sitafal lagwad mahiti marathi

Sitafal lagwad mahiti marathi: मिळवा एकरी 120 ते 130 क्विंटल उत्पादन

नमस्कार शेतकरी मित्रानो,  Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे.शेतकरी मित्रानो तुमची जमीन जर कोरडवाहू, हलकी उथळ असेल तर अशा जमिनीमध्ये कोणते पीक घ्यावे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असले तर हा ब्लॉग नक्की शेवट पर्यंत वाचा. कोरडवाहू, हलकी उथळ जमिनीमध्ये तुम्ही सीताफळाची लागवड sitafal lagwad mahiti marathi करू शकता. सीताफळ हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. हे हलक्या, मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे पीक आहे.

सीताफळ लागवड (sitafal lagwad) साठी हवामान स्थिती - 

हवामान स्थितीनुसार वेगवेगळ्या तापमानात तसेच गरम व कोरड्या हवामानात चांगले वाढते. फुलोऱ्याच्यावेळी गरम आणि कोरडे हवामान आणि फळधारणेच्यावेळी जास्त आर्द्रता लागते. कमी आर्द्रता परागीभवन आणि फलनासाठी हानिकारक असते. जास्त वारे आणि भरपूर पाऊस असलेल्या भागात फूल आणि फळ गळ होऊ शकते आणि झाडाचे नुकसान होऊ शकते. तापमान- ढगाळ हवामान आणि  15°C पेक्षा  कमी हवामानात तग धरू शकते. सीताफळीच्या योग्य वाढीसाठी 30 - 40 °C तापमानाची आवश्यकता असते. 

sitafal lagwad साठी आवश्यक जमीन -

सिताफळाची कोणत्‍याही जमिनीत येऊ शकते. अगदी खडकाळ रानापासून ते रेताड जमिनीत सुध्‍दा सिताफळाचे झाड योग्य प्रकारे वाढू शकते. जशी हलक्‍या माळरानात सिताफळाची वाढ चांगली होते, तशीच शेवाळयुक्‍त जमिनीत गाळमिश्रीत जमिनीत, लाल जमिनीत तसेच अगदी विस्‍तृत प्रकारच्‍या जमिनीतही वाढतात. मात्र भारी, काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्‍कलीयुक्‍त जमिनी या फळझाडाला अयोग्‍य ठरते.

जातींची निवड -

वाण

खास वैशिष्ट्य

उत्पादन

बालानगर

जास्त उत्पादन देणारे वाण चांगल्या दर्जाचे फळ, मोठ्या आकाराचे फळ आणि भरपूर गोड गर. 

100-108 क्विन्टल/एकर

अनोना-2

जास्त वजन, उशीरा परिपक्वता (5-7 महिने), चांगली टिकवणक्षमता, जास्त पिकल्यामुळे होणारे नुकसान कमी. प्रती फळ कमी बिया, इतर वाणांपेक्षा गराचे प्रमाण जास्त (70-75%), शर्करा टक्केवारी 28-30%, मऊ आणि गोड गर, गार आणि बिया सहजपणे वेगळ्या करतात येतात. त्यामुळे खाताना होणारा त्रास कमी. 

72 क्विन्टल/एकर

अरका सहन (संकरीत)

दुष्काळाला प्रतिकारक्षम. साल मेणचट, पोपटी रंगाची, मध्यम जाड (0.5 सेमी), मोठे, चपटे डोळे, एकूण साखर 22.8% आणि 30 ब्रिक्सपेक्षा जास्त असल्यामुळे खाण्यायोग्य गार लक्षणीयरीत्या  गोड  असतो. 

41-43 क्विन्टल/एकर

फुले जानकी

संकरीत, जास्त टिकवणक्षमता आणि जास्त उत्पादन देणारे वाण, कमी चिकट गर, साखर आणि आम्ल यांचे अधिक चांगले मिश्रण असलेला वाण. मोठी फळे

(108 क्विन्टल/एकर)

सुपर गोल्डन 

भरपूर गर, बियांची संख्या 15 ते 20, साखरेचे प्रमाण 22 ते 24 टक्के, गराचे प्रमाण 70 ते 75 टक्के, फळांचा आकार बाळानगरीच्या तुलनेत मोठा, वजन 300 ते 1000 ग्रॅमची,  वाण दिसायला देखणा, डोळे मोठे, रंग सोनेरी पिवळा आकर्षक, टिकवण क्षमता जास्त, फळाला आजिबात तडे जात नाहीत. 

120-130 क्विन्टल/एकर


 

सीताफळाच्या झाडांची लागवड कशी करावी ?

सीताफळाच्या लागवडीसाठी sitafal lagwad marathi जमीन चांगली नांगरून, ढेकळे फोडून घ्यावी व कुळवून उन्हामध्ये तापवुन घ्यावे. नंतर पावसाळ्यापूर्वी  मुरमाड व हलक्या जमिनीत दोन ओळीतील अंतर 12 फूट आणि दोन रोपातील अंतर 8 फूट ठेवून या अंतरावर 30 × 30 आकारमानाचे खड्डे घ्यावेत प्रत्येक खड्ड्यात एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 - 60 ग्राम दाणेदार कार्बोफुरोन यांचे मिश्रण टाकावे सोबत शेणखत 3 ते 5 किलो टाकावे त्याच्या वापरामुळे सिताफळाच्या वाढीस मदत होते. सिताफळाची लागवड करताना पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये कलमे अगर रोपे लावावीत. रोपे लावताना खड्याच्या मध्यभागी लावावीत तसेच माती हाताने दाबून काठीचा आधार देउन बांधावी व पाऊस नसेल तर लगेच पाणी द्यावे.

सीताफळ लागवड (sitafal lagwad) मधील आंतरपीके -

पहिल्या 2 वर्षांपर्यंत कांदे, मूग, चवळी आणि सोयाबीन अशा कमी उंचीच्या पिकांची यशस्वीपणे लागवड करता येते. काकडीवर्गीय पिके आणि ज्वारी, मका यासारखी पिके टाळावीत. आंतरपिकांमुळे जमिनीचा कस कायम राहून जमीन संपूर्ण झाकली जाऊन तणांचे नियंत्रण होते.

पाणी व्यवस्थापन -

सिताफळाच्या झाडांस जास्त पाण्याची आवश्यकता नसते कारण सिताफळ निसर्गतःच काटक फळझाड असल्‍याने वरच्‍या पाण्‍याशिवाय वाढू शकते. फळाची सेटिंग झाल्यानंतर ती फळे पक्क होण्याच्या अवस्थेत एक दोन वेळेस पाणी द्यावे म्हणजे फळाचा आकार व दर्जा वाढतो. पावसाचा ताण जास्त पडल्यास 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे. सिताफळाच्‍या पिकाला नियमित पाण्‍याची आवश्‍यकता नसते. निव्‍वळ पावसाच्‍या पाण्‍यावरही चांगले उत्‍पन्‍न येऊ शकते मात्र झाडाला पहिले 3 ते 4 वर्ष उन्‍हाळयात पाणी दिल्‍यास झाडांची वाढ चांगली होते. त्‍याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारपणे सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात पाण्‍याच्‍या 1 ते 2 पाळया दिल्‍यास भरपूर व मोठी फळे मिळतात.

सीताफळ लागवड (sitafal lagwad) खत व्यवस्थापन -

पहिले वर्ष - 

शेणखत- 10 किग्रॅ +  50:25:25 एन:पी:के ग्रॅम/रोप.

युरिया-  100 ग्रॅम

सिंगल सुपर फॉस्फेट - 150 ग्रॅम

म्युरेट ऑफ पोटॅश- 50 ग्रॅम

दुसरे वर्ष - 

शेणखत- 20 किग्रॅ +  100:50:50 एन:पी:के ग्रॅम/रोप.

युरिया-  150 ग्रॅम

डी.ए.पी.  - 100 ग्रॅम

म्युरेट ऑफ पोटॅश- 100 ग्रॅम

तिसरे वर्ष -

शेणखत- 30 किग्रॅ +  150:75:75 एन:पी:के ग्रॅम/रोप.

युरिया-  200 ग्रॅम

डी.ए.पी. - 150  ग्रॅम

म्युरेट ऑफ पोटॅश- 100 ग्रॅम

चौथे वर्ष -

शेणखत- 40 किग्रॅ +  200:100:100 एन:पी:के ग्रॅम/रोप.

युरिया-  300 ग्रॅम

डी.ए.पी. - 200 ग्रॅम

म्युरेट ऑफ पोटॅश- 175 ग्रॅम

पाचव्या वर्षापासून पुढे  - 

शेणखत- 50 किग्रॅ +  250:125:125 एन:पी:के ग्रॅम/रोप.

युरिया-  400 ग्रॅम

डी.ए.पी. - 250 ग्रॅम

म्युरेट ऑफ पोटॅश- 205 ग्रॅम

( टीप: वरील संपूर्ण शेणखत (NPK बॅक्टरीयासह) पावसाळ्याच्या सुरुवातीला घालावे. पहिल्या पावसानंतर नत्राची अर्धी मात्र आणि स्फुरद तसेच पालाशची पूर्ण मात्र द्यावी आणि एनपीकेची उरलेली अर्धी मात्रा 1 महिन्यानंतर किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत द्यावी. )

झाडास वळण देणे -

लागवड केल्यानंतर झाडास योग्य आकार येण्यासाठी तसेच फांद्या जमिनीला टेकू नये म्हणून मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून ३ फुटांपर्यंत पर्यंत वरचेवर काढाव्यात. त्याच्यावर चारही दिशांना फांद्या विखुरलेल्या राहतील असे वळण द्यावे.

बहार व्यवस्थापन -

अधिक उत्पादन मिळावे म्हणून बहराचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असते. नैसर्गिक बहर हा जून महिन्यात येतो. परंतु ह्या वेळी बाजार भाव व्यवस्थित भेटत नाही म्हणून पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळाच्या सुरुवातीस बहर धरता येतो. उन्हाळी बहराची फळे जुलै ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने बाजारभाव चांगला मिळून अधिक आर्थिक नफा मिळतो.

उन्हाळी बहारामध्ये दुबार छाटणी -

बहाराचे पाणी सुरू करण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर पहिली छाटणी केली जाते. उन्हाळी बहाराचे पाणी जानेवारी ते मे मध्ये सुरू करण्यात येते. जून 25 ते 27 नंतर झाडांवर फळे असताना दुसरी छाटणी करावी. त्यानंतर झाडांना 8 ते 10 दिवसांत पालवी येते आणि ह्या पालवीमधूनच नवीन फुलांची निर्मिती होते. सदरची फळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत काढणीस येतात व एकाच झाडापासून दोनदा फळे घेणे शक्य होते. फळे साधारण सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी करावी. विरळणी करताना चांगल्या आकारमानाची फळे ठेवावीत. वेडीवाकडी, कीड व रोगग्रस्त फळांची विरळणी करावी. 

रोग कीड व्यवस्थापन -

सीताफळास जास्त करून फळकूज या रोगाचा आणि पिठ्याढेकुन आणि फळमाशी या किडींचा जास्त प्रादुर्भाव होतो. फळकूज रोगास साफ या बुरशीनाशकाची 2 ग्राम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. पिठ्याढेकुन नियंत्रणासाठी सुपर डी - 2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. फळमाशीच्या नियंत्रसाठी कामगंध सापळे प्रति एकरी 5 लावावेत. 

फळाची काढणी -

सिताफळामध्‍ये डोळे उघडणे ही क्रिया पूर्ण झाल्यावर काढणी करावी. सिताफळाची कलमे केलेल्‍या झाडांना फळे 3 ते 4 वर्षात येण्यास सुरुवात होते. सिताफळांच्‍या झाडांना जून, जूलै मध्‍ये फूले येण्‍यास सुरुवात होते. फूले आल्‍यावर फळे तयार होण्‍यास सर्वसाधारणपणे 5 महिन्‍यांचा कालावधी लागतो. फळे सप्‍टेबर ते नोव्‍हेबर मध्‍ये तयार होतात.

सीताफळ लागवड (sitafal lagwad) मधून उत्पादन किती मिळते ?

पाचव्या वर्षांपासून प्रति झाड 25 - 30 किलो उत्पादन भेटते. 

Conclusion | सारांश -

सुधारित सीताफळ लागवडीचे नियोजन कसे करावे ? लागवडीसाठी कोणत्या जातीची निवड करावी तसेच अधिक उत्पादनासाठी जातीची निवडीसोबतच खत, कीड व रोगाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होईल. आशा करतो की Bharatagri krsuhi Dukan वेबसाइट वरील आमचा आजचा “सुधारित सीताफळ लागवड  (sitafal lagwad mahiti marathi)” हा लेख तुम्हाला आवडला असेल तर याला तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.

FAQ । सतत विचारले जाणारे प्रश्न -

1. सीताफळाची लागवड करायची असल्यास कोणती जात लावावी ?

उत्तर - सीताफळ लागवड करायची असल्यास सध्या गोल्डन सुपर या सुधारित जातीची लागवड करावी. 


2. सीताफळाची लागवड किती अंतरावर करावी ?

उत्तर - दोन ओळीतील अंतर 12 फूट आणि दोन रोपातील अंतर 8 फूट ठेवल्यास 460 झाडाची प्रति एकर लागवड करू शकतो. 


3. सीताफळीच्या बागेमध्ये अंतरपीक घेऊ शकतो का ?

उत्तर - हो, पहिल्या 2 वर्षांपर्यंत कांदे, मूग, चवळी आणि सोयाबीन अशा कमी उंचीच्या पिकांचे अंतरपीक घेऊ शकतो. 


4. सीताफळीचा बहराचे पहिले पाणी कधी दयावे ? 

उत्तर - सीताफळीस जास्त बाजारभाव मिळावा म्हणून हराचे पहिले पाणी फेब्रुवारी ते मे महिन्यामध्ये दयावे. 


5. सीताफळीपासून किती उत्पादन भेटते. 

उत्तर - पाचव्या वर्षांपासून प्रति झाड 25 - 30 किलो उत्पादन भेटते. 



लेखक,

भारतअ‍ॅग्री कृषि एक्स्पर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी