cotton bollworm

cotton bollworm: कापूस पिकातील बोंडआळी नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आजच्या लेखात कापूस पिकातील बोंडआळी cotton bollworm नियंत्रण बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, बोंडअळी cotton bollworm इत्यादी किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडींपैकी बोंड अळी जास्त नुकसान करणारी कीड आहे. बोंडअळी मुळे पिकाचे ३० - ५०% पर्यंत नुकसान होते. म्हणून वेळीच उपाययोजना करून अळी पासून पिकाचे संरक्षण करावे. 


बोंड अळीचे पुढील 3 प्रकार आहेत -

1. ठिपक्याची बोंड अळी | cotton bollworm -

👉पिकांवर येण्याचा कालावधी (पेरणीपासून) - 30 ते 65 दिवस

👉ओळख - अंगावर ठिपके असतात. ही तपकिरी रंगाची अळी 15-18 मिमी लांब असते.

👉नुकसानीचा प्रकार - अळी सुरुवातील शेंडा पोखारते यामुळे शेंडे वाळतात आणि खाली वाकतात. बोंडाच्या आतील भाग पोखरल्याने बोंडे निकामी होऊन रुईची प्रत खालावते.


2. अमेरिकन बोंड अळी | american bollworm in cotton -

👉पिकांवर येण्याचा कालावधी (पेरणीपासून) - 45 ते 84 दिवस

👉ओळख - अळी american bollworm in cotton हिरव्या रंगाची असून शरिरावर लांबीच्या बाजूने तुटक करड्या रंगाच्या रेषा असतात. पतंग मोठ्या आकाराच्या व पिवळसर तपिकरी असतो.

👉नुकसानीचा प्रकार - american bollworm in cotton अळी बोंडाना छिद्र पाडून तोंडाकडील भागाने आत शिरुन आतील भाग पोखरते. त्यामुळे बोंड निकामी होते.


3. गुलाबी बोंड अळी । cotton pink bollworm । pink bollworm -

👉पिकांवर येण्याचा कालावधी (पेरणीपासून) - 75 ते 110 दिवस

👉ओळख - शेदरी रंगाची अळी cotton pink bollworm साधरण 18-20 मीमी लांबीची असते. डोक्यावर जवळचा भाग काळपट रंगाचा असतो.

👉नुकसानीचा प्रकार - pink bollworm ही सर्वात जास्त विध्वंसक अळी आहे. अळी कवळ्या फुले, बोंडे, यांना बारीक छिद्र पाडून आत शिरते, फुले पुर्णपणे उमळत नाहीत. उघडलेल्या बोंडावर डाग दिसतात.


जीवनक्रम -

1. अंडी अवस्था सुमारे 3 ते 5 दिवस राहते व या पक्व झालेल्या अड्यांतून पांढऱ्या रंगाची 1 मि.मी. लांब व डोके तपकिरी असलेली अळी बाहेर पड़ते. 

2. अळी cotton bollworm अवस्था सुमारे 8 ते 21 दिवसांच्या दरम्यान असते. कोषावस्थेमध्ये अळी लालसर तपकिरी रंगाची दिसते व सुमारे 8 ते 10 मि.मी. लांब असते तसेच कोषावस्था सुमारे 6 ते 20 दिवस राहते व त्यातून पतंग बाहेर येतात. 

3. पतंगाची लांबी सुमारे 8 ते 9 मि.मी. असते व ते करड्या रंगाचे दिसतात. पतंगावस्था सुमारे 5 ते 30 दिवस राहते.


यजमान पिके -

कापूस, अंबाडी, भेंडी, जास्वंद, ताग या  पीकावर शेंदरी बोंडअळी उपजिवीका करते अशी पिके कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत.


आर्थिक नुकसान पातळी -

फेरोमोन सापळ्यामध्ये सरासरी 8 ते 10 नर पतंग सतत 2 ते 3 दिवस आढळून येणे अथवा 10 टक्के प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंड आढळून येणे.


व्यवस्थापन -

1. पिकाचा हंगाम संपल्यावर खोल नांगरणी करावी. त्यामुळे पतंगाचे कोष उन्हाने किंवा पक्षाचे भक्ष झाल्यामुळे नष्ट होतील.

2. हंगामात वेळेवर पेरणी करावी ( जून ते जुलैचा पहिला आठवडा)

3. कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके/मिश्रपिके कपाशी पिकाभोवती घ्यावीत. 

4. कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी एकरी किमान 5 पक्षीथांबे उभे करावेत. म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया टिपून खातील.

5. कपाशीला पाते लागण्यास सुरुवात झाल्यानंतर एकरी 5 कामगंध सापळे कपाशी पिकामध्ये लावावे.

6. शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून नत्र खतांचा संतुलित वापर करावा.

7. फुलाच्या अवस्थेत गुलाबी बोंड आळी ग्रस्त फुले नष्ट करावीत.


जैविक नियंत्रण -

निम तेल 10,000 पी पी एम - 20 मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना 50 मिली  किंवा बेसिलस थुरिंगिएन्सिस 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 

 

रासायनिक नियंत्रण -

👉कराटे (लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% ईसी) 10 मिली 

👉सुपर डी (क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रीन) - 30 मिली

👉प्रोफेक्स सुपर (प्रोफेनोफाॅस + सायपरमेथ्रीन) - 30 मिली  

👉ईएम 1 (इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी) - 10 

👉डेसिस 100 (डेल्टामेथ्रिन 100 ईसी) - 10 मिली 

👉ट्रेसर (स्पिनोसॅड 45 एस. सी.) 7  मिली.

👉टाकूमि  (फ्लुबेंडियामाइड 20% डब्ल्यूडीजी) - 8 ग्राम 

👉डेनिटॉल (फेनप्रोपेथ्रिन 10% ईसी) - 30 मिली 

👉एम्प्लिगो (क्लोरेंट्रानिलिप्रोल 09.30% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 04.60% ZC) - 8 मिली  

👉कोराजन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% एस. सी) - 6 मिली  

या पैकी कोणतेही कीडनाशक आलटून पालटून किडीच्या प्रधुरभावानुसार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.


सारांश | Conclusion - 

कापूस पिकातील प्रमुख किडींपैकी बोंडअळी सर्वात नुकसार करणारी कीड आहे. किडीचा प्रधुरभाव फुले आल्यापासून ते काढणीपर्यंत असतो. अळी पाने, फुले आणि वाढणाऱ्या बोंडावर उपजीविका करते. अळीमुळे बोंडाचे नुकसान होत असल्याने उत्पादनामध्ये 30-50% पर्यंत घट येऊ शकते. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 

1. बोंडअळी किती प्रकारच्या आहेत?

उत्तर - बोंड अळीचे 3 प्रकार आहेत. ठिपक्याची बोंड अळी, अमेरिकन बोंड अळी आणि गुलाबी बोंड अळी. 

2. बोंडअळी कापूस पिकाचे नुकसान कश्या प्रकारे करते?

उत्तर - अळी कवळ्या फुले, बोंडे, यांना बारीक छिद्र पाडून आत शिरते, फुले पुर्णपणे उमळत नाहीत. बोंडाच्या आतील भाग पोखरल्याने बोंडे निकामी होऊन रुईची प्रत खालावते.

3. बोंडअळीमुळे कापूस पिकाचे किती नुकसान होऊ शकते?

उत्तर - बोंडअळी मुळे पिकाचे 30-50% पर्यंत नुकसान होते. म्हणून वेळीच उपाययोजना करून अळी पासून पिकाचे संरक्षण करावे. 

4. बोंडअळीचा प्रधुरभाव कधी होतो?

उत्तर - कापूस पिकामध्ये बोंडअळीचा प्रधुरभाव फुल अवस्थेपासून चालू होतो. 

5. बोंडअळीचे जैविक नियंत्रणासाठी कोणती फवारणी घ्यावी?

उत्तर - निम तेल 10,000 पी पी एम - 20 मिली किंवा बिव्हेरिया बॅसियाना 50 मिली  किंवा बेसिलस थुरिंगिएन्सिस 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 


People also read | हे देखील वाचा - 

1. धान पिकावरील करपा रोग नियंत्रण

2. बायर प्लानोंफिक्स बद्दल संपूर्ण माहिती

3. यूपीएल साफ बुरशीनाशक (वापर, फायदे आणि किंमत)

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे



लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

Back to blog

होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी