मिरची पिकातील चुरडा मूरडा नियंत्रण | Control Leaf Curl of Chili Crop

मिरची पिकातील चुरडा मूरडा नियंत्रण | Control Leaf Curl of Chili Crop

मिरची हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भाजीपाला तसेच मसाल्याचे पीक आहे. महाराष्ट्रात बहुतेक भागात मुख्यत्वेकरून औरंगाबाद, सातारा, पुणे, धुळे, इ. जिल्ह्यांमध्ये मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात होते.  मिरची उत्पादक शेतकरी नेहमी एका समस्येने ग्रस्त असतात ती म्हणजे मिरची पिकावर होणारा लिफ कर्ल व्हायरसचा अटॅक! या रोगाला महाराष्ट्रातील विविध भागात विविध नावांनी ओळखले जाते जसे की, चुरडा - मुरडा, घुबड्या, बोकड्या इत्यादी.

चुरडा - मुरडा रोगाचा प्रसार: spreading of leaf curl disease

या रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा, पांढरी माशी ,फुलकिडे, तुडतुडे इत्यादी रसशोषक किडीमार्फत होतो. जेव्हा या किडींचा प्रादुर्भाव मिरचीच्या पिकावर होतो तेव्हा विषाणू रसासोबत कीडीच्या शरीरात प्रवेश करतो. पुढे निरोगी मिरचीवर बसून कीड रस शोषण करताना हा विषाणू निरोगी झाडांमध्ये प्रवेश करतो.

चुरडा -मुरडा रोगाची लक्षणे: Symptoms of leaf curl disease

 • रोगामुळे पानाची टोके आणि कडा सुरूवातीस वरच्या बाजूस वळतात. म्हणजे पाने वेडी वाकडी होऊन कुरूळी होतात. 
 • नवीन येणारी पाने आकाराने लहान राहतात. 
 • रोगट झाडाच्या पानावरील शिरा निरोगी झाडापेक्षा फुगीर-जाड होतात. 
 • झाडांची वाढ खुंटते. 
 • रोगट झाडास क्वचितच फुले लागतात. 
 • फळ धारणा कमी होते. 
 • रोगाची तीव्रता वाढल्यास झाडावरील सर्व पाने कुरूळी होऊन चुरगळल्यासारखी किंवा मुरडल्यासारखी वाटतात. 

मिरची पिकातील चुरडा -मुरडा नियंत्रण : Management of leaf curl disease

 • मिरची लागवड करण्यापूर्वी वापरण्यात येणारे बियाणे सर्वोत्तम असल्याची खात्री करावी.
 • रोपवाटिकेमध्ये बाहेरील रस शोषक किडी येऊ नयेत म्हणून रोपवाटिकेच्या चारी बाजूने नेट किंवा कपडा बांधावा.
 • पुनर्लागवडीसाठी रोपे घरीच तयार करावीत. रोपवाटिकेतून रोपे आणणे शक्यतो टाळावे.
 • मिरची पिकामध्ये तण काढून स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे.
 • लागवडीकरीता प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते.
 • शिफारसीनुसार अन्नद्रव्यांचा वापर करावा. जेणेकरून रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही.
 • शेताच्या चारही बाजूला किंवा मिरची पिकामध्ये तीन ओळींनंतर मका, ज्वारी, चवळी इत्यादी सापळा पिकांची लागवड करावी.
 • रोपवाटिका तयार करताना बियाणे टाकायच्या वेळेस बीजप्रक्रिया केली नसेल तर रोप उगवल्यानंतर नीम तेल २० मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे.
 • लागवडीवेळी कॉन्फिडोर (Confidor) इमिडाकलोप्रीड १ मीली + धानुस्टिन (Dhanustin) कार्बेंडझिम २ ग्रॅम  प्रती लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे बुडवून नंतर लागवड करावी
 • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून जाळून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी रोपांना रोगाची लागण होणार नाही.
 • पांढरीमाशीच्या नियंत्रणासाठी (SK Agro Sticky Trap) पिवळे चिकट सापळे १३ आणि फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे १२ प्रति एकरी लावावेत. 
 • व्हर्टीसिलियम लेक्यानि (verticillium lecanii) किंवा मेटारायझिम ऍनिसोपली (metarhizium anisopliae) या जैविक कीटकनाशकाची 3 मिली प्रती लिटर पाण्यामधून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.
 • दोन फवारणी दरम्यान 8 ते 12 दिवसांचे अंतर ठेवावे. एकाच प्रकारचे कीटकनाशके वापरू नयेत.
 • कोणत्याही रसायनाची फवारणी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
 • चुरडा मुरडा (leaf curl of chilli) रोगाची लक्षणे दिसू लागताच खालील कीटनाशकांची प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

कीडनाशक

कीड

प्रमाण

धनप्रीत (Dhanpreet - Acetamiprid 20% SP) 

फुलकिडे, मावा, पांढरीमाशी

8 ग्रॅम / पंप

कॉन्फिडोर (Confidor - Imidacloprid 17.8% SL)

फुलकिडे, मावा, पांढरीमाशी

8 मिली / पंप 

इ.एम. 1 (Em 1 - Emamectin Benzoate 5 sg)

फुलकिडे, कोळी

8 ग्रॅम / पंप

फॅक्स (Fax - Fipronil 5% SC)

फुलकिडे, मावा

30 मिली / पंप 

बेनेव्हिया (Benevia - Cyantraniliprole 10.26 % OD)

फुलकिडे, मावा, पांढरीमाशी

18 मिली / पंप 

लार्गो (Largo - Spinetoram 11.7% SC)

फुलकिडे

15 मिली / पंप 


अशा पद्धतीने एकात्मिक चुरडा मुरडा रोगाचे (churda murda) नियंत्रण केल्यास अपेक्षित उत्पादन भेटू शकते.
होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी