jivamrut

jivamrut: शेतीमध्ये जीवामृत चा उपयोग आणि फायदे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण सेंद्रिय जीवामृत jivamrut कसे बनवावे आणि वापर कसा करावा याबाबद्दल सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. जीवामृत jivamrut in marathi हे मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढविण्यासाठी शेतीसाठी वरदान आहे.जीवामृत जमिनीतील सेंद्रिय अवशेषांचे विघटन करण्यास मदत करते आणि ते सुपीक बनवून त्याची गुणवत्ता सुधारते.सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने आणि रासायनिक खतांचा वापर केला जात आहे.त्यामुळे जमिनीचा दर्जा खालावत असून शेत नापीक होत आहेत। 

जीवामृत म्हणजे काय? What is jivamrut -

जीवामृत हे एक जैव-कीटकनाशक आणि सेंद्रिय खत आहे जे शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ, माती आणि पाणी एकत्र मिसळून तयार केले जाते. जीवामृत jivamrut हे नैसर्गिक कार्बन, बायोमास, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि पिकांसाठी आवश्यक असलेल्या इतर सूक्ष्म पोषक घटकांचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो.जीवामृत हे कमी खर्चाचे तर आहेच,पण ते पीक आणि माती या दोघांसाठीही फायदेशीर आहे.

जीवामृत तयार करण्यासाठी कोणते इनपुट वापरले जातात?

👉10 किलो गाईचे शेणखत

👉5 लिटर गोमूत्र 

👉2 किलो गूळ 

👉1 किलो बेसन  

👉2 किलो वारुळाची किंवा वडाखालची माती

👉500 ग्राम जिवाणू संवर्धक

👉200 लिटर पाणी.


जीवामृत कसे तयार करायचे? how to make jivamrut -

1. सुरुवातीला एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा डब्यामध्ये 10 किलो गाईचे शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालावे.

2. ते अशा पद्धतीने मिसळावे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही.

3. दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गूळ चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा.

4. या मिश्रणामध्ये गूळ टाकण्याचा फायदा असा होतो की, तयार झालेल्या मिश्रणामध्ये जे उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते ऍक्टिव्हेट होतात आणि त्यांची संख्या वाढते. 

5. गूळ मिसळताना, त्याचे खडे राहणार नाहीत, ते पाण्यामध्ये पूर्णपणे एकजीव होतील अशा पद्धतीने मिसळावेत.

6. नंतर त्या गुळाच्या मिश्रणाला, तयार केलेल्या शेणयुक्त व गोमूत्रयुक्त मिश्रणामध्ये टाकून चांगल्या प्रकारे ते मिसळावे.

7. नंतर या मिश्रणाला ढवळून घ्यावे.

8. या मिश्रणामध्ये दोन किलोग्रॅम बेसन पीठ टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करावे.

9. थोड्या वेळापर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवत राहावे.

10. नंतर सगळे मिश्रण 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून त्या बॅरलमध्ये पूर्ण पाणी भरावे.

11. नंतर वारुळाची किंवा वडाखालची माती बॅरलमध्ये टाकून सगळे मिश्रण एकत्र करावे.

12. हे तयार केलेले द्रावण सावलीत ठेवावे. हे द्रावण कमीत कमी दोन ते तीन दिवस सावलीत ठेवून सकाळ-संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे. 

13. सात दिवसांत जीवामृत वापरले तरी चालते. 

14. एक एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर जीवामृत हे पुरेसे ठरते.


जीवामृत कसे वापरावे? | How to use jivamrut -

1. २०० लिटर जीवामृत पाटपाण्याने किंवा कपड्याने गाळून ड्रीप ने २० दिवसांच्या अंतराने पीक काढणी पर्यंत द्यावे.

2. जीवामृत फवारणी साठी २० लिटर जीवामृत २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.


जीवामृताचे फायदे काय? | Benefits of the jivamrut -

1. जीवामृतामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

2. शेतात बॅक्टेरियांची उपज वाढवायला याचा उपयोग होतो.

3. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पण वाढते.

4. पिकाची वाढ जोमदार होते.

5. जीवामृत वापरल्याने पिकांची सहनशीलता वाढते.

6. किड आणि रोगांना पिकापासून दूर ठेवण्याची प्रतिकारशक्ती उत्पन्न होते.

7. शेतामध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे पिकांचा किडींपासून बचाव होतो.

8. रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होऊन पर्यायाने, उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते.


Conclusions | सारांश -

दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. उत्पादन खर्च जास्त तर त्यातून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती असते. रासायनिक खतांवर होणार खर्च हा जास्त असतो. त्याला पर्याय म्हणून जर आपण जैविक खतांचा वापर केला तर उत्पादन खर्चातही बचत होते. सेंद्रिय शेतीमध्ये आवश्यक निविष्ठा स्वतच्या शेतातच किंवा गावातच तयार करता येतात. यापैकी सेंद्रिय शेतीत जिवामृताचा वापर केला जातो.  जीवामृताच्या jivamrut  वापराने जमिनीतील जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जिवाणूंची संख्या वाढल्याने हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रामाण वाढते. पिकांना नत्र व इतर पूरक अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे शाकीय वाढ जोमदार होते. पीक तजेलदार, टवटवीत व निरोगी दिसून येते.


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

1. जीवामृत किती दिवसात तयार होते?

उत्तर-  जीवामृत 48 ते 72 तासात तयार होते. तयार झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरता येते.

2. जीवामृताचे घटक कोणते?

उत्तर - जीवामृत बायो-फर्टिलायझर फॉर्म्युलेशनमध्ये शेण, गोमूत्र, पाणी, गूळ, डाळीचे पीठ, जिवाणू संवर्धक आणि माती या घटकांचा वापर केला जातो. 

3. जीवामृताचे फायदे काय?

उत्तर - मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या आणि अनुकूल जीवाणू वाढवण्यासाठी एजंट म्हणून कार्य करते. मातीचा pH सुधारतो. 


People also read | हे देखील वाचा - 


1. हायड्रोपोनिक चारा निर्मिती

2. ऊस पिकातील तांबेरा रोगाचे संपूर्ण नियंत्रण

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण



लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी