Importance of humic acid in crops.

जाणून घ्या humic acid बद्दल सर्वकाही

शेतकरी मित्रानो, आजच्या लेखात, पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी ह्युमिक ऍसिडचे महत्त्व जाणून घेऊया. तसेच या लेखात आपण ह्युमिक ऍसिड humic acid  म्हणजे काय, ह्युमिक ऍसिडचे फायदे काय आणि वापरण्याची पद्धत याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. 

ह्युमिक ऍसिड म्हणजे काय?

ह्युमिक ऍसिड हे खाणीतून मिळणारे खनिज आहे, ज्यामध्ये ह्युमस हा घटक आढळतो. ज्याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकताही वाढते. हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे. तसेच ह्युमिक ऍसिड हे पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होते, ज्यामध्ये ह्युमिक आणि फुलविक ऍसिड आढळते.

ह्युमिक ऍसिडचे फायदे humic acid che fayde in marathi

 1. जमिनीची सुपीकता वाढते, ज्यामुळे माती सुपीक होते.
 2. ह्युमिकची बीजप्रक्रिया केल्यास बियाण्यांची उगवण क्षमता वाढते.  
 3. जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व पांढऱ्या मुळ्यांची संख्या व लांबी वाढते. 
 4. पिकामध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया जलद होते. त्यामुळे पिकामध्ये हिरवेपणा येतो.  
 5. पिकाची शाखीय वाढ होण्यास मदत होते.  
 6. पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. 
 7. मातीची रासायनिक, भौतिक आणि जैविक रचना सुधारते, माती भुसभुशीत बनवते.
 8. बदलत्या हवामानामुळे झाडांवर येणार ताण नाहीसा करते. 
 9. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते 
 10. ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.
 11. पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.
 12. रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.

बाजारामध्ये विविध प्रकारचे ह्यूमिक ऍसिड उपलब्ध आहेत त्यापैकी काही ह्यूमिक ऍसिड बद्द्दल माहिती घेऊ. 

प्रॉडक्ट नाव 

घटक 

ड्रीप / एकर 

फवारणी प्रति १५ लिटर 

रूट मास्टर 

९८% पोटॅशिअम ह्युमेट फ्लेक्स 

२५० ते ५०० ग्राम 

२० - २५ ग्राम 

प्राइम १५१५

ह्यूमिक १० %

१ ते २ लिटर 

३० मिली 

उत्कर्ष हुमिनोज 

ह्युमिक ऍसिड - 68-69%, फुलविक ऍसिड - 17-18% आणि K2O - 10-11%

९०० ग्राम 

२० - २५ ग्राम 

उत्कर्श ब्लैक पर्ल-L

ह्यूमिक १२ % + फुलविक ३%

१ ते २ लिटर 

३० मिली 

क्रोपेक्स जीविझाईम ग्रॅनुलर  

ह्यूमिक-4%, फुलविक-0.75%

८ किलो खतासोबत बेसल डोस मधून 

-

 

 

कमेंट करें