Syngenta Heemshikhar best tomato seed in the market.

मार्केट मधील सर्वात बेस्ट टोमॅटो बियाणे heemshikhar ( syngenta )

टोमॅटोच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य इतर राज्याच्या तुलनेत आघाडीवर आहे तसेच तिन्ही हंगामात टोमॅटोची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील हवामान या पिकास योग्य असून, जमीन, पाणी, खत व पीक संरक्षण यांच्या नियोजना सोबतच सुधारित हायब्रीड बियाणे लावल्यास चांगले उत्पादन भेटू शकते. 

चला तर ह्या लेखामध्ये जाणून घेऊयात टोमॅटोची सुधारित सिजेंटा कंपनीची हायब्रीड व्हरायटी हिमशिखर बद्दल heemshikhar tomato seeds

हिमशिखर टोमॅटोची वैशिष्ट्ये : syngenta tomato himshikhar

  1. अनिश्चित उंची सोबतच पिकाची जोमदार वाढ 
  2. फुटव्यांची संख्या जास्त 
  3. रोपाची मध्यम कॅनोपी 
  4. जास्त उत्पादन क्षमता
  5. दीर्घ कालावधीचे पीक
  6. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी चांगले

फळांचा रंग आणि आकार 

लाल गोलाकार फळ 

फळांचे वजन     

  ८० - ९०  ग्रॅम

पेरणीचा हंगाम 

तिन्ही हंगामामध्ये येत असले तरी पावसाळी हंगामासाठी  अत्यंत योग्य

बियाणे 

५०- ६० ग्राम प्रति एकरी 

पेरणीची पद्धत

    पुर्नलागवड

पेरणीचे अंतर 

ओळींतील अंतर ४ फूट आणि रोपांमधील अंतर 45 सेंमी

पहिली कापणी

६० - ६५ दिवस

फुलांचे स्वरूप 

गुच्छ स्वरूपात फुले येतात

उत्पादन 

२५ - ३० टन प्रति एकरी ( नियोजन आणि हवामानानुसार कमी जास्त होऊ शकते )


टोमॅटो बियाण्यास बीजप्रक्रिया :

रासायनिक बुरशीनाशक किंवा कीडनाशकाची प्रक्रिया करताना शिफारशींनुसार १ किलो बियाण्यास बाविस्टीन (कार्बेन्डाझिम ५०% WP) २ ग्राम + कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड १७.८ % SL ) ०.५ मिली  १ किलो बियाण्यास चोळावे. तत्पूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओले करून घ्यावे. अशी प्रक्रिया करताना, हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत व प्रक्रिया हलक्या हाताने करावी. 

भाजीपाला रोपांची प्रक्रिया करण्यासाठी बाविस्टीन ४० ग्राम + कॉन्फिडोर  १० मिली हे १० लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावे व रोपांची मूळे १० मिनिटे द्रावणामध्ये बुडवून मगच लागवडी साठी वापरावे. 

जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरीडी (डॉ बॅक्टोस डरमस) १० मिली हे प्रति किलो बियाण्यास हलक्या हाताने चोळून जैविक बीजप्रक्रिया करू शकता. 

बीजप्रक्रियाचे फायदे : 

टोमॅटो बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यास पिकामध्ये येणारे बुरशीजन्य रोग - मर, पानावरील बुरशीजन्य ठिपके तसेच करपा रोगाचे प्रमाण कमी होते. परिणामी फवारणी वरील खर्चामध्ये बचत होते. 

 


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी