sucking pest

sucking pest: असे करा भाजीपाला पिकांमधील रसशोषक किडींचे नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. या लेखांमध्ये आज आपण भाजीपाला पिकांमधील रसशोषक (Sucking Pest) किडींचे नियंत्रण बद्दल सविस्तर माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत. फुलकिडे (थ्रिप्स), पांढरी माशी, मावा (ऍफिड) आणि तुडतुडे (aphid jassid thrips) या सारख्या रसशोषक किडी मिरची, टोमॅटो, काकडी, कलिंगड आणि वेलवर्गीय भाजीपाला पिकांमधील पानाचा रस शोषून (sap sucking insects) पिकास नुकसान पोहचवतात. तसेच हे व्हायरस ग्रस्त रोपातून निरोगी रोपांमध्ये मोझॅक आणि लीफ कर्ल व्हायरसचे वहन करून संपूर्ण प्लॉट मध्ये व्हायरस पसरवतात. म्हणून यासारख्या रसशोषक किडींचे वेळीच नियंत्रण होणे गरजेचे आहे. 


फुलकिडे (थ्रिप्स) | Thrips -

1. फुलकिडे ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत बारीक असते. 

2. सर्वसाधारणपणे हे किडे पानाच्या मागच्या बाजूस आढळतात. पानाचा वरचा पापुद्रा खरवडून अन्नरस शोषतात. परिणामी पाने निस्तेज होतात. पांढुरके व नंतर तपकिरी डाग दिसू लागतात. 


पांढरी माशी | Whitefly - 

1. पांढरी माशी 1 ते 2 मिमी लांब, रंगाने पिवळसर, पांढरट असून पंख पांढऱ्या किवा करड्या रंगांची असते. 

2. किडीचे पिल्ले, प्रौढ पानाच्या खालील बाजूस राहून पानातील रस शोषतात. पाने कोमेजतात. 

3. माशीच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या चिकट पदार्थांमुळे पानावर काळी बुरशी चढते. 


मावा (ऍफिडस्) | Aphid - 

1. मावा या रसशोषक किडीचा (sucking insects) प्रादुर्भाव वेलवर्गीय, संत्रावर्गीय तसेच इतर फुल, फळ आणि भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. 

2. कीड पानांमधील तसेच कोवळ्या फुटव्यामधील रस शोषण करते हा रस शोषत असतांनाच हि किड मधासारखा गोड द्रव देखील स्रवत असते. चिकट द्रवावर सुटी मोल्ड ही बुरशी वाढते ज्यामुळे पान काळसर दिसते. 

3. मावा किडीमुळे पिकाचे साधारणतः 40-50% नुकसान होते.


तुडतुडे | Jassid Insect

1. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे असून रंग फिक्कट हिरवा असतो. तुडतुडे तिरकस चालतात.

2. प्रौढ तुडतुडे आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषतात त्यामुळे सुरुवातीस पानांच्या कडा पिवळसर पडतात.  

3. पाने आतल्या बाजूने वळतात. कालांतराने पानांच्या कडा लालसर होतात. 


सर्व रसशोषक किडींचे (Sucking Pest) सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  पिवळे चिकट सापळे  - 10 नग  + निळे चिकट सापळे - 10 नग प्रति एकरी लावावेत. पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात तर थ्रिप्स निळ्या रंगाकडे आकर्षित होतात. 


जैविक कीडनाशके । Organic Insecticide -

ब्रँड 

घटक 

कंपनी 

प्रमाण प्रति १५ लिटर पंप

प्रमाण प्रति एकर 

नीम ऑइल 

नीम ऑइल 10,000 पीपीएम

आय एफ सी 

25 मिली 

250 मिली 

डॉ. बैक्टोस वर्टिगो

वर्टिसिलियम लेकानी

आनंद ऍग्रो 

50 मिली 

500 मिली 

डॉ. बैक्टोज़ ब्रेव

ब्यूवेरिया बैसियाना

आनंद ऍग्रो 

50 मिली 

500 मिली 

डॉ. बॅक्टोज मेटा

मेटाऱ्हायझियम अनिसोप्ली

आनंद ऍग्रो 

50 मिली 

500 मिली 


रासायनिक कीडनाशके । Insecticide for sucking pest -

ब्रँड 

घटक 

कंपनी 

प्रमाण प्रति 15 लिटर पंप

प्रमाण प्रति एकर 

टैफगोर 

डाइमेथोएट ३०% ईसी

टाटा रॅलीस 

30 मिली 

300 मिली 

अरेवा 

थायमेथॉक्सम 25 % डब्ल्यूजी 

धानुका 

10 ग्रॅम 

100 ग्रॅम 

धनप्रीत 

एसिटामिप्रिड 20% एसपी

धानुका 

10 ग्रॅम 

100 ग्रॅम 

कराटे

लैम्ब्डा साइहलोथ्रिन 5% ईसी

सिंजेंटा 

10 मिली 

100 मिली 

सुपर डी 

क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी

धानुका 

30 मिली 

300 मिली 

मोनो 36

मोनोक्रोटोफॉस 36% एसएल

श्रीराम 

30 मिली 

300 मिली 

प्रोफेक्स सुपर

प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% ईसी

नागार्जुना 

30 मिली 

300 मिली 

डेसिस 100 

डेल्टामेथ्रिन 100 ईसी

बायर 

10 मिली 

100 मिली 

कॉन्फिडोर 

इमिडाक्लोप्रिड 200 एसएल

बायर 

10 मिली 

100 मिली 

अलिका 

लॅम्बडा 9.5% + थायामेथोक्सम 12.6% झेडसी

सिंजेंटा 

8 मिली 

80 मिली 

फॅक्स 

फिप्रोनिल 5% एससी

धानुका 

30 मिली 

300 मिली 

पेजर 

डायफेंथियुरॉन ५०% डब्ल्यूपी 

धानुका 

25 ग्रॅम 

250 ग्रॅम 

पोलीस 

फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% WG

घरडा 

8 ग्रॅम 

80 ग्रॅम 

उलाला

फ्लोनिकॅमिड 50% डब्लू जी

युपीएल 

6 ग्रॅम 

60 ग्रॅम 

कीफन 

टोल्फेनपायरैड 15% ईसी

पीआई 

30 मिली 

300 मिली 

ऑक्सालिस 

फिप्रोनिल 15% + फ्लोनिकैमिड 15% डब्लुडीजी 

स्वाल 

16 ग्रॅम 

160 ग्रॅम 

डेलिगेट 

स्पिनटोरम 11.7% एससी

डाऊ 

18 मिली 

180 मिली 

रोनफेन

पायरीप्रॉक्सीफेन 8% + डायनोटेफुरन 5% + डायफेंथियुरॉन 18% SC

बेस्ट एग्रोलाइफ

30 मिली 

300 मिली 

सिमोडिस 

आयसोसायक्लोसेराम 9.2% + आयसोसायक्लोसेराम 10% डीसी 

सिंजेंटा 

24 मिली 

240 मिली 

ग्रासिया 

फ्लक्समेटामाइड 10% ईसी

गोदरेज 

16 मिली 

160 मिली 

बेनेविया 

सायंट्रानिलिप्रोल 10.26% ओडी 

एफएमसी 

30 मिली 

300 मिली 

 

वरील किटकनाशके वापरताना काही सूचना -  

1. रसशोषक किडींचे नियंत्रण (sucking insects) करण्यासाठी वरील कीडनाशकांचा पिकाची अवस्था आणि किडीची तीव्रता नुसार वापरावीत. 

2. कराटे, सुपर डी, मोनो 36, प्रोफेक्स सुपर आणि डेसिस 100 हे कीडनाशके पीक फुल अवस्थेमध्ये असताना फवारणी करू नये. 

3. फवारणी करताना कीडनाशकाच्या चांगल्या रिझल्ट साठी IFC सुपर स्टिकर 4 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 

4. व्हायरसचा प्रधुरभाव दिसू लागताच वरील पैकी एक रासायनिक कीडनाशक + जीओलाइफ नो व्हायरस 50 मिली + टाबॅसिल (सिलिकॉन) 3 टॅबलेट + IFC सुपर स्टिकर 4 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 

5. पहिल्या फवारणी नंतर पुन्हा 7 ते 10 दिवसांनी फवारणी घ्यावी जेणेकरून किडींचे पूर्णपणे नियंत्रण होईल. 


Conclusions | सारांश -

फुलकिडे (थ्रिप्स), पांढरी माशी, मावा (ऍफिड) आणि तुडतुडे या सारख्या रस शोषक किडी (sucking pest) भाजीपाला आणि फळपिकांमध्ये पानांमधील रस (leaf sucking insects) शोषण करून व्हायरस पसरवण्याचे काम करतात. याचा परिणाम उत्पादनावरून होऊन 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आर्थिक नुकसान होऊ शकते. यासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कीडनाशकाचा वापर केल्यास किडीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. 


FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न - 


1. रस शोषक किडी काय करतात?

उत्तर - रस शोषक किडी पानांमधील रस शोषून पिकास निस्तेज बनवता. 

2. रस शोषक किडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी काय करावे?

उत्तर- रस शोषक किडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी पिवळे आणि निळे चिकट सापळे १० प्रति नग एकरी लावावेत. 

3. रासायनिक कीडनाशके कश्याप्रकारे किडीचे नियंत्रण करतात?

उत्तर - रासायनिक कीडनाशके हे किडीच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कार्य करते, संपर्कात आल्यावर/खाल्ल्यानंतर लगेचच कीड अन्न खाणे थांबवते परिणामी कीड परलाइज होऊन मरते. 

4. रस शोषक किडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी कोणती फवारणी करावी?

उत्तर- रस शोषक किडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी निम ऑइलची फवारणी करावी?


People also read | हे देखील वाचा - 


1. kalingad lagwad: कलिंगड लागवड A to Z माहिती

2. oily spot of pomegranate: डाळिंब पिकातील तेल्या रोग नियंत्रण

3. ऊसाच्या बेस्ट जातींची माहिती

4. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

5. ऊस पिकातील लव्हाळा तण नियंत्रण

6. ratoon sugarcane: खोडवा ऊस व्यवस्थापन
लेखक | Author -

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी