नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. निम तेल (neem oil) फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्स किडीला दूर पळवा ! या लेखामध्ये आपण पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये निम तेलाचा वापर रस शोषक किडींसाठी कश्या पद्धतीने करावा या बद्दल जाणून घेणार आहोत. पीक लागवडीनंतर वाढीच्या अवस्थेमध्ये रस शोषक किडी, नाग अळी आणि पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रधुरभाव होतो. रोप लहान असल्यामुळे जास्त तीव्रतेचे रासायनिक कीडनाशक वापरू शकत नाही. तेव्हा आपण जैविक कीडनाशक निम तेलाचा वापर करू शकतो.
नीम तेल neem oil काय आहे ?
नीम तेल हे एक चांगले नैसर्गिक कीडनाशक आहे, जे रस शोषक किडी, पाने खाणाऱ्या अळ्या, कोळी आणि बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण करते. नीम तेल neem oil कडुलिंबाच्या बिया आणि पानांपासून मिळते. सेंद्रिय कीडशकांच्या फवारण्यांव्यतिरिक्त, कडुनिंबाचे तेल औषधी आणि सौंदर्यप्रसाधने उद्योगांमध्ये शतकानुशतके वापरले जात आहे. हे तेल वनस्पतींसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण त्याचे कीडनाशक गुणधर्मामुळे केवळ पिकांना हानी पोहोचवणारे विशिष्ट कीडी मरत नाहीत तर हानिकारक किडींना पिकाजवळ येण्यापासून रोखतात. हे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण पसरवत नाही आणि ते बिनविषारी आहे.
कडुनिंबाचे तेल झाडाच्या बहुतेक भागांतून काढता येत असले तरी, कडुनिंबाच्या बियांमध्ये अझाडिराक्टीन या कीडनाशक संयुगाचे प्रमाण जास्त असते, म्हणून तेल निंबोळीपासून काढले जाते.
निम तेल neem oil insecticide काम कसे करते ?
कडुलिंबाचे तेल जैविक कीडनाशक म्हणून कार्य करते, जेव्हा पिकावर फवारणी केली जाते तेव्हा ते वनस्पतीद्वारे सहजपणे शोषले जाते आणि ते संपूर्ण उतींमधून पसरले जाते. जेव्हा पिकाच्या रसवाहिन्यांमध्ये असलेले कडुलिंबाचे तेल पिकाची पाने खाताना कीटकांद्वारे खाल्ले जाते, तेव्हा हे कडुनिंबाचे तेल किडींची खाद्य क्षमता कमी करते किंवा थांबवते. अळीच्या जीवनचक्राला प्रतिबंधित करते. प्रजाजन क्षमता कमी करते. कडुलिंबाचे तेल श्वासोच्छ्वासाची छिद्रे रोखून किडीना मारते. कडुलिंबाचे तेल neem oil spray कोळी किडीला दूर करते आणि पाने खाणाऱ्या किंवा रस शोषणाऱ्या 200 पेक्षा जास्त प्रजातींविरूद्ध अत्यंत प्रभावी आहे.
बाजारामध्ये उपलब्ध असलेले उत्कृष्ट निम तेल : neem oil insecticide
1. ब्रँड : IFC नीम 10000
2. कंपनी : इंडियन फार्मर कंपनी
3. वापरण्याचे प्रमाण : neem oil spray for plants
4. प्रतिबंधात्मक : 15 मिली प्रति 15 लिटर पंप फवारणी
5. उपचारात्मक : 30 मिली प्रति 15 लिटर पंप फवारणी
(टीप : निल तेल neem oil insecticide कोणत्याही रासायनिक कीडनाशकसोबत वापरू शकतो.)
नीम तेल वापरण्याचे फायदे : neem oil uses
1. अनेक प्रकारच्या किडींवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम - कडुलिंबाचे तेल हे एक अतिशय प्रभावी कीडनाशक आहे जे आपल्या पिकांचे 200 पेक्षा जास्त प्रजातींच्या कीडीपासून संरक्षण करते. जसे कि पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे, मावा, नाग अळी इ. पिकावरील कीडी, अंडी आणि अळ्या यांच्या जीवनचक्राच्या सर्व टप्प्यांवर त्याचा परिणाम होतो.
2. एक उत्कृष्ट बुरशीनाशक - भुरी रोग (पावडरी मिल्ड्यू), अँथ्रॅकनोज, ब्लॅक स्पॉट, पानावरील बुरशीजन्य ठिपके, करपा यांसारख्या पिकांच्या काही प्रमुख बुरशीजन्य रोगांपासून नियंत्रण मिळवण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापर फायदेशीर आहे.
3. कडुलिंबाचे तेल जिवाणूनाशक - फायर ब्लाइट हा एक जीवाणूजन्य रोग आहे ज्यामुळे झाडाची पाने सुकून ती जळाल्यासारखी दिसतात. हे टाळण्यासाठी कडुलिंबाचे तेल वापरणे फायदेशीर आहे.
4. नेमाटोड (सूत्रकृमी) नियंत्रित करण्यासाठी प्रभावी - निमॅटोड हा जमिनीत आढळणारा परजीवी आहे जो पिकाच्या मुळातील आवश्यक पोषक तत्वे खाऊन हळूहळू पीक नष्ट करतो. हे टाळण्यासाठी शेताची नांगरणी करताना कडुलिंबाचा पेंड वापरणे किंवा लागवडीनंतर कडुलिंबाच्या तेलाची ड्रेंचिंग केल्यास फायदेशीर ठरते.
5. पीक उत्पादनावर कोणताही दुष्परिणाम होत नाही - पारंपरिक रासायनिक औषधांचा प्रभाव अनेक दिवस पिकांवर राहतो. पण, कडुलिंबाच्या तेलापासून बनवलेल्या कीडनाशकाचा पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे कडुलिंबाच्या तेलापासून बनवलेल्या कीडनाशकाचा पिकावर केव्हाही वापर करणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
6. वातावरणात विघटनशील - कडुलिंबाच्या तेलामध्ये आढळणारे अझाडिराक्टीन organic neem oil हे जैवविघटनशील आहे. ते वातावरणात सहजपणे विघटित होते आणि विरघळते. म्हणून, ते सजीव प्राणी आणि पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.
7. औषधी पिकांच्या लागवडीत फायदेशीर । organic neem oil - औषधी वनस्पतींच्या लागवडीमध्ये रासायनिक कीडनाशके आणि खतांचे अनेक दुष्परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे औषधी पिकांच्या लागवडीत कीड नियंत्रणासाठी निंबोळी तेलाची फवारणी फायदेशीर ठरते.
8. परागीकरणासाठी फायदेशीर - पिकातील परागीकरणासाठी मधमाशी, फुलपाखरू, ड्रॅगनफ्लाय या मित्र कीटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कडुलिंबाच्या तेलाची फवारणी केल्यास त्यांच्यावर परिणाम होत नाही.
9. गांडुळांसाठी सुरक्षित - गांडुळ माती मोकळी करून ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची क्रिया वाढवते, जे वनस्पतीसाठी खूप महत्वाचे आहे. कडुलिंबाच्या तेलाची फवारणी केल्यास त्यांच्यावर परिणाम होत नाही.
Conclusion | सारांश -
निम तेल हे एक प्रभावी जैविक कीडनाशक असून पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये वापरल्यास रस शोषक किडी, पाने खाणाऱ्या अळ्या, कोळी इ. सारख्या किडीचे नियंत्रण होते. कीडनाशका सोबतच हे एक उत्कृष्ट बुरशीनाशक, जिवाणूनाशक आणि सूत्रकृमीनाशक सुद्धा आहे.
People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न -
1. निम तेल काय आहे?
ऊत्तर - निम तेल हे कडुनिंबाच्या बिया म्हणजेच निंबोळीचा अर्क काढून बनवलेले कीडनाशक आहे.
2. निम तेल कोणत्या किडींचे नियंत्रण करते?
ऊत्तर - कडुलिंबाचे तेल 200 पेक्षा जास्त प्रजातींविरूद्ध अत्यंत प्रभावी आहे. जसे कि पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे, मावा, नाग अळी इ. पिकावरील कीडी, अंडी आणि अळ्या यांच्या जीवनचक्राच्या सर्व टप्प्यांवर त्याचा परिणाम होतो.
3. निम तेल बुरशीचे नियंत्रण करते का?
ऊत्तर - हो, भुरी रोग (पावडरी मिल्ड्यू), अँथ्रॅकनोज, ब्लॅक स्पॉट, पानावरील बुरशीजन्य ठिपके, करपा यांसारख्या पिकांच्या काही प्रमुख बुरशीजन्य रोगांपासून नियंत्रण मिळवण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापर फायदेशीर आहे.
4. निम तेल कधी वापरू नये?
ऊत्तर - अत्यंत थंड किंवा जास्त तापमानात वापरू नका. जास्त किंवा कमी पाण्यामुळे झाडांवर ताण येत असल्यास निम तेल वापरणे टाळा.
5. निम तेल फवारणी करताना कोणत्या औषधा सोबत मिसळू शकतो?
ऊत्तर - निम तेल कोणत्याहि रासायनिक कीडनाशकसोबत फवारणी neem oil spray केल्यास चांगला रिझल्ट भेटतो.
People also read | हे देखील वाचा -
1. शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती
2. वाणी/पैसा कीड (millipede insect) नियंत्रनाची संपूर्ण माहिती
3. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?
4. जाणून घ्या humic acid बद्दल सर्वकाही
लेखक
भारतअॅग्री कृषि एक्स्पर्ट