kapus lagwad

kapus lagwad: कापूस लागवड तंत्रज्ञान आणि मिळवा एकरी 15 क्विंटल उत्पादन

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi kandu च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखामध्ये आपण कापूस लागवड माहिती kapus lagwad माहिती बघणार आहोत. कापूस हे नगदी पिकामध्ये महत्वाचे असून याला पांढरे सोने असे हि म्हणले जाते. कृषिप्रधान देश असलेल्या आपल्या भारत देशात कापसाचे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापुस हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात महत्त्वाचे पीक मानले जाते. मराठवाडा, विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगदी पिक म्हणून कापूस लागवडीकडे कल वाढल्याचे दिसून येते

 

हवामान 

कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी 20-30°C इतक्या तापमानाची आवश्यकता असते. जर तापमान 18°C पेक्षा कमी असल्यास बियाणाची उगवण उशिरा होते. मातीत पुरेसा ओलावा असल्यास, कापसाचे पीक 43-45°C उच्च तापमान थोड्या कालावधीसाठी  सहन करू शकते.

जमीन 

काळी कसदार पाणी धरून ठेवणारी जमीन निवडावी. मातीत जास्त प्रमाणात ओलावा व जमीन पाणथळ असल्यास त्याचा कापसाच्या पिकावर परिणाम होतो. आवश्यक सामू - 7.0-8, जर सामू 7.0 पेक्षा कमी असल्यास तर मातीत चुनखडी मिसळावी. जर सामू 8.5 पेक्षा जास्त  असल्यास तर मातीत जिप्सम मिसळावे. 


जमिनीची मशागत 

जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू पिकासाठी एकरी ३ टन आणि बागायती लागवडीसाठी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात सम प्रमाणात पसरून टाकावे. गांडूळ खत उपलब्ध असल्यास प्रति एकरी १ टन शेणखत/ कंपोस्ट खतासोबत मिसळून द्यावे. शेणखत देताना प्रति टनामागे १ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी आणि १ किलो मेटारिज़ियम अनिसोप्लिया मिसळावे जेणेकरून जमिनीतून कीड व रोगाचा पप्रधुरभाव होणार नाही. 


पेरणी 

पेरणीच्या योग्य कालावधी हा जूनचा पहिला आठवडा समजला जातो. या कालावधी लागवड केल्यास कीड व रोगाचे प्रमाण कमी होते. 


कापसाचे वाण 

कापूस पिकाचे अधिक चांगले उत्पादन घेयचे असेल तर राशी ६५९ (राशी सीड्स), कब्बडी (तुलसी सीड्स), सुपरकोट (प्रभात सीड्स) आणि  यु.एस. ७०६७ ( यु.एस. ऍग्रीसीड्स) या वाणांची निवड करावी.

एकरी बियाणे

👉संकरित वाणाचे एकरी 800-900  ग्रॅम बियाणे लागते. 

बीजप्रक्रिया 

कापूस पेरणी करत असताना बीजप्रक्रिया करणे महत्वाचे आहे. यासाठी प्रति किलो बियाण्यास आदाम कंपनीचे तालिहा कीटनाशक १० मिली + बाविस्टीन बुरशीनाशक २.५ ग्राम + पाणी १० मिली मिक्स करून हलक्या हाताने बीजप्रक्रिया करावी. जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया करायची असल्यास डॉ. बॅक्टोज डर्मस (ट्राइकोडर्मा विरिडी) १० मिली प्रति किलो बियाण्यास चोळावे.  

 

रोपातील अंतर व रोपांची संख्या

प्रकार

दोन ओळीतील अंतर (फुट)

दोन रोपांतील अंतर (फुट)

एकरी झाडांची संख्या

कोरडवाहू 

1.5 

7400

बागायती 

5

2

4440 

 

 

रासायनिक खत व्यवस्थापन

👉संकरित वाण (प्रति एकर) - खतांची मात्रा - प्रति एकर 32 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश द्यावे. 

👉 लागवड  करतेवेळी -  युरिया - 25 किलो,  डी ए पी - 50 किलो,  म्यूरेट ऑफ़ पोटॅश - 50 किलो + नीम केक 100 किलो + मायक्रोनुट्रीएंट खत 10 किलो + मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो + बोरॉन 1 किलो मिसळून द्यावे. 

👉लागवडीनंतर 30 दिवसांनी युरिया- 20 किलो + 10:26:26 - 25 किलो 

👉लागवडीनंतर 45 दिवसांनी युरिया- 15 किलो + 10:26:26 - 25 किलो 

(नोट -खते देताना मातीपरीक्षांनुसार दिल्यास उत्पादनामध्ये वाढ व खर्चामध्ये बचत होईल.


पाणी व्यवस्थापन 

👉 पाटपाण्याने पाणी देताना 10-12 दिवसांच्या अंतराने द्यावे (पावसावर अवलंबून)
👉 फुले उमलणे, बोंडे धरणे व भरणे या महत्त्वाच्या अवस्था असून या अवस्थांच्या काळात वेळच्या वेळी देणे जरुरीचे आहे. 

    तण व्यवस्थापन 

    फवारणीची वेळ

    पध्दत 

    तणनाशकाचे नाव 

    तणनाशकाचे प्रमाण

    लागवडीनंतर 3  दिवसांनी 

    फवारणी

    पेंडीमिथॅलीन

    1 लिटर प्रति एकर

    किंवा 

    लागवडीनंतर 25  दिवसांनी तण ३ पानाचे असताना 

    फवारणी

    पायरिथिओबॅक सोडियम ६ % + क्विझलोफोफ इथाइल ४% EC  

    450 मिली  प्रति एकर



    पीक संजीवके 

    फुलांची व बोंडाची गळ थांबण्यासाठी प्लॅनोफीक्स ( नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड ) 45 मिली प्रति 200 लिटर पाण्यात मिसळवून ह्या मिश्रणाची फवारणी फुले येण्याच्या वेळी करावी. दुसरी फवारणी त्यानंतर 15-20 दिवसांनी करावी.

     

    कीड रोग नियंत्रण 

    कापूस पिकामध्ये जास्त करून रस शोषक किडी जसे कि पांढरी माशी, तुडतुडे, मावा, फुलकिडे याशिवाय बोंड अळीचा प्रधुरभाव होतो.  बुरशीजन्य रोगामध्ये मर रोग, पानावरील बुरशीजन्य ठिपके, करपा या रोगांचा प्रधुरभाव होतो. या सर्व कीड व रोगाचे नियंत्रण प्रतिबंधात्मक रासायनिक आणि जैविक पद्धतीने कसे करावे, कोणते कीडनाशक व बुरशीनाशक किती प्रमाणामध्ये वापरावे या बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा > कापूस कीड व रोग नियोजन. 


    वेचणी

    👉वेचणीची वेळ: लागवडीनंतर 130 ते 180 दिवसांनी
    👉कापसाची वेचणी  वेळा होते.
    👉दोन वेचणीतील अंतर - 15 दिवस


      उत्पादन 

      👉प्रत्येक वेचणीचे उत्पादन : 3 ते 4 क्विंटल प्रति एकर
      👉संपूर्ण उत्पादन : 12-15 क्विंटल प्रति एकर

        सारांश 

        कापूस पिकाचे अधिक उत्पादन घ्यावयाचे असल्यास जमिनीची मशागती पासून काढणी पर्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास नक्कीच जास्तीत जास्त उत्पादन घेता येइल. शेतकरी मित्रांनो तुम्हाला BharatAgri Krushi Dukan वेबसाइट वरील आमचा कापूस लागवडी विषयी संपूर्ण माहिती kapus lagwad हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेन्ट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. 


        FAQ । प्रश्नउत्तरे 

        1. कापसाची लागवड कधी करावी ?

        उत्तर - कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. तर कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी. 

        2. कापूस पेरणीसाठी नोकरी किती बियाणे वापरावे ?

        उत्तर - संकरित वाणाचे एकरी 800-900  ग्रॅम बियाणे लागते म्हणजेच २ पाऊच (बॅग) प्रति नोकरी पेराव्यात. 

        3. कापूस बियाण्यास कोणती बीजप्रक्रिया करावी ?

        उत्तर - प्रति किलो बियाण्यास आदाम कंपनीचे तालिहा कीटनाशक १० मिली + बाविस्टीन बुरशीनाशक २.५ ग्राम + पाणी १० मिली मिक्स करून हलक्या हाताने बीजप्रक्रिया करावी.

        4.  कापूस पिकातील तण नियंत्रसाठी कोणते तणनाशक वापरावे ?

        उत्तर - तण २ ते ३ पानाचे असताना पायरिथिओबॅक सोडियम ६ % + क्विझलोफोफ इथाइल ४% EC  ४५० मिली प्रति एकरी फवारणी करावी. 

        5. फुलांची व बीडची गाळ होत असल्यास काय करावे ?

        उत्तर - फुलांची व बोंडाची गळ थांबण्यासाठी प्लॅनोफीक्स ( नॅपथॅलीक ऍसिटिक ऍसिड )  ४५ मिली प्रति २०० लिटर पाण्यात मिसळवून फवारणी फुले येण्याच्या वेळी करावी.


        लेखक 

        भारतअ‍ॅग्री कृषि एक्स्पर्ट


        होम

        वीडियो कॉल

        VIP

        फसल जानकारी

        केटेगरी