डॉ. बॅक्टोज व्हीएएम (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरिझा)
डॉ. बॅक्टोज व्हीएएम (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरिझा)
Dosage | Acre |
---|
वर्णन -
माइकोराइजा हि बुरशी आणि पिकाची मुळे यांच्यातील एक सहजीवन संबंध आहे जे मातीतील पोषक घटक शोषून घेतात आणि पिकाची अन्न ग्रहण करण्याची क्षमता वाढवते.
रासायनिक संरचना - वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरिझा.
शेल्फ लाइफ - 1 वर्ष.
वापरण्याच्या पद्धती -
1. हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळते त्यामुळे पिकांना ड्रेंचिंग / आळवणीच्या माध्यमातून देऊ शकतो.
2. गांडूळ खत किंवा शेणखतामध्ये मिसळून देऊ शकतो. चांगल्या रिझल्ट साठी १० ते १२ दिवस आधी मायकोरिझा शेणखतामध्ये मिसळावे.
मात्रा -
5 मिली/लिटर पाणी
75 मिली/पंप (15 लिटर पंप)
1 लिटर/एकर ठिबक किंवा आळवणी द्वारे.
फायदे -
1. वनस्पतींच्या मुळांची वाढ आणि विकास करते.
2. सर्व पिकांमध्ये फॉस्फरसचे शोषण आणि एकत्रीकरण वाढवते.
3. मातीमधील अन्नद्रव्ये शोषली जाऊन झायलेम आणि फ्लोएमच्या माध्यमातून पिकामध्ये पसरण्यास सुलभ होते.
4. दुष्काळ, रोग किडीचा प्रादुर्भाव आणि अन्नद्रव्यांची कमतरता यासारख्या तणावाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रभावी ठरते.
5. उत्पादनाची गुणवत्ता आणि पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
शिफारस केलेली पिके - फळे आणि भाजीपाला पिके.