कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक | कांदा बेसल डोस

कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक | कांदा बेसल डोस

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱कांदा पिकातील खतांचे वेळापत्रक जे देईल तुम्हाला 300 ते 400 क्विंटल उत्पादन👍

महाराष्ट्रात नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा,जळगाव, धुळे आणि सोलापूर हे जिल्हे कांदा पिकवण्यामध्ये प्रसिद्ध आहेत. कांदा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. कांद्याच्या रोपांना थंड हवा मानवते. मात्र कांदा लागवड करतांना खत आणि फवारणीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. अन्यथा कांद्याचे वजन कमी व गुणवत्ता कमी होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. कांदा पिकासाठी खतामधील अन्नद्रव्यांचे शोषण प्रामुख्याने कांद्याचे वाण, खतांचे प्रमाण, मातीच प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असते. कांद्याचे शेत तयार करण्यासाठी प्रथम खोल नांगरणी करावी त्यानंतर काही काळ शेत असेच उघडे ठेवावे. यानंतर शेतात सेंद्रिय खताच्या स्वरूपात प्रति एकर 2-3 टन कुजलेले शेणखत कंपोस्टिंग जिवाणूसह टाकावे. शेणखत टाकल्यानंतर शेताची पुन्हा नांगरणी करावी जेणेकरून शेणखत शेतातील जमिनीत चांगले मिसळले जाईल.

✅ कांदा पिकातील कांद्याची स्थिती आणि लागवडीच्या दिवसानुसार खत व्यवस्थापन पाहुयात:

✅ खत व्यवस्थापन (बेसल डोस): कांदा लागवडीच्या १ दिवस आधी:
👉 डी.ए.पी. - 50 किलो प्रति एकर
👉 एम.ओ.पी. (पोटाश) - 50 किलो प्रति एकर
👉 सल्फर - 8 किलो प्रति एकर
👉 मायक्रोनुट्रीएंट खत - 10 किलो प्रति एकर
👉 नीमकेक - 50 किलो प्रति एकर
( सूचना - हि सर्व खते मिक्स करून मातीमध्ये मिसळावीत किंवा बेड वर लागवड करणार असल्यास बेड भरून घ्यावेत. )

✅ लागवडीनंतर १० दिवसांच्या आत ड्रीप द्वारे किंवा पाटपाण्याने खत व्यवस्थापन:
19:19:19 - 2 किलो प्रति एकर
ह्यूमिक एसिड (प्राइम 1515 ) - 1 लिटर प्रति एकर
फायदा: रोपांच्या मुळांचा विकास होऊन मुळे खोलवर जातात, त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते.

✅ लागवडीनंतर 10 ते 30 दिवसांनी
👉 फवारणी:
19 : 19 :19 - 50 ग्राम
समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
दोन्ही प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
👉 ड्रीप द्वारे:
19 : 19 :19 - 3 किलो प्रति एकरी
डॉ. बैक्टोज कॉम्बो - एनपीके बैक्टीरिया - 1 लिटर प्रति एकरी
ड्रीप मधून देताना हे दोन्ही वेगवेगळे सोडावे एकत्र मिसळू नये.
फायदा: रोपांची सर्वांगीण वाढ होते, दिलेली खते उपलब्ध होण्यास मदत होते.

✅ लागवडीनंतर 30 ते 45 दिवसांनी:
👉 फवारणी:
12 : 61 :00 - 70 ग्राम
चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - १५ ग्राम
सिलिकॉन (टॅबसील) - 15 ग्राम
( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
👉 ड्रीप द्वारे:
19 : 19 :19 - 2 किलो प्रति एकरी
12 : 61 :00 - 3 किलो प्रति एकरी
फायदा: मायक्रोनुट्रीएंटची कमतरता भरून पिकाची सर्वांगीण वाढ होते, पिकाची रोग व कीड प्रतिकारक शक्ती वाढते.

✅ लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी:
👉 फवारणी:
13:00:45 - 75 ग्राम
कॅल्शिअम बोरॉन (इन्स्टा सी.बी) - 15 ग्राम
( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
👉 ड्रीप द्वारे:
00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी
बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
फायदे: कांद्याची गाठ तयार होत असताना हि खते दिल्यास गाठीचा विकास चांगला होतो.

✅ लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांनी:
👉 फवारणी:
00:52:34 - 75 ग्राम
बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 15 ग्राम
समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - 15 ग्राम
( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. )
👉 ड्रीप द्वारे:
00:52:34 - 3 किलो प्रति एकरी
बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - 250 ग्राम प्रति एकरी
वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
फायदे: कांद्याचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते.

✅ लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांनी:
👉 फवारणी:
00:00:50 - 75 ग्राम
चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 15 ग्राम
( सूचना - प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.)
👉 ड्रीप द्वारे:
00:00:50 - 3 किलो प्रति एकरी
चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - 250 ग्राम प्रति एकरी.
वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) 500 मिली प्रति एकर
फायदे: कांद्याचा आकार रंग व वजन वाढण्यास मदत होते.

✅ महत्त्वाच्या गोष्टी -
👉 फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा
👉 फवारणी करताना शेतात ओलावा असणे आवश्यक आहे
👉 नमूद केलेल्या खत जास्त प्रमाणात घेऊ नये
👉 पिकावर सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी.
👉 फवारणी मध्ये बुरशीनाशके आणि कीडनाशके मिसळताना कृषी तंज्ञानाचा सल्ला घ्यावा.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - https://krushidukan.bharatagri.com/
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी