jowar farm

jowar farm: उन्हाळी ज्वारी लागवड संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण उन्हाळी ज्वारी लागवड माहिती (jowar farm) व्यवस्थापना बद्दल माहिती जाणून (unhali jowar lagwad in marathi) घेणार आहोत. उन्हाळी हंगामातसुद्धा मराठवाडा विभागामध्ये नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात ज्वारीची लागवड केली जाते. धान्य व कडब्याच्या अशा दोन्ही पद्धतीने उपयोग होत असल्याने उन्हाळी ज्वारीची लागवड केली जाते. दुभत्या जनावरांना लागणारा चारा टंचाई लक्षात घेता कमीत कमी क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन वाढविणे नितांत गरजेचे झाले आहे. त्याकरिता सुधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रती एकरी पिकाची उत्पादन व उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. 


पेरणीचा कालावधी -

डिसेंबरमध्ये उन्हाळी ज्वारी पेरणी केली असता जास्त थंडीमुळे उगवण कमी प्रमाणात होते. तसेच फेब्रुवारी महिन्यानंतर पेरणी केल्यास पीक जास्त तापमानामुळे फुलोऱ्यात येते. त्यात दाणे भरत नसल्यामुळे उत्पादनात मोठी घट होते. म्हणून उन्हाळी ज्वारीची पेरणीची जानेवारी 25 पर्यंत करावी.


जमीन -

ज्वारी (jowar farm) हे पीक मध्यम ते भारी जमिनीतील येणारे पीक असून खडकाळ व निचरा न होणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.


वाणाची निवड -

रब्बी हंगामातील सुधारित वाण जसे मालदांडी, परभणी मोती, फुले वसुधा, अकोला क्रांती हे उन्हाळी हंगामासाठी सरस आढळून आले आहेत. या व्यतिरिक्त खरीप हंगामातील परभणी श्‍वेता, पीव्हीके ८०९ आणि गोड ज्वारीचे सुधारित वाण फुले अमृता, एसएसव्ही 84, सीएसएच-22 यांचीसुद्धा लागवड करता येते.


बीजप्रक्रिया -

उन्हाळी ज्वारी (jowar lagwad) कीड व रोगांना पीक प्रतिकारक्षम राहील या उद्देशाने ज्वारीस पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम बाविस्टीन बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. यासाठी प्रति एकरी 4 किलो बियाणे वापरावे.


ताटांची योग्य संख्या -

उन्हाळी ज्वारीची (jowar lagwad) पेरणी दोन ओळींतील अंतर 18 इंच ठेवून करावी. उगवणीनंतर तीन आठवड्यांनी दोन रोपांतील अंतर 15 सें.मी. ठेवून विरळणी करावी आणि एकरी ताटांची संख्या 54,000 ठेवावी.


रासायनिक खताचा वापर -

ओलिता खालील उन्हाळी ज्वारीसाठी (jowar lagwad) 30:15:15 नत्रःस्फुरदः पालाश किलो प्रति एकरी घालावे. ही मात्रा मिश्र खतातून देणार असल्यास 10:26:26 मिश्र खत 50 किलो व 20 किलो युरिया पेरणीच्या वेळी व 20 किलो युरिया पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी पाण्याच्या पाळीसोबत द्यावे.


आंतर मशागत -

15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या व एखादी निंदणी आवश्यक करावी.


पाण्याचे व्यवस्थापन -

उन्हाळी ज्वारीस (sorghum farming) सरासरी 5 ते 7 पाण्याच्या पाळ्या देण्याची आवश्यकता असते. पीक पाणीपाळीला उत्तम प्रतिसाद देते. खालील मुख्य वाढीच्या काळात पाण्याचे नियोजन करावे. जोरदार वाढीचा काळ पेरणीनंतर 25 ते 35 दिवस  पोटरीत येण्याचा काळ पेरणीनंतर 55 ते 60 दिवस. फुलोरा येणाच्या कालावधी पेरणीनंतर 70 ते 75 दिवस कणसात दाणे भरण्याचा कालावधी

Conclusions | सारांश -

उन्हाळीत ज्वारीची (jowar farm) पेरणी योग्य वेळी केल्यास जावरीचे पीक चांगल्या प्रमाणात फुलोऱ्यात येते. जमीनाची निवड, वाणांची सुधारित निवड, व बीजप्रक्रियेची काळजी घेतल्यास पीक चांगले वाढते. रासायनिक खताचा वापर आणि पाण्याचे वेळेवर व्यवस्थापन केल्यास, उन्हाळी ज्वारीचे चांगले उत्पादन साध्य होते.

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

 

1. उन्हाळी ज्वारी लागवड कधी करावी?? 

उत्तर -  उन्हाळी ज्वारी लागवड जानेवारी 25 पर्यंत करावी.

2. ज्वारी किती उंच वाढते?

उत्तर - ज्वारी 6 ते 8 फुटांपर्यंत वाढते.  

3. कोणत्या जमिनीमध्ये ज्वारीची लागवड करावी?

उत्तर - ज्वारी हे पीक मध्यम ते भारी जमिनीतील येणारे पीक असून खडकाळ व निचरा न होणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.

4. ज्वारी पिकास खताची कोणती मात्रा द्यावी?

उत्तर - ज्वारी पिकास 10:26:26 मिश्र खत 50 किलो व 20 किलो युरिया पेरणीच्या वेळी व 20 किलो युरिया पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी पाण्याच्या पाळीसोबत द्यावे.


People also read | हे देखील वाचा - 


1. kalingad lagwad: कलिंगड लागवड A to Z माहिती

2. isabion syngenta: फुलांची संख्या वाढवण्यासाठी मार्केट मधील 1 नंबर औषध

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

6. ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापन



लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी