soybean girdle beetle control

soybean girdle beetle: सोयाबीन चक्री भुंगा किडीचे संपूर्ण नियंत्रण

नमस्कार शेतकरी मित्रानो, Bharatagri krsuhi Dukan च्या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. “सोयाबीन पिकातील चक्री भुंगा soybean girdle beetle नियंत्रणासाठी फवारणी” या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकातील चक्री भुंग्याचे soyabean chakri bhunga नियंत्रण कसे करावं या बद्दल माहिती घेणार आहोत. सोयाबीन हे राज्याचे महत्त्वाचे खरिफ पीक असून बदलत्या हवामानामुळे या पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. सोयाबीन पिकातील अधिक उत्पादनासाठी सोयाबीन पिकाचे किडींपासून प्रभावी संरक्षण करणे गरजेचे झाले आहे. सोयाबीन पिकातील महत्वाची नुकसानकारक खोड पोखरणारी कीड म्हणजे soybean girdle beetle चक्रीभुंगा. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे 35 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. सोयाबीन शिवाय मूग, उडीद, चवळी, तूर इत्यादी पिकावर चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव होतो.

 

सोयाबीन चक्री भुंगा : soybean girdle beetle | soyabean chakri bhunga -

soyabean chakri bhunga या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पीक साधारपणे 20 ते 25 दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो. शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले दिसते. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते, या किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असतो. अंडी फिकट पिवळसर व लांबट आकराची असतात. एक मादी सरासरी 8 ते 72 अंडी घालते. अंड्यातून 3 ते 4 दिवसात अळी बाहेर पडते. अळीची लांबी 19 ते 22 मि.मी. असते. लहान अळी पांढऱ्या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. अंडयातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो. अळी 34 ते 38 दिवसांनी कोषावस्थेत जाते. यापैकी काही अळ्या पुढील पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेत जातात, तर काही अळ्या कोषामध्ये जातात. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत. तसेच पीक काढणीच्यावेळी खापा केलेल्या जागून खोड तुटून पडते, त्यामुळे देखील नुकसान होते. 


एकात्मिक व्यवस्थापन :  सोयाबीन चक्री भुंगा | सोयाबीन कीड व्यवस्थापन -

1. सोयाबीन पेरणीपूर्वी शेताची उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी. जमिनीतील किडीच्या अवस्था उष्णता, पक्षी यामुळे नष्ट होतात. 

2. पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी. 

3. प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर जास्तीत जास्त ८ दिवसांच्या आत पेरणी आटपावी.

4. पेरणीसाठी कीड प्रतिकारक्षम वाणाचा वापर करावा. 

5. पेरणीपूर्वी बुरशीनाशकासोबत थायोमिथोक्साम 30% एफ.एस. 10 मि.लि. प्रति किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढऱ्या माशीच्याही नियंत्रणास मदत होते. 

6. पेरणीनंतर 15 दिवसांनी पिवळे चिकट सापळे एकरी 10 या प्रमाणे साधारणपणे 8-10 मीटर अंतरावर लावावेत. 

7. शिफारशीप्रमाणेच नत्र खताची मात्रा द्यावी. अतिरिक्त मात्रा दिल्याने किडीचा प्रादूर्भाव वाढतो. 

8. सोयाबीन चक्री भुंगा soyabean chakri bhunga व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.

9. किडीच्या प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी 15 दिवसाचे अंतराने पुढील पैकी किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी -


👉पहिली फवारणी - पेरणी नंतर 15-20 दिवसांनी थायोमिथोक्साम 30% एफ.एस. 4 मि.लि. किंवा थियामेथोक्सम + लैम्ब्डा साइहलोथ्रिन 8 मि.लि. सोबत निम तेल 10000 पी.पी.एम - 15 मिली  प्रति 15 लिटर पंप. यामुळे खोडकिडीसोबतच चक्री भुंगा व रस शोषक किडीच्या नियंत्रणास मदत होईल. 

👉दुसरी फवारणी 30 - 35 दिवसानी थायक्लोप्रीड 21.7 एससी 25 मिली प्रति 15 लिटर पंप.

👉तिसरी फवारणी 45 - 50 दिवसांनी  क्लोरएन्ट्रानिलिप्रोल (18.5 % एस. सी.) 6 मिली प्रति 15 लिटर पंप.

👉चौथी फवारणी 60 - 65 दिवसांनी इमामेक्टिन बेंजोएट 5% एसजी 10 ग्राम प्रति 15 लिटर पंप.

InGene ThiomaxDhanuka Zapacबायर अलांटो

FMC CoragenDhanuka Em1

 

Conclusion | सारांश - 

सोयाबीन पिकातील चक्री भुंगा soyabean chakri bhunga हि कीड पिकातील महत्वाची नुकसानकारक खोड पोखरणारी कीड म्हणून ओळखली जाते. किडीच्या प्रधुरभावामुळे सोयाबीन पिकाचे 35 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. प्रधुरभावामुळे सोयाबीन फुलांचे आणि शेंगाचे प्रमाण कमी होते. होणारे नुकसान टाळण्यासाठी पहिल्यापासून किडीचे प्रतिबंधात्मक नियोजन करावे.  


People also ask । सतत विचारले जाणारे प्रश्न  -

1. चक्री भुंग्याचा soyabean chakri bhunga प्रधुरभाव कसा ओळखावा?

ऊत्तर - झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेली असल्यास चक्री भुंग्याचा प्रधुरभाव झाला आहे असे ओळखावे. 

2. चक्री भुंग्याचा प्रधुरभाव कधी होतो?

ऊत्तर - किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पीक साधारपणे 20 ते 25 दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो. 

3. चक्री भुंग्याची कोणती अवस्था नुकसानकारक असते?

ऊत्तर - किडीची अळी अवस्था हि सर्वात नुकसानकारक असते. 

4. चक्री भुंग्याचा प्रधुरभाव झाल्यास सोयाबीन पिकाचे नुकसान कश्या प्रकारे होते? 

ऊत्तर -  पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत. 

5. चक्री भुंग्याचा कोण कोणत्या पिकांमध्ये प्रधुरभाव होतो?

ऊत्तर - सोयाबीन शिवाय मूग, उडीद, चवळी, तूर इत्यादी पिकावर चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव होतो.


People also read | हे देखील वाचा - 

1. IFC Neem Oil: आयएफसी निम तेल फवारा आणि पांढरी माशी, मावा व थ्रिप्सला दूर पळवा !

2. जाणून घ्या सी विड एक्सट्रॅक्टचा उपयोग आणि फायदे

3. सोयाबीन वायरस चे संपूर्ण नियंत्रण

4. कापूस पिकातील लाल पानांसाठी हे नक्की करा. 

5. सोयाबीन पिकामध्ये कोणते आणि कधी तन नाशक (soybean tan nashak) वापरावे?



लेखक 

भारतअ‍ॅग्री कृषि एक्सपर्ट

कमेंट करें


होम

वीडियो कॉल

VIP

फसल जानकारी

केटेगरी