शेतकरी मित्रांनो, Bharatagri Krushi Dukan च्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण soybean fertilizer management कोणकोणत्या अवस्थेनुसार दिले पाहिजेत आणि विद्राव्य खते कसे द्यावीत याबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये चर्चा करणार आहोत.
सोयाबीन बद्दल थोडक्यात माहिती -
महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरीप हंगामातील महत्वाचे पीक असून महाराष्ट्राचा भारतामध्ये सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या क्रमांक लागतो. आता अलीकडच्या सिंचित क्षेत्रात उन्हळ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकवले जाते. पेरणी करताना soybean fertilizer management व्यवस्थित असेल तर आपण अधिक उत्पादनाचा टप्पा गाठू शकता.
खत व्यवस्थापन -
खालील मुद्द्या मध्ये soybean khat niyojan बद्दल माहिती दिलेली आहे.
1. सेंद्रिय खते -
सोयाबीन पेरणीच्या महिनाभरापूर्वी जमले तर शेतात 10 ते 12 टन उत्कृष्ट सडलेले शेणखत मातीत रोटाव्हेटरच्या मदतीने मिसळून घ्या. जर आपल्या जमिनीत हुमणी, वाळवी किडींचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होत असेल तर शेणखत पसरल्यानंतर त्या खतावर रोटाव्हेटर मारण्यापूर्वी biological fungicide बॅक्टो डर्मेस डॉ (ट्रायकोडर्मा विरीडी) 2 लिटर +बॅक्टो मेटा डॉ (मेटारायाझियम अॅनिसोप्लिया) 2 लिटर 200 लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास सोयाबीन पीच्यामध्ये कीड आणि रोगांचे चांगले नियंत्रण मिळते.
2. रासायनिक खते -
खालील चार्टमध्ये बेसल डोस म्हणजेच पेरणी किंवा सरी पडण्यापूर्वीचे nutrient management in soybean याची माहिती दिली आहे.
खताचे नाव |
प्रमाण / एकर |
यूरिया(N) |
10 किग्रॅ |
फॉस्फरस(SSP) |
110 किग्रॅ |
पोटॅश(MOP) |
10 किग्रॅ |
ल्फर 90%(S) |
3 किग्रॅ |
कार्बोफ्युरॉन |
5 किग्रॅ |
30 दिवसानंतर पुन्हा एक हलकासा डोस करावा त्यामध्ये पहिले असता पोटॅश(MOP) 10 किग्रॅ+फेरस सल्फेट 8 किग्रॅ+मैग्नीशियम सल्फेट 10 किग्रॅ/ एकर. किंवा आपण मिश्र खतामध्ये पेरणी यंत्रा बरोबर 24:24:00:8 - 75 किग्रॅ/ एकर खताची पेरणी करू शकता.
3. विद्राव्य खते -
खलील चार्ट मध्ये soybean khat vyavasthapan मध्ये विद्राव्य खाता बद्दल माहिती दिली गेलेली आहे.
पिकाची अवस्था |
खताचे नाव |
डोस/ड्रीप/एकर |
वाढीच्या अवस्थेत |
5 किग्रॅ |
|
फुटवा वाढण्यासाठी |
5 किग्रॅ |
|
फळधारणा व फळधारणा |
5 किग्रॅ 5 किग्रॅ |
|
शेंगा चा आकार आणि परिपक्वता |
5 किग्रॅ 5 किग्रॅ |
वरील चार्टमध्ये दिलेले सोयाबीन खत नियोजन आपण वरखते कमी वापरत असाल किंवा ड्रिप नसेल तर फवारणीद्वारे सुद्धा वापरू शकता. 75 ते 100 ग्रॅम/ 15 लिटर.
सूचना | Note -
सोयाबीन पिकासाठी सिंचित क्षेत्र असेल सोयाबीन पेरणी खत व्यवस्थापन केल्या नंतर टाकलेली खते पिकाला अधिक चांगल्या पद्धतीने लागू होण्यासाठी आपण डॉ. बॅक्टोज कॉम्बो NPK(एन पी के) बॅक्टेरिया - 2 लिटर + काळा गूळ 2 किलो 1 दिवस चांगले भिजवून दुसऱ्या दिवशी ड्रिप किंवा पाठ पाण्या द्वारे सोडावे. त्यामुळे आपल्या जमिनीत बॅक्टेरियाची संख्या वाढून सेंद्रिय कर्ब सुधारण्यास मदत होईल.
Conclusion | सारंश -
शेतकरी मित्रांनो, आजचा soybean fertilizer management लेख तुम्हाला कसा वाटला? कृपया कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि शेतीशी संबंधित इतर कोणतीही माहिती वाचण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आमच्या भारतऍग्री कृषी दुकानाच्या वेबसाईटशी कनेक्ट रहा. पुढच्या वेळी भेटूया नवीन विषय आणि माहितीसह, तोपर्यंत - धन्यवाद.
शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न | People also ask -
1. सोयाबीन साठी कोणते खत वापरावे?
उत्तर - युरिया (N) 10 kg + फॉस्फरस (SSP) 110 kg + पोटॅश (MOP) 10 kg + सल्फर 90% (S) 3 kg + कार्बोफ्युरॉन 5 kg/ एकर.
2. सोयाबीन साठी एकरी किती पेरावे?
उत्तर - सोयाबीनसाठी 24:24:00:8 - तुम्ही 75 किग्रॅ/एकर खत पेरू शकता.
3. सोयाबीनसाठी प्रति एकर किती शेणखत वापरावे?
उत्तर - 10 ते 12 टन/एकर खत वापरावे.
4. सोयाबीन वाढण्यासाठी कोणते पोषक तत्व आवश्यक आहेत?
सोयाबीन वाढवण्यासाठी 19:19:19- 75 te 100 ग्रॅम/ 15 लिटरमध्ये मिक्स करून फवारणी करावी.
5. सोयाबीनसाठी युरिया चांगला आहे का?
सोयाबीनसाठी 10 ते 15 किग्रॅ पेक्षा जास्त यूरिया वापरू नये.
पण एकदा वाचा | People also read -
1. earthing up in sugarcane: ऊस बाळ भरणी आणि मोठी बांधणी खत व्यवस्थापन
2. turmeric seed storage: हळद साठवणूक कशी करावी?
3. sugarcane fertilizer schedule: ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन
4. score syngenta: स्कोर बूरशीनाशकाची संपूर्ण माहिती
5. सोयाबीन सुधारित वाण | सोयाबीन सुधारित जाती | best variety of soybean
लेखक | Author
BharatAgri Krushi Doctor