harbhara khat niyojan: हरभरा खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती

harbhara khat niyojan: हरभरा खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण हरभरा पिकातील खत व्यवस्थापनाबद्दल harbhara khat niyojan सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. हरभरा हे रब्बी हंगामातील महत्वाचे पीक असून या पिकांमधुन जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असल्यास अधिक उत्पादन देणाऱ्या वाणासोबत योग्य खत व्यवस्थापन harbhara khat niyojan असणे गरजेचे आहे. हरभरा पिकाचे भारतातील एकूण उत्पादनापैकी 15 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. हरबरा पिक हे कमी खर्चातलं पिक आहे तसेच कमी खर्चातही भरपूर उत्पादन या पिकाचं मिळवता येतं.

हरभरा द्विदल पीक असून; द्विदल पिकांच्या मुळावर नत्र स्थिरीकरनासाठी गाठी असतात. हि द्विदल पीक हवेतील नायट्रोजनचा वापर करून नत्राची (N) गरज भागवत असतात. या कारणाने हरभरा पिकाला नत्राची खूपच कमी गरज भासते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या पिकासाठी कमी नत्र असलेले खत (harbhara khat vyavasthapan) वापरावे लागेल हरभऱ्याची पेरणी करताना (recommended dose of fertilizer for chickpea)  8 किलो नत्र आणि 16 किलो स्फुरद व 12 किलो पालाश प्रति एकरी द्यावा.


हरभरा खतांची मात्रा (chickpea npk dose) खालील ३ पद्धतीने देता येते -

👉युरिया 20 किलो + सिंगल सुपर फॉस्फेट (सुपर गोळी) 100 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो 

👉डायमोनियम फॉस्फेट 40 किलो + म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो 

👉12:32:16 - 50 किलो


या पैकी कोणत्याही एका पद्धतीने खते chana fertilizer dose द्यावीत व सोबत रिलीजर प्लस (सल्फर 90%) -  3 किलो + मायक्रोनुट्रीएंट खत 10 किलो द्यावे. 

शेतकरी बंधूंनो याठिकाणी प्रती एकर सरळ खताच्या आणि इतर काही खताचा रूपात याठिकाणी काही मात्र काढून दिले आहेत. इतर काही वेगळ्या खताच्या रूपात मात्र द्यायचा झाल्यास शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याचा पुरवठा होतो का तसेच ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे आहे या सर्व गोष्टीचा विचार करून तज्ञांचा सल्ला घेऊन शिफारशी प्रमाणे हरभरा पिकाला अन्नद्रव्यांचा माती परीक्षणाच्या आधारावर harbhara khat niyojan पुरवठा करावा. 


हरभरा पिकामध्ये सल्फर वापरणायचे फायदे - Benefits of sulphur in chickpea -

1. सल्फर मुळे पिकांमधील अमिनो ऍसिड आणि फॅटी ऍसिड चे प्रमाण वाढते. 

2. पीक जोमदार येते. 

3. पानावर काळोखी आणि हिरवेपणा येतो. 

4. फुलांच्या संकेत वाढ होऊन घाटे जास्त लागतात.

5. पिकावर कोणताही रोग येत नाही. 

6. फुलगळ कमी होते. 

7. पिकावर चकाकी येते दाणे टपोरे व चमक मारतात त्यामुळे भाव चांगला मिळतो.

8. पिकावर मर रोग येत नाही. 


फवारणीमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन -

1. हरभरा उगवून आल्यानंतर नंतर 15 ते 20 दिवसांनी 19:19:19 - 50 ग्रॅम + सीवीड अर्क 25 मिली प्रति 15 लिटर पाणी फवारणी करावी. 

2. हरभरा फुलोरा अवस्थेत आल्यावर 12:61:00 - 1 किलो + जियोलाइफ फ्लॉवर किट 51 ग्रॅम प्रति 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी. 

3. घाटे पोसत असताना 00:00:50 - 75 ग्रॅमबोरॉन 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी फवारणी करावी. 

4. याप्रमाणे हरभरा वाढीच्या स्थितीनुसार फवारणीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास निश्चितच उत्पादनात वाढ होईल. प्रत्येक फवारणी मध्ये सुपर स्टिकर 2 मिली प्रति 15 लिटर पाणी वापरावे. 


Conclusions | सारांश -

रब्बी हंगामातील हरभरा पिकामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी सुधारित वाणांचा वापर तसेच कीड रोग नियोजन सोबत योग्य खत व्यवस्थापन harbhara khat niyojan असल्यास अपेक्षित उत्पादन गाठता येते. हरभरा पिकासाठी फॉस्फरस आणि  सल्फर ह्या दोन अन्नद्रव्याची मात्र शिफारसीनुसार दिल्यास उत्पादनामध्ये वाढ होईल. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. कोणत्या पिकामध्ये हरभरा आंतरपीक म्हणून घ्यावे?

उत्तर- रभरा पीक मोहरी, करडई, ज्वारी, उस या पिकाबरोबर आंतरपीक म्हणुन घेता येते. 

2. हरभरा पिकामध्ये शिफारसी नुसार किती अन्नद्रव्ये लागते?

उत्तर- हरभरा पिकास 8 किलो नत्र आणि 16 किलो स्फुरद व 12 किलो पालाश प्रति एकरी लागते. 

3. हरभरा पिकात कोणत्या दुय्यम अन्नद्रव्य उत्पादन वाढवते?

उत्तर- हरभरा पिकात सल्फर (गंधक) दुय्यम अन्नद्रव्य उत्पादन वाढवते. प्रति एकरी 3 किलो सल्फर द्यावे. 

4. हरभरा पिकामध्ये जास्त फुले लागण्यासाठी कोणती फवारणी करावी?

उत्तर- हरभरा फुलोरा अवस्थेत आल्यावर 12:61:00 - 1 किलो + जियोलाइफ फ्लॉवर किट 51 ग्रॅम प्रति 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी. 

5. हरभरा दाण्याचा आकार आणि वजन वाढण्यासाठी कोणती फवारणी करावी?

उत्तर- घाटे पोसत असताना 00:00:50 - 75 ग्रॅम बोरॉन 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी फवारणी करावी. 


People also read | हे देखील वाचा - 

1. गव्हाच्या या जातींची लागवड करा आणि मिळवा भरगोस उत्पन्न

2. रब्बी हंगामात ज्वारीच्या या वाणांची पेरणी करा आणि मिळवा भरगोस उत्पादन

3. डेलीगेट कीटकनाशकाची संपूर्ण माहिती वापर, फायदे आणि किंमत

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण



लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी