control oil disease in pomegranate crop

dhanucop देईल डाळिंब पिकाला तेल्या रोगापासून मुक्ती

नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण डाळिंब पिकातील तेल्या म्हणजेच Bacterial Blight या रोगाबाबद्दल माहिती घेणार आहोत. डाळिंब पीक हे मुरमाड जमीन व कमी पावसाच्या प्रदेशात चांगल्या प्रकारे येते. काळी पाणी धरून ठेवणारी जमीन तसेच जास्त आद्रता युक्त हवामान पिकास पोषक नसते म्हणूनच  तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो. आजच्या लेखामध्ये आपण तेल्या रोगाचे प्रतिबंधात्मक नियंत्रण करणाऱ्या धानुका कंपनीचे धानुकोप dhanucop fungicide या बुरशीनाशक बद्दल जाणून घेणार आहोत. 

डाळिंब पिकातील तेल्या हा Xanthomonas axonopodis या जिवाणूमुळे रोग होतो. हा रोग पाने, फुले, फळ, फांदी आणि खोड याचे नुकसान करतो. 

रोगाची लक्षणे : 

 1. प्रथमावस्थेत रोगाचे डाग हे तेलकट, अनियमित, लंबगोलाकार तसेच एकमेकात मिसळत असलेले मध्यभागी काळसर पडलेले आढळून येतात. 
 2. फळांवर लहान डाग एकत्र आले की मोठ्या डागात रूपांतर होते. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात. 
 3. फळावर डाग पडल्यामुळे त्यांची प्रत पुर्णपणे खराब होते परिणामी फळांना बाजारभाव मिळत नाही.
 4. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने पिवळी पडून गळून पडतात.
 5. खोडावर पडणारा डाग खोलवर गेल्यास खाच तयार होते आणि तेथून झाड मोडते. तसेच फांद्यांवर डागांची तीव्रता वाढल्यावर फांद्या डागा पासून मोडतात
 6. रोगामुळे ३० ते ५० % नुकसान होते, परंतु वाढीस पोषक वातावरण असताना अतिरोगग्रस्त बागेत ८० ते १०० % नुकसान होऊ शकते.

तेल्या रोगाचे प्रतिबंधात्मक नियंत्रण | dalimb telya rog niyantran | डाळिंब तेल्या रोग उपाय

धनुकोप (कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यूपी) dhanucop 50 wp हे तांब्रयुक्त ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे. हे बुरशीजन्य तसेच जीवाणूजन्य रोगांचे त्याच्या स्पर्शजन्य कृतीद्वारे नियंत्रित करते. हे इतर बुरशीनाशकांना प्रतिरोधक झालेल्या बुरशीचे प्रभावीपणे नियंत्रण करते. सूक्ष्म कणांमुळे ते पानांना चिकटून राहते आणि बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करते. 

वैशिष्ठ्ये आणि फायदे 

 1. धानुकॉप कमी विद्राव्यतेमुळे हळूहळू तांबे आयन सोडतात, त्यामुळे दीर्घ काळासाठी रोगावर नियंत्रण ठेवते. 
 2. पानांना जाडपणा देते आणि पिकाला तांब्याचे पोषण प्रदान करते.
 3. गारपीट/पावसाच्या वेळी सर्वात जास्त फवारले जाणारे बुरशीनाशक. 
 4. नैसर्गिक संयुग असल्याने, प्राण्यांसाठी सुरक्षित.

प्रोडक्ट 

धानुकोप 

कंपनी 

धानुका 

घटक 

कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % WP

रोग नियंत्रण 

जिवाणूजन्य पानावरील ठिपके, जिवाणूजन्य मर, करपा, डाउनी मिल्ड्यू, फळ सड, 

प्रमाण sixer fungicide dose

४५ ग्राम प्रति १५ लिटर पंप 

पिके 

डाळिंब, टोमॅटो, मिरची, केळी, द्राक्ष आणि लिंबू वर्गीय पिके

कार्य

स्पर्शजन्य बुरशीनाशक 

किंमत dhanucop 50 wp price

५०० ग्राम - ६०० रुपये

 

फवारणी करताना घ्यावयाची काळजी : 

 1. औषध फवारणीपूर्वी बागेतील झाडांची स्थिती औषध शोषून घेण्याची क्षमता असल्याची खात्री करवी. अन्यथा फवारलेली औषधे जमिनीवर पडून वाया जाण्याची शक्यता असते.
 2. फवारणी करताना पंप किंवा टॅंक मध्ये स्टिकर आवश्य मिसळावा. 
 3. तेल्या नियंत्रणासाठी फवारणी करताना फवारणी मध्ये जिवाणूनाशक उदा. स्ट्रेप्टोमायसिन, कासुगामाइसिन इ.  मिसळावे.   

 


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी