नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. “सोयाबीन पिकातील पिवळा मोझॅक व्हायरस yellow mosaic virus in soybean नियंत्रण आणि उपाय. ” या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकातील वायरस soybean mosaic virus नियंत्रण कसे करावं या बद्दल माहिती घेणार आहोत. सोयाबीन हे राज्यातील कोरडवाहू क्षेत्रातील महत्वाचे नगदी पीक असून विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने या पिकावर अवलंबून आहे. सोयाबीन वर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होतो. हा विषाणूजन्य रोग मुंगबिन येलो मोझॅक या विषाणू मुळे होतो, या रोगाचा प्रसार मावा आणि पांढरी माशी मुळे डाळ वर्गीय कडधान्ये पिके मुंग,उडीद, चवळी,मटकी, वाल ,सोयाबीन या पिकांवर होतो. ह्या रोगामुळे पिकाचे 70 ते 90% पर्यंत नुकसान होऊ शकते.
soybean yellow mosaic virus विषाणूची लागण कधी होते?
विषाणूजन्य रोग खूप झपाट्याने फैलतो पेरणी नंतर 25 व्या दिवशीच याची लक्षणे दिसायला लागतात
पेरणीकेल्यानंतर 20 दिवसाचा पावसाचा खंड पडला व नंतर पाऊस पडला तर सोयाबीनचे पीक पिवळे दिसायला लागते, म्हणजे येलो मोझॅकची लक्षणे दिसायला लागतात.
सोयाबीन या पिकांवर पेरणी केल्यानंतर 20 व्या दिवसापासून प्रतिबंधात्मक उपाय करणे फायद्याचे ठरते.
सोयाबीन पिवळा मोजेक वायरस लक्षणे -
1. सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट निस्तेज, पिवळे ठिपके दिसतात.
2. कालांतराने ठिपक्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा -हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात.
3. रोगग्रस्त soybean yellow mosaic virus झाडांवरील पाने अरुंद व वेर्डीवाकर्डी होऊन त्यांचा आकार लहान होतो.
4. रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत व पोचट होतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घट येते.
सोयाबीन पिवळा मोजेक वायरस प्रादुर्भावाची कारणे आणि प्रसार -
1. yellow mosaic virus in soybean हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे उद्भवतो.
2. सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किंडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
3. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर जिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.
4. या रोगास बळी पडणा-या वाण/जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जेएस 335 हा वाण या रोगास बळी पडतो.
एकात्मिक व्यवस्थापन yellow mosaic virus in soybean control सोयाबीन पिवळी पडणे उपाय -
1. पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा.
2. सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूर ही आंतरपिके घ्यावीत.
3. शेत तणमुक्त ठेवावे.
4. शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
5. पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किंडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
6. एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.
7. बीजप्रक्रिया - थायोमिथोक्साम 30 टक्के एफ.एस या किंटकनाशकाची 10 मिली + पाणी 10 ते 20 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाण बीजप्रक्रया करावी.
8. पीक पेरणीनंतर 20 दिवसांनी जैपैक (थियामेथोक्सम + लैम्ब्डा साइहलोथ्रिन) 10 मिली + IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
9. दुसरी फवारणी 35 दिवसांनी कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल) 10 मिली + आईएफसी नीम (10000 पीपीएम) 25 मिली + IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. अळीचा प्रधुरभाव असल्यास धानुका ईएम 1 (एमेमेक्टिन बेंजोएट 5% एसजी) 10 ग्राम प्रति पंप मिसळावे.
10. सोयाबीन पिकात 60 दिसानंतर चक्री भुंगा आढळतो ,हा भुंगा खोडाच्या आत घुसून मुळापर्यंत खोड पोखरतो, वरील दोन फवारणी जर वेळेवर केल्या तर चक्री भुंग्यावरही नियंत्रण मिळवता येते.
Conclusion | सारांश -
सोयाबीन मोजेक वायरस हा पांढरी माशी मुळे होणार/पसरणारा विषाणू जन्य रोग आहे. रोगाची लक्षणे पेरणी पासून 20 दिवसांनी दिसू लागत. या रोगाच्या नियंत्रणासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी प्रतिबंधात्मक नियोजन करताना एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावे.
People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न -
1. मोझॅक व्हायरस रोग कशामुळे होतो?
ऊत्तर - सोयाबीन पिकातील मोझॅक व्हायरस हा पांढरी माशी मुळे होणार/पसरणारा विषाणू जन्य रोग आहे.
2. मोझॅक व्हायरस रोगाचे लक्षणे काय आहेत?
ऊत्तर - रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेर्डीवाकर्डी होऊन त्यांचा आकार लहान होतो. पानावर पिवळे ठिपके तयार होतात. नंतर संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा -हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात.
3. रोगाची लागण कधी होते?
ऊत्तर - पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पांढऱ्या माशीचा प्रधुरभाव झाल्यास रोगाची लागण होते.
4. मोझॅक व्हायरस रोग कोणत्या पिकामध्ये उद्भवतो?
ऊत्तर - विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पिकावर लागण होते.
5. रोगाची लागण होऊ नये म्हणून काय करावे?
ऊत्तर - पिवळे चिकट सापळे १० प्रति एकरी लावावे आणि पहिल्या दोन फवारणी मध्ये निम तेलाचा वापर करावा.
People also read | हे देखील वाचा -
1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !
2. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे
3. शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती
4. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा.
5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?
लेखक
भारतअॅग्री कृषि एक्सपर्ट