नमस्कार शेतकरी मित्रानो, bharatagri krsuhidukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आपण soybean lagwad mahiti पाहणार आहोत. सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पीक असून महाराष्ट्रातले हे प्रमुख खरिफ पीक आहे. जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन पिकाची निवड करतात.
हवामान -
सोयाबीन विविध प्रकारच्या हवामानात घेतले जाऊ शकते. तथापि, शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या कालावधीत कोरड्या हवामानाची आवश्यकता असते. बियाणाची चांगली उगवण होण्यासाठी मातीचे तापमान 15°C पेक्षा जास्त असले पाहिजे आणि पीक वाढीसाठी 26-30°C असले पाहिजे.
जमिनीचा प्रकार -
मध्यम ते भारी जमीन, गाळवट व पाणी धरून ठेवणारी माती निवडावी.
आवश्यक सामू 6.0-7.5 जर सामू 6.0 पेक्षा कमी असेल तर मातीत चुनखडी टाकावी. जर सामू 7.5 पेक्षा जास्त असेल तर मातीत जिप्सम टाकावे.
जमिनीची पूर्व मशागत -
soybean lagwad करण्याच्या आधी 2-3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत करावी. एकरी 10 गाड्या कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर मातीत मिसळून घ्यावे जमिन पेरणीसाठी तयार करून घ्यावी.
पेरणीचा कालावधी -
सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आर्द्रता असल्याची खात्री करुनच करावी.
सुधारित वाण -
वाण |
वैशिष्ट्ये |
केडीएस - 992 (फुले दुर्वा) |
तांबेरा रोग, जांभळे दाणे, जिवाणूजन्य ठिपके मध्यम प्रतिकारक्षम, परिपक्वता कालावधी - 100 ते 105 दिवस दाणे मोठ्या आकाराचे हार्वेस्टर ने काढता येण्यासारखे वाण. |
सोयाबीन गोल्ड - 3344 |
पानांचा पसारा कमी व निमुळते पान, शेतात दाटोळा न झाल्यामुळे बुढापासून शेंड्या पर्यंत शेंगाच शेंगा तब्बल 60 टक्के शेंगा 4 दाण्यांच्या. कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या. |
फुले संगम (के डी एस 726) |
तांबेरा रोगास कमी बळी पडणारा खोडमाशी किडीस, मूळकूज आणि खोडकूज रोगास माध्यम प्रतिकारक परिपक्वता कालावधी 100 ते 105 दिवस तेलाचा उतारा 18.42 टक्के एवढा आहे |
फुले किमया (के डी एस 753) |
परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस तांबेरा रोगास कमी बळी पडतो. |
जेएस 335 |
परिपक्वता कालावधी 95 ते 110 दिवस तांबेरा रोगास प्रतिकारक कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या. |
बियाणे दर -
1. सलग पेरणी साठी: 30 - 35 किलो प्रती एकरी बीज वापरावे.2. टोकन पेरणी साठी: 18 - 20 किलो प्रती एकरी बीज वापरावे.
बीजप्रक्रिया -
मातीमधून किंवा बियाणे मार्फत पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करायचे असल्यास बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या बीजप्रक्रियेपैकी कोणतेही एक बिकप्रकिया करावी.
1. आदाम कंपनीचे तालिहा कीटनाशक 3 मिली + बाविस्टीन बुरशीनाशक 2.5 ग्राम + पाणी 3 ते 5 मिली मिक्स करून प्रति किलो बियाण्यास हलक्या हाताने बीजप्रक्रिया करावी. किंवा2. बाविस्टीन (कार्बेन्डाझिम 50% WP) 2 ग्राम + कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8 % SL) 0.5 मिली प्रति किलो बियाण्यास चोळावे. तत्पूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओले करून घ्यावे. किंवा
3. सोयाबीन सुरक्षा किटचा हि वापर तुम्ही करू शकता. सोयाबीन सुरक्षा किट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा - सोयाबीन सुरक्षा किटचा
रासायनिक बुरशीनाशक आणि कीडनाशकाची बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीमध्ये 1 तास सुकवून नंतर
नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची 5 मिली प्रति किलो बियाण्यास चोळून प्रक्रिया करावी. बीजप्रकिया केल्यानंतर बियाणे सावलीमध्ये सुकवून मगच लागवडी साठी वापरावे. जिवाणूंची बीजप्रक्रिया केल्यामुळे खतामध्ये 25% पर्यंत बचत होते व दिलेली खते पूर्णपणे लागू होते.
लागवड पद्धती -
1. भारी जमिन: दोन ओळीत अंत 45 से.मी. आणि दोन रोपांतील अंतर 5 सें.मी.2. मध्यम जमिन: दोन ओळीत अंतर 30 से.मी. आणि दोन रोपांतील अंतर 10 सें.मी.
3. टोकन पद्धत: 3 फुटी सरी काढून वरंब्याच्या दोन्ही बाजूस टोकन करावी व दोन रोपातील अंतर 1 फूट ठेवावे.
बी.बी.एफ. तंत्रज्ञान -
हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. तसेच सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या 3 ते 4 ओळी 30 सें.मी. किंवा 45 सें.मी. अंतरावर 3 ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी 30 ते 45 सें.मी. गरजेनुसार ठेवता येते.
खत व्यवस्थापन -
सोयाबीन पिकास एकरी 10 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश यांची गरज असते.
1. मातीमध्ये नत्र आणि पालाश हे पुरेसे उपलब्ध असल्यास 200 किलो सिंगर सुपर फॉस्फेट दाणेदार खत एकरी द्यावे.2. मातीमध्ये पालाश हे पुरेसे उपलब्ध असल्यास डी. ए. पी. 50 किलो प्रति एकरी द्यावे.
3. मातीमध्ये नत्र आणि पालाश कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यास 12:32:16 हे खत प्रति एकरी 50 किलो द्यावे.
माती परीक्षांनुसार वरील पैकी कोणतेही एक खत सोयाबीन पिकास पेरणी करताना द्यावे. तसेच सल्फर ग्रॅनुअल्स 4 किलो + ह्यूमिक ग्रॅनुअल्स 4 किलो प्रति एकरी द्यावे.
तण नियंत्रण -
सोयाबीन पेरणीनंतर 20 दिवसांनी तण 2 ते 3 पानांचे असताना आदाम कंपनीचे तणनाशक अजील हे तणनाशक 300 मिली प्रति एकरी फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन -
खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास सोयाबीनला एक किंवा दोन वेळा संरक्षणात्मक पाणी द्यावे. फुलोरा अवस्था व दाणे भरण्याची अवस्थेमध्ये पाणी दयावे.
कीड रोग व्यवस्थापन -
1. खोडमाशी - पहिली फवारणी पीक 20 दिवसांचे असताना बायर सोलोमन 15 मिली आणि पुन्हा 15 दिवसांनी कोराजन 6 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी.2. पाने खाणारी, गुंडाळणारी आणि सुरवंट अळी - धानुका इ एम - 1 हे 8 ग्राम किंवा सुपर डी 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
3. रस शोषक किडी - मावा, थ्रिप्स, पांढरी माशी - धानुका अरेवा हे 8 ग्राम किंवा बायर कॉन्फिडोर 8 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
4. शेंगा पोखरणारी अळी - एफ.एम.सी. कोराजन 6 मिली किंवा बायर बेल्ट एक्स्पर्ट 8 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
5. डावणी मिल्ड्यू - बायर एंट्राकोल 45 ग्राम किंवा यु.पी.एल साफ 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
6. तांबेरा - इंडोफील अवतार 30 ग्राम किंवा टाटा ताकात 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संजीवकाचा वापर -
उत्पादन वाढीसाठी तसेच अवास्थाव कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरोमीक्वाट क्लोराइड २ मिली प्रती पाण्यात पेरणीनंतर ४० दिवसांनी फवारणी करावी.
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न -
1. सोयाबीन पेरणी करताना बियाणे किती खोल पेरावे ?
उत्तर - सोयाबीन पेरणी करताना बियाणे ३ ते ४ सेमी पर्यंत खोल पेरावे. ह्या पेक्षा जास्त खोल पेरल्यास बियाण्याची उगवण होणार नाही.
2. सोयाबीन पेरणी करताना बियाणे किती वापरावे ?
उत्तर - सलग पेरणी साठी: 30 - 35 किलो प्रती एकरी बीज वापरावे. टोकन पेरणी साठी: 18 - 20 किलो प्रती एकरी बीज वापरावे.
3. सोयाबीन पिकास कोणत्या कीडनाशक व बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी ?
उत्तर - आदाम कंपनीचे तालिहा कीटनाशक 3 मिली + बाविस्टीन बुरशीनाशक 2.5 ग्राम + पाणी 3 ते 5 मिली मिक्स करून प्रति किलो बियाण्यास हलक्या हाताने बीजप्रक्रिया करावी.
4. सोयाबीन पिकास कोणत्या अवस्थेत सिंचन करण्याची गरज असते.
उत्तर - फुलोरा अवस्था व दाणे भरण्याची अवस्थेमध्ये पाणी दयावे.
5. सोयाबीन पिकाची जास्त वाढ झाली असल्यास काय करावे ?
उत्तर - कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरोमीक्वाट क्लोराइड २ मिली प्रती पाण्यात पेरणीनंतर ४० दिवसांनी फवारणी करावी.
लेखक,
भारतअॅग्री कृषि एक्स्पर्ट