॅ/ एकर बियाणे लागते.

5. new soybean variety ला बीज प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते का?

उत्तर - हो, व्हरायटी नवीन असो किंवा जुनी बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे.


 पण एकदा वाचा | People also read - 

1. असे करा कापूस🌱पिकावरील गुलाबी बोंडअळीचे🐛 एकात्मिक नियंत्रण

2. बुरशीजन्य रोगांसाठी सर्वोत्तम सेंद्रिय बुरशीनाशक

3. हळद आणि आले पिकांमधील करपा रोगाचे एकात्मिक नियंत्रण

4. दोडका आणि कारले पिकातील फळमाशी नियंत्रण

5. chilli variety: मार्केट मधील टॉप 10 मिरची पिकाच्या जाती



लेखक | Author

BharatAgri Krushi Doctor


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी