unhali mug lagwad

unhali mug lagwad: उन्हाळी मूग लागवड संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण उन्हाळी मूग लागवड माहिती (unhali mug lagwad mahiti) जाणून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यामध्ये कमी कालावधीत आणि कमी पाण्यामध्ये यणारे मूग हे प्रमुख कडधान्य पीक असून बाजारभाव हि चांगला भेटत असल्याने या पिकाची लागवड करण्याचा शेकर्यांचा कल वाढत आहे. महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने मूग पिकाची लागवड करणे गरजेचे आहे तसेच  योग्य प्रकारच्या जमिनीची निवड आणि पूर्वमशागत, अधिक उत्पादन देणा-या वाणाची निवड, बियाण्याचे प्रती एकरी योग्य प्रमाण, वेळेवर पेरणी, रासायनिक खतांचा शिफारशीत प्रमाणात वापर, वेळीच तण नियंत्रण, आवश्यकतेनुसार वेळेवर पाणीपुरवठा, रोग व किडींचे नियंत्रण या गोष्टीचा अभयास करून नियोजन केल्यास अधिक उत्पादन काढता येते.


जमीन 

उन्हाळी मूग लागवड साठी (unhali mug lagwad mahiti) मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. साधारणत: 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते. 


हवामान

पिकास 21 ते 25 अंश सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. तसेच 30 ते 35 अंश सें.ग्रे. तापमानात हे पीक चांगले येते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण हवामान यामुळे मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो.


पूर्वमशागत

रब्बी पिकाचे अवशेष, पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. पूर्वमशागतीवेळी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट एकरी 4 ते 5 गाड्या द्यावे जमिनीची खोल नांगरट नंतर 2 कुळवण्या करून जमीन भुसभुशीत करावी. उन्हाळी मुगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करून रानबांधणी करावी.


पेरणीची वेळ

उन्हाळी मुगाची पेरणी 20 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान करावी. पेरणीस फार उशीर करून नये अन्यथ: पीक मान्सुनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते.


बियाण्याचे प्रमाण

एकरी 5 ते 6 किलो बियाणे पुरेसे आहे. घरचे बियाणे वापरल्यास दर 3 वर्षांनी त्यात बदल करावा.


मुगाचे सुधारित वाण

क्रमांक

सुधारित वाण

बैसाखी

2

वैभव

पी.व्ही.के. ग्रीन गोल्ड

बी.व्ही.एम. 20032बीजप्रक्रिया

पेरणीपूर्वी बियाणे प्रक्रिया करणे फार महत्वाचे आहे. यासाठी बियाण्यास कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्याची प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून शेतात पेरावे.


पेरणीची पद्धत

मुगाच्या लागवडीत चांगले उत्पादन घेण्यासाठी नांगराच्या मागे ओळीत किंवा ओळीत पेरणी करावी. उन्हाळ्यासाठी दोन ओळींत 30 सें.मी. अंतर असावे आणि दोन रोपांमध्ये 10 ते 15 सें.मी. अंतर ठवावे.


खत व्यवस्थापन

लागवडीवेळी एकरी 8 किलो नत्र आणि स्फुरद 16 किलो याप्रमाणे खतमात्रा द्यावे म्हणजेच पेरणी करताना एकरी 1 गोणी डी.ए.पी. द्यावे. शेंगा भरत असताना 13:40:13 हे 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी फवारणी करावी.


पाणी व्यवस्थापन

पेरणी नंतर 3 ते 4 दिवसांनी हलके पाणी द्यावे. मूग पिकाला उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचनाची गरज असते. फुल अवस्थेत आणि शेंगा तयार होताना हलके सिंचन देखील करावे. जर उन्हाळी मूग साठी तुषार सिंचनाचा वापर केला तर चांगला फायदा होतो. कापणीच्या 15 दिवस आधी पाणी देणे बंद करावे. 


मशागत 

पेरणीपासूनच पीक तणविरहित ठेवल्याने पिकाची वाढ जोमात होते. पीक 20 ते 22 दिवसांचे असताना पाहिली आणि 30 – 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी लागणार आहे. कोळपणी नंतर दोन रोपातील तण काढाण्यासाठी लगेच खुरपणी करावी. पीक 30-45 दिवस तण विरहित ठेवणे हे उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक असते. 


कीड रोग नियोजन

पानावरील बुरशीजन्य ठिपके, अँथ्रॅकनोज आणि पावडरी मिल्ड्यू रोगाच्या नियंत्रसाठी अवतार बुरशीनाशक 30 ग्राम, रस शोषक किडींसाठी अरेवा 10 ग्राम, शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी कोराजन 6 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 


मूग काढणी

साधारणपणे, मूग पीक 65 ते 90 दिवसात परिपक्व होते, परंतु पीक पिकण्याची वेळ देखील वेगवेगळ्या जातींवर अवलंबून असते. फेब्रुवारी-मार्चमध्ये पेरलेले पीक मे महिन्यात तयार होते. जवळ जवळ 70 ते 75 % शेंगा जेव्हा हलके तपकिरी किंवा काळ्या रंगाचे दिसू लागतात, तेव्हा पीक काढू शकतात. तयार शेंगा 2 ते 3 तोड्यांमध्ये तोडून घ्याव्यात. चार ते पाच क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकते.


Conclusions | सारांश -

उन्हाळी मुगाचे व्यवस्थापन (unhali mug lagwad mahiti) करताना योग्य वाणाची निवड, योग्य अंतरावर पेरणी, खत - पाणी नियोजन आणि कीड व्यवस्थापन योग्य पद्धतीने असल्यास मुगाचे ४ ते ५ क्विंटल एकरी उत्पादन निघून नक्कीच शेकऱ्याला याचा आर्थिक फायदा होऊ शकतो. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. उन्हाळी मुगाची लागवड कधी करावी? 

उत्तर - उन्हाळी मुगाची पेरणी 20 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान करावी.

2. मूग लागवडीसाठी एकरी किती बियाणे वापरावे?

उत्तर - मुगाचे एकरी 5 ते 6 किलो बियाणे पुरेसे आहे.

3. मूग पिकास कोणते खत द्यावे?

उत्तर - मूग पिकास पेरणी करताना एकरी 1 गोणी डी.ए.पी. द्यावे.

4. मुगाची काढणी किती दिवसांमध्ये होते?

उत्तर - मूग पिकाची काढणी 70 ते 90 दिवसांमध्ये होते. 


People also read | हे देखील वाचा - 


1. kalingad lagwad: कलिंगड लागवड A to Z माहिती

2. oily spot of pomegranate: डाळिंब पिकातील तेल्या रोग नियंत्रण

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

6. ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापनलेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी