kothimbir lagwad

kothimbir lagwad: कोथिंबीर लागवड कशी करावी A to Z माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतअग्री कृषि दुकान मध्ये तुमचे स्वागत आहे, आज या लेखा मध्ये आपण कोथिंबीर लागवड कशी करावी आणि कोथिंबीर लागवड करून लाखोंचे उत्त्पन्न कसे मिळवायचे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात, कारण आज आम्ही तुम्हला या लेखा मध्ये कोथिंबीर लागवड बद्दल माहिती देणार आहोत. 

कोथिंबीर शेतकऱ्यांचा फायदा करून देणारे भाजीपाला पीक आहे, परंतु त्यासाठी चांगले हवामान आवश्यक आहे, वेळेवर पेरणी,  लागवड पद्धत, पाणी, खतांची मात्रा, तणनियंत्रण आणि पीक संरक्षण या गोष्टीचे  पालन करणे गरजेचे आहे. चला तर पुढे जाणून घेऊया कोथिंबीर लागवडीबद्दल सर्व आवश्यक तपशील. 

 

कोथिंबीर बद्दल माहिती  | Coriander Farming Details  -

मसाल्याच्या पिकांमध्ये kothimbir lagwad साठी विशेष स्थान आहे. त्याचा सुगंध आणि चव यामुळे जवळपास सर्व भाज्यांसोबत याचा वापर केला जातो. कोथिंबिरीचे पीक अवघ्या ४५ ते ५० दिवसांत तयार होते आणि त्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांची कमाई सुरू होते. सुधारित व संकरित वाणांच्या बियाण्यांपासून सुमारे २ ते ३ वेळा कोथिंबीर काढता येते. तसेच, मसाल्याच्या पिकांमध्ये कोथिंबीरची लागवड अत्यंत फायदेशीर मानली जाते, कारण त्याची लागवड करण्यासाठी कमी खर्च आणि कमी वेळ लागतो. हे पीक लवकर तयार होते आणि नफाही चांगला मिळतो.

 

कोथिंबीर शेती बद्दल थोडक्यात वर्णन -

खालील टेबल मध्ये coriander farming बद्दल थोडक्यात माहिती दिली आहे 

जमीन

कोथिंबीरची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीवर करता येते, परंतु कोथिंबीर लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाणार जमीन म्हणजे पाण्याचा अधिक निचरा होणारी आणि जमीनीचा    पीएच  6-8 च्या दरम्यान असला पाहिजे.  

तापमान 

कोथिंबीर 20 - 25 अंश सेल्सिअस तापमानात चांगली वाढते.

बियाणे दर

बियाणे प्लॉट साठी - 10-15 किलो / एकर 

हिरव्या पाल्या साठी - 

गावरान धने  - 30 -40 किलो/एकर

संकरित धणे - 7 - 8 किलो / एकर

व्हरायटी 

गौरी, RCR-684, कास्ती,CS6, jd-1, जळगाव धाना, हिसार सुगंध, V-1, V-2 इ.

पेरणीची योग्य वेळ

बियाण्यांसाठी - खरीप आणि रब्बी

हिरवी कोथिंबीर - सर्व हंगामात

पेरणीची पद्धत

कोथिंबीरची पेरणी यंत्राद्वारे व हाताने करता येते किंवा जमिनीवर फेकून रोटाव्हेटरने मिक्स करावे म्हणजे बियाणे माती आड मिक्स होईल. 

पेरणी अंतर  

20 x 15 सेमी किवा 5-9 x 2- 1.5  इंच  

पिकाचा कालावधी

हिरवी पाने दिसण्याचा कालावधी - 45-50 दिवसांत पहिली कापणी

बियाणे तयार होण्याचा कालावधी – 110-120 दिवसात बियाणे तयार होते.

 

कोथिंबीर लागवडसाठी बेसल डोस -

24:24:00/ 20:20:00/ 18:46:00 - 50 किलो + पोटॅश 25 किलो + ह्युमिक ऍसिड - 5 किलो + झिंक सल्फेट 5 किलो आणि 30 दिवसांनी, युरिया - 20 किलो एक एकरासाठी वापरता येते. तुम्ही खालील खते 5 किलो प्रति एकर पाण्यात किंवा ठिबकद्वारे देऊ शकता किंवा 75 ग्रॅम/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.

खत खत

दिवसात फरक

19:19:19

15 ते 20 नंतर

१२:६१:००

25 ते 30 नंतर

13:40:13

35 ते 40 नंतर

13:00:45

45 ते 60 नंतर

00:00:50

55 ते 75 (10 दिवसांनी ते पुन्हा करू शकता)

 

कोथिंबीर लागवडीची पद्धत -

खालील पॉईंट मध्ये kothimbir lagwad kashi karavi या बद्दल माहिती देण्यात आली आहे 

1. कोथिंबीर लागवडीसाठी प्रथम शेतात खोल नांगरणी करावी. त्यानंतर शेतात एकरी 5 ते 6 गाड्या चांगले   कुजलेले शेण खत टाकावे. 

2. शेणखता बरोबर वाटलंच तर तुम्ही त्यावेळी बेसल डोसही टाकू शकता. 

3. रोटाव्हेटरच्या साहाय्याने शेणखत व रासायनिक खताची मात्रा जमिनीत पूर्णपणे मिसळावी.

4. हिरवी कोथिंबीर  किंवा धणे बियाणे तयार करायचे असतील तर त्यानुसार बियाणे पेरा. 

5. उन्हाळ्यात कोथिंबीर पेरायची असेल तर प्रथम शेतामध्ये हलके पाणी द्यावे, जेणेकरून बियांची उगवण एकसारखी होईल.

6. जमिनीत वाफसा आल्यास पेरणी सुरू करता येईल आणि पेरणी करताना बीजप्रक्रिया अवश्य करा. 

7. बीजप्रक्रिया करताना बाविस्टिन- २ ग्रॅम + टाटा मिडा- १ मिली मिसळून एक किलो बियाणाला चोळावे. 

8. उगवण झाल्यानंतर पाणी देणे, फवारणी करणे आणि खत देणे यावर लक्ष द्या.

 

कोथिंबीर पिकामध्ये मध्ये तण नियंत्रण -

खालील टेबल मध्ये coriander farming in summer या मध्ये वापरण्यात येणारी तणनाशकांची माहिती आहे 

फवारणीची वेळ

औषधांची नावे 

बिया पेरल्यानंतर लगेच कोरड्या जमिनीत

पेंडीमेथालिन 38.7%- 700 मिली/एकर

बियाणे पेरणीनंतर लगेच जमिनीत पाणी देऊन.(48 तासांपूर्वी) 

पेंडीमेथालिन 30%  - 1 लिटर/एकर

पेरणीनंतर 5 दिवसाच्या आत 

ऑक्सिफ्लोरोफेन 23.5%- 60-80 मिली/एकर

 

कोथिंबीरवरील प्रमुख कीड आणि रोग  -

खालील चार्ट मध्ये आपण कोथिंबिरीच्या प्रमुख कीटक आणि रोगांबद्दल (Coriander Insects and Pest Details )आणि त्यांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त औषधे या बद्दल माहिती जाणून घेऊया

कीटक आणि रोग

नियंत्रण उपाय

मावा  

1. इमिडाक्लोप्रिड- 17.8% SL (कॉन्फिडोर) - 10 मिली.

किंवा

2. थायामेथोक्सम - 25% डब्ल्यूजी (अरेवा) - 10 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

भूरी   

1.टेब्युकोनाझोल ५०% + ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन २५%WG(नेटिवो)-10 ग्रॅम

किंवा

2. मायक्लोब्युटॅनिल 10% WP(इंडेक्स) 10 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी

मर रोग

1 .मॅन्कोझेब 64% + मेटालॅक्सिल 8% WB(टाटा मास्टर)-500 ग्रॅम

किंवा

2.fफोसेटाइल एएल 80 WP(एलियट) - 500 ग्रॅम @200 लिटर पाण्यात मिसळून पाठपाण्याद्वारे द्यावे किंवा फवारणी करावी. 

 

कोथिंबीर उत्पादन  -

योग्य कोथिंबीर लागवड तंत्राचा वापर  केल्यास हिरवी कोथिंबीर उत्पादन  - 4 ते 5 टन/एकर आणि बियाणे उत्पादन  15-20  क्विंटल/एकर मिळते. 

 

Conclusion | सारांश -  

शेतकरी बांधवांनो, आम्हाला आशा आहे कि कोथिंबीर लागवडीच्या संबंधित हा लेख तुम्हाला आवडला असेल. जर तुमच्याकडे कोथिंबीर लागवडीची वेगळी पद्धत किंवा लागवड संदर्भात काही प्रश्न असतील, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा लेख तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका. शेतीशी संबंधित इतर माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतअग्री कृषि दुकान वेबसाईड ला अवश्य भेट द्या

 

कोथिंबीर लागवडीसंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न -

1. कोथिंबीरची लागवड कधी केली जाते?

उत्तर : कोथिंबीरीची लागवड जून-जुलै आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते.

2. एका एकरात हिरव्या कोथिंबीरचे उत्पन्न किती?

उत्तर: एका एकरात सुमारे 15-20 क्विंटल कोथिंबीर तयार होते.

3. कोथिंबीरीला किती दिवसांनी पाणी द्यावे?

उत्तर: हे जमिनीवर अवलंबून आहे, परंतु तुम्ही 8 ते 10 दिवसांतून एकदा पाणी देऊ शकता.

4. हिरवी कोथिंबीर किती दिवसात तयार होते?

उत्तर - हिरवी कोथिंबीर ४५ ते ५० दिवसात तयार होते.

5. पेरणीपूर्वी बियाणे किती काळ भिजवायचे?

उत्तर: साधारण 12 ते 24 तास भिजत ठेवा.

6. कोथिंबीर लागवड उन्हळ्यात करू शकतो का?

उत्तर - हो, कोथिंबीर लागवड उन्हळ्यात करू शकता फक्त पाणी भरपूर पाहिजे. 


हे पण वाचा | FAQs - 

1. एरंडीच्या जाती: एरंडाच्या सुधारित जातींची नावे आणि माहिती

2. lavala weed control: ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

3. 100 टन ऊस पिकासाठी किती खताची गरज आहे.

4. Syngenta Alika: Syngenta Alika कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती

5. सोयाबीन पॉड बोअरर: सोयाबीन पॉड बोअरर - ओळख, नियंत्रण आणि व्यवस्थापन


लेखक -

भारतॲग्री कृषी टीम 

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी