🌱द्राक्ष पिकतील घड जिरणे - कारणे आणि उपाय👍

🌱द्राक्ष पिकतील घड जिरणे - कारणे आणि उपाय👍

 

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय - 🌱द्राक्ष पिकतील घड जिरणे - कारणे आणि उपाय👍

✅ही विकृती कधी येते -

👉एप्रिल छाटणी नंतर काडीमध्ये अन्नसाठा तयार होण्याच्या अवस्थे मध्ये जर सूर्य प्रकाश कमी राहिला तर ही समस्या ऑक्टोबर छाटणी नंतर उद्भवते.
👉ऑक्टोबर छाटणी नंतर 7 ते 10 व्या दिवशी पोंगा अवस्था असते या मध्ये घड जिरण्याची समस्या आपल्याला दिसू शकते.

✅घड जिरणे म्हणजे नेमक काय -

👉ऑक्टोबर छाटणी नंतर जय वेळेस आपण बागेला पेस्ट लावतो त्याच्या नंतर 7 ते 10 दिवसानंतर बागेला फूटी निघेल चालू होतात.
👉फुटीला चार ते पाच पाने निघताना त्याच्या मधून घड बाहेर पडतो , परंतु काही ठिकाणी घड बाहेर पडण्या एवजी बाळी घड किंवा बाळी बाहेर निघते यालाच आपण घड जिरणे असे म्हणतो.

✅कारणे -

👉ही एक विकृती आहे.
👉खरड छाटणी उशिरा घेणे.
👉खरड छाटणी नंतर काडीला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे.
👉एप्रिल छाटणी मध्ये काडी पुरेशी पक्व न होणे.
👉काडीमध्ये सूक्ष्म घड निर्मिती न होणे.
👉रासायनिक खतांची असंतुलित मात्रा.
👉काडी पक्वतेच्या वेळी कीड व रोगाचा प्रादुर्भाव होणे, पाने गळणे, नवीन फूटी वाढणे.
👉पांढरी मुळीची वाढ न होणे.

✅उपाययोजना -

👉खरड छाटणी वेळेवर घ्यावी.
👉खरड छाटणी नंतर काडीला चांगला सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी.
👉खरड छाटणी शक्यतो मार्च मध्ये करावी.
👉खत व्यवस्थापन हे माती परीक्षण वर आधारित करावे.
👉फळ छाटणी पूर्वी काडी परीक्षण अवश्य करावे.
👉कीड व रोगांचे वेळेवर नियंत्रण करावे.
👉पांढरी मुळी चालू राहील याची काळजी घ्यावी.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -

👉भारतअ‍ॅग्री ऍप - http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

कमेंट करें