brinjal shoot and fruit borer

brinjal shoot and fruit borer: वांगे पिकातील शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या आळीचे नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आजच्या लेखात वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळी brinjal shoot and fruit borer बद्दल माहिती घेणार आहोत. वांगी पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख किडींपैकी शेंडा आणि फळ पोखरणारी अळी हि प्रमुख कीड आहे. वांगी पिकात शेंडा व फळ पोखरणारी अळीची लागण खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे किडीचा प्रधुरभाव ओळखून वेळीच उपाययोजना brinjal shoot and fruit borer chemical control केल्यास कीड नियंत्रणात येऊ शकते. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करणे गरजेचे असते.

 

किडीची ओळख -

1. किडीची शास्त्रीय नाव Leucinodes orbonalis Guen. असे आहे.
2. किडींचे पतंग पांढरे असून त्यावर गुलाबी व पिंगट ठिपके असतात.
3. अळ्या गुलाबी रंगाच्या असतात. वर्षाकाठी किडीच्या आठ ते दहा पिढ्या पूर्ण होतात.
4. फळ आणि शेंडा पोखरणारी कीड सर्वसाधारणपणे ४० टक्के नुकसान करते.
5. योग्य वेळी उपाययोजना केल्या नाहीत, तर हे नुकसान ८० टक्क्यापर्यंत जावू शकते.

 

नुकसानीचा प्रकार -

1. अळी brinjal shoot and fruit borer प्रथम पानांच्या देठात, कोवळ्या शेंड आत शिरून आतील भाग खाते. या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात.
2. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळि पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळे न धरता वळून, सुकून जमिनीवर गळून पडतात.
3. फळे आल्यानंतर ही अळी सुरुवातीला छिद्र करून फळात brinjal fruit borer प्रवेश करून विष्टेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडल्याचे लक्षात येत नाही.
4. आतील गर खाऊन विष्टा आतच सोडत असल्यामुळे कीडग्रस्त फळे brinjal fruit borer खाण्यास अयोग्य ठरतात.

प्रतिबंधात्मक उपाय -

1. उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून किडीच्या विविध अवस्था नष्ट होतील.
वांग्याच्या सुधारित व शिफारस वानांचा वापर करावा.
2. पिकाला गरजेनुसार खत मात्रा द्यावी व आवश्यकता असेल तेवढेच पाणी द्यावे.
3. प्रादुर्भावग्रस्त झाडाची शेंडे व फळे तोडून अळ्या brinjal shoot and fruit borer सहित त्यांचा नायनाट करावा.
4. वानांच्या शिफारशीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर ठेवावे.
5. वांग्याच्या पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत. शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या तीव्रतेचे समजून येते.

रासायनिक नियंत्रण : brinjal shoot and fruit borer chemical control -

1. धानुका झापॅक (थियामेथोक्साम 12.6% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 9.5% ZC) - 10 मिली 

2. बायर सोलोमन (बीटा-साइफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी) - 15 मिली 

3. प्रोफेक्स सुपर (प्रोफेनोफोस 40% + साइपरमेथ्रिन 4% ईसी) - 30 मिली 

4. धानुका ईएम1 एमेमेक्टिन बेंजोएट 5% एसजी - 10 ग्रॅम 

5. अदामा इंपीरियल (बिफेंथ्रिन १०% ईसी) - 30 मिली 

6. बायर डेसिस 100 ईसी (डेल्टामेथ्रिन 100 ईसी) - 10 मिली 

7. यूपीएल विराट (साइपरमेथ्रिन ३% + क्विनालफॉस २०% ईसी) - 15 मिली 

8. बायर फेम (फ्लुबेंडियामाइड 480 एससी) - 6 मिली 

9. डाऊ एग्रो सायन्स ट्रेसर (स्पिनोसैड 45% एससी) - 8 मिली 

10. एफएमसी कोराजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल, 18.5% ) एससी - 6 मिली 

11. गोदरेज ग्रासिया ( फ्लक्सैमेटामाइड 10% ईसी) - 15 मिली 

12. एफएमसी बेनेविया (सायंट्रानिलिप्रोल 10.26%) - 30 मिली 

👉किडीच्या प्रधुरभावानुसार वरील पैकी कोणतेही एक कीडनाशक प्रति 15 लिटर पंप मिसळून फवारणी करावी. 


Conclusion | सारांश - 

वांगी हे वर्षभर लागवड केले जाणारे फळभाजी पीक आहे. या पिकामध्ये शेंड आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा जास्त प्रमाणामध्ये प्रधुरभाव होतो. वेळीच नियंत्रण न झाल्यास फळ कीडग्रस्त होऊन उत्पादनामध्ये 70 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. किडीचा प्रधुरभाव ओळखण्यासाठी कामगंध सापळे लावावेत. कडी जास्त प्रमाणामध्ये असल्यास वरील रासायनिक कीडनाशकांचा brinjal shoot and fruit borer chemical control वापर करावा. 

People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

1. शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या आळी पिकामध्ये कधी पासून आढळून येते?

ऊत्तर -  आळीचा प्रधुरभाव पिकामध्ये फुल अवस्थेपासून ते शेवटपर्यंत आढळून येतो. 

2. शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या आळीमुळे पिकामध्ये किती नुकसान होऊ शकते?

ऊत्तर -  किडीचे लवकर नियंत्रण न झाल्यास पिकामध्ये 50 ते 80%नुकसान होऊ शकते

3. अळीचा प्रधुरभाव झाल्याचे पहिले लक्षण कोणते?

ऊत्तर - अळी प्रथम पानांच्या देठात, कोवळ्या शेंड आत शिरून आतील भाग खाते. या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात.

4. अळीचा प्रधुरभाव ओळखण्यासाठी काय करावे?

ऊत्तर -  अळीचा प्रधुरभाव आपल्या शेतामध्ये झाला आहे का नाही हे ओळखण्यासाठी एकरी 5 कामगंध सापळे लावावेत. 

5. अळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी फुल अवस्थेमध्ये कोणती फवारणी घेऊ शकतो?

ऊत्तर - अळीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी फुल अवस्थेमध्ये धानुका ईएम 1 - 10 ग्रॅम + IFC निम ऑइल 20 मिली + IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पंप मधून मिसळून फवारणी करून. 

 

People also read | हे देखील वाचा - 

1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

2. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे

3. शंखि गोगलगाय (gogalgai niyantran) नियंत्रनाची संपूर्ण माहिती

4. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा. 

5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?



लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी