नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण डाळिंब पिकातील तेल्या म्हणजेच Bacterial Blight या रोगाबाबद्दल माहिती घेणार आहोत. डाळिंब पीक हे मुरमाड जमीन व कमी पावसाच्या प्रदेशात चांगल्या प्रकारे येते. काळी पाणी धरून ठेवणारी जमीन तसेच जास्त आद्रता युक्त हवामान पिकास पोषक नसते म्हणूनच तेल्या रोगाचा oily spot of pomegranate प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो. डाळिंब पिकातील तेल्या हा Xanthomonas axonopodis या जिवाणूमुळे रोग होतो. हा रोग पाने, फुले, फळ, फांदी आणि खोड याचे नुकसान करतो.
रोगाची लक्षणे | Symptoms of oily spot in pomegranate -
1. प्रथमावस्थेत रोगाचे डाग हे तेलकट, अनियमित, लंबगोलाकार तसेच एकमेकात मिसळत असलेले मध्यभागी काळसर पडलेले आढळून येतात.
2. फळांवर लहान डाग एकत्र आले की मोठ्या डागात रूपांतर होते. फळांवर या डागांमुळे आडवे उभे तडे जातात.
3. फळावर डाग पडल्यामुळे त्यांची प्रत पुर्णपणे खराब होते परिणामी फळांना बाजारभाव मिळत नाही.
4. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात. डाग मोठा झाल्यावर पाने पिवळी पडून गळून पडतात.
5. खोडावर पडणारा डाग खोलवर गेल्यास खाच तयार होते आणि तेथून झाड मोडते. तसेच फांद्यांवर डागांची तीव्रता वाढल्यावर फांद्या डागा पासून मोडतात
6. रोगामुळे 30 ते 50 % नुकसान होते, परंतु वाढीस पोषक वातावरण असताना अतिरोगग्रस्त बागेत 80 ते 100 % नुकसान होऊ शकते.
डाळिंब तेल्या रोग अनुकूल बाबी | Favorable climate for oily spot of pomegranate -
1. जीवाणूंची वाढ 28 ते 32 अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आर्द्रता 80 % पेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते.
2. बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे.
3. ढगाळ व पावसाळी हवामान, वादळी पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असणे.
4. फळ हिरव्या रंगांच्या अवस्थेत असताना लवकर प्रादुर्भाव होतो.
रोग व्यवस्थापन | Oily spot of pomegranate control -
1. हलक्या ते मध्यम (45 सेंमी. पेक्षा कमी खोली) जमिनीत डाळींबाची लागवड करावी.
2. डाळींबाची लागवड शिफारशीनुसार 4.5 ते 3 मीटर अंतरावर करावी.
3. रोगग्रस्त भागात शक्यतो हस्त बहार घ्यावा.
4. लागवडीसाठी रोग नसलेल्या क्षेत्रातून / रोपवाटीकेतून निरोगी कलमे / रोपे आणावित.
5. बागेस ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे. त्याचप्रमाणे बागेत पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावी.
6. प्रत्येक झाडास तीन ते चार खोड ठेवावेत, तसेच जमिनीपासून दोन फुटापर्यंत खोडावर फांद्या ठेवू नयेत. सर्व खोडांना जमिनीपासून दोन फुटापर्यंत बोर्डो पेस्टचा लेप पावसाळी वातावरण सुरू होण्यापुर्वी लावावा.
7. तसेच छाटणीनंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड 500 ग्रॅम + 20 मिली स्टिकर पाण्यात मिसळून फवारणी करावी. छाटणीची व इतर औजारे निर्जंतुक करून वापरावीत. त्यासाठी 1.5 % सोडियम हायपोक्लोराईड च्या द्रावणात सर्व साहित्य 10 ते 15 मि. बुडवावे. नंतरच या औजारांचा वापर करावा.
8. रोगग्रस्त पाने, फुले, फळे आणि फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
9. छाटणीनंतर लगेच 1% बोर्डो मिश्रणाची पहिली फवारणी करावी.
10. ब्लीचींग पावडर अथवा कॉपरडस्ट (4 %) 10 किलो प्रती एकर प्रमाणे जमिनीवर धुरळणी करावी.
11. प्रतिबंधात्मक फवारणी साठी जैविक स्यूडोमोनास फ्लोरोसेन्स 3 मिली किंवा तेल्या किल 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
12. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पुढील 4 फवारण्या प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून 5-6 दिवसांच्या अंतराने कराव्यात -
👉पहिली - कॉपर ऑक्झिक्लोराईड 400 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 60 ग्रॅम + स्टिकर 20 मिलि
👉दुसरी - कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी 200 ग्रॅम + कासुगामाइसिन 400 मिली + स्टिकर 20 मिलि
👉तिसरी - कॉपर ऑक्झिक्लोराईड 500 ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन 60 ग्रॅम + स्टिकर 20 मिलि
👉चैाथी - मँकोझेब (75 %) 400 ग्रॅम + कासुगामाइसिन 400 मिली + स्टिकर 20 मिलि
📢सुचना -
1. सदर औषधांची फवारणी फळ काढणीच्या 30 दिवसापुर्वी बंद करावी.
2. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसापुर्वी बंद करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी | Precautions for Oily spot of pomegranate control-
1. औषध फवारणीपूर्वी बागेतील झाडांची स्थिती औषध शोषून घेण्याची क्षमता असल्याची खात्री करवी. अन्यथा फवारलेली औषधे जमिनीवर पडून वाया जाण्याची शक्यता असते.
2. फवारणी करताना पंप किंवा टॅंक मध्ये स्टिकर आवश्य मिसळावा.
3. तेल्यानियंत्रणासाठी oily spot of pomegranate फवारणी करताना फवारणी मध्ये जिवाणूनाशक उदा. स्ट्रेप्टोमायसिन, कासुगामाइसिन इ. मिसळावे.
Conclusions | सारांश -
डाळिंब पिकातील तेल्या रोगाचे oily spot of pomegranate नियंत्रण करायचे dalimb telya rog niyantran असल्यास सुरुवातीपासून म्हणजेच लागवडी पासून जमिनीची निवड, लागवडीचे अंतर, खत नियोजन इत्यादी गोष्टीचे योग्य नियोजन जसे कि गरजेचे आहे. डाळिंब तेल्या रोग हा रोग जिवाणूजन्य रोग आहे. रोगाचा प्रधुरभाव आणि पसार पावसाळी आणि ढगाळ हवामानात जास्त प्रमाणात होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकासोबत अँटिबायोटिक्स वापरावे.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न -
1. डाळिंबामधील तेल्या रोग कश्यामुळे होतो?
उत्तर- डाळिंबामधील तेल्या रोग Xanthomonas axonopodis या जिवाणूमुळे रोग होतो.
2. तेल्या रोगाचा प्रधुरभाव कधी होतो?
उत्तर - तेल्या रोगाचा प्रधुरभाव पावसाळी आणि ढगाळ हवामानात जास्त प्रमाणामध्ये होतो.
3. तेल्या रोगाचा प्रधुरभाव वाढण्यासाठी अनुकूल वातावरण कोणते असते?
उत्तर - जीवाणूंची वाढ २८ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान तसेच वातावरणातील आर्द्रता ८०% पेक्षा जास्त असल्यास झपाट्याने होते.
4. तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी कोणते अँटिबायोटिक्स वापरू शकतो?
उत्तर - तेल्या रोगाचं नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोमायसिन किंवा कासुगामाइसिन अँटिबायोटिक्स वापरू शकतो.
People also read | हे देखील वाचा -
2. ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रण
3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती
4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !
5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण
लेखक | Author -
भारतअॅग्री कृषि एक्सपर्ट